१६ आणि मी पित्याला विनंती करीन आणि तो सर्वकाळ तुमच्यासोबत राहण्यासाठी तुम्हाला आणखी एक सहायक देईल.+ १७ तो सहायक म्हणजे सत्याची पवित्र शक्ती.+ ती जगाला मिळू शकत नाही, कारण जग तिला पाहू शकत नाही आणि तिला ओळखतही नाही.+ पण तुम्ही तिला ओळखता, कारण ती तुमच्यासोबत राहते आणि तुमच्यामध्ये आहे.