नीतिवचनं
३ आपली सगळी कामं यहोवावर सोपव,+
म्हणजे तुझ्या योजना सफल होतील.
४ यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्वकाही घडवून आणतो,
त्याने दुष्टांनाही संकटाच्या दिवसासाठी राखून ठेवलंय.+
५ गर्विष्ठ माणसाची यहोवाला घृणा वाटते.+
अशा माणसाला शिक्षा मिळेल हे निश्चित.
६ एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्वासूपणाने अपराधाचं प्रायश्चित्त होतं+
आणि यहोवाची भीती बाळगल्यामुळे माणूस वाईट गोष्टींपासून दूर राहतो.+
७ माणसाच्या वागणुकीने जेव्हा यहोवा संतुष्ट होतो,
तेव्हा तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्यासोबत शांतीने राहायला लावतो.+
९ माणूस मनात आपला मार्ग ठरवतो,
पण यहोवा त्याच्या पावलांना दिशा दाखवतो.+
११ अचूक काटे आणि तराजू यहोवाकडून असतात;
पिशवीतली सगळी वजनं तोच पुरवतो.+
१३ नीतीचे बोल ऐकून राजांना आनंद होतो.
प्रामाणिकपणे बोलणारे त्यांना आवडतात.+
१५ राजाच्या कृपेमुळे आयुष्य सुखी होतं;
त्याची कृपा वसंत ऋतूत बरसणाऱ्या मेघांसारखी असते.+
१७ सरळ मनाचे लोक वाईट मार्ग टाळतात.
जो आपल्या मार्गाचं रक्षण करतो, तो आपल्या जिवाचं रक्षण करतो.+
१८ गर्व झाला की नाश ठरलेला;
घमेंडी वृत्ती आली, की माणूस अडखळतो.+
१९ गर्विष्ठ लोकांसोबत लूट वाटून घेण्यापेक्षा,
दीन लोकांमध्ये नम्रपणे राहिलेलं बरं!+
२२ सखोल समज असलेल्यांसाठी ती जीवनाच्या झऱ्यासारखी असते.
पण मूर्खांना आपल्याच मूर्खपणामुळे शिक्षा मिळते.
२५ माणसाला एक मार्ग योग्य वाटतो,
पण तो मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो.+
२९ हिंसा करणारा आपल्या शेजाऱ्याला फसवतो
आणि त्याला वाईट मार्गाला लावतो.
३० तो डोळे मिचकावत दुष्ट योजना करतो,
ओठ घट्ट मिटून तो दुसऱ्यांचं नुकसान करतो.