वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मत्तय रूपरेषा

      • राज्याबद्दलची उदाहरणं (१-५२)

        • बी पेरणारा (१-९)

        • येशू उदाहरणं का द्यायचा (१०-१७)

        • बी पेरणाऱ्‍याच्या उदाहरणाचा अर्थ (१८-२३)

        • गहू आणि जंगली गवत (२४-३०)

        • मोहरीचा दाणा आणि खमीर (३१-३३)

        • उदाहरणांचा वापर केल्यामुळे भविष्यवाणीची पूर्णता (३४, ३५)

        • गहू आणि जंगली गवताच्या उदाहरणाचा अर्थ (३६-४३)

        • लपवलेला खजिना आणि मौल्यवान मोती (४४-४६)

        • मासे पकडण्याचं जाळं (४७-५०)

        • भांडारातल्या नव्या आणि जुन्या गोष्टी (५१, ५२)

      • येशूच्या गावचे लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवत नाहीत (५३-५८)

मत्तय १३:२

समासातील संदर्भ

  • +मार्क ४:१

मत्तय १३:३

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:३४
  • +मार्क ४:३-९; लूक ८:४-८

मत्तय १३:४

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:१९

मत्तय १३:५

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:२०, २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. ११

मत्तय १३:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. ११

मत्तय १३:७

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:२२; मार्क ४:१८, १९; लूक ८:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. १२

मत्तय १३:८

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:२३; मार्क ४:८; लूक ८:८

मत्तय १३:९

समासातील संदर्भ

  • +मत्त ११:१५

मत्तय १३:१०

समासातील संदर्भ

  • +मार्क ४:१०, ११; लूक ८:९, १०

मत्तय १३:११

समासातील संदर्भ

  • +१कर २:९, १०; इफि १:९-१२; कल १:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००६, पृ. ९-११

मत्तय १३:१२

समासातील संदर्भ

  • +मत्त २५:२९; मार्क ४:२५; लूक ८:१८

मत्तय १३:१३

समासातील संदर्भ

  • +यश ६:१०; मार्क ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९०, पृ. ८

मत्तय १३:१४

समासातील संदर्भ

  • +योह १२:४०; रोम ११:८; २कर ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९०, पृ. ८

मत्तय १३:१५

समासातील संदर्भ

  • +यश ६:९, १०; मार्क ४:१२; प्रेका २८:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९०, पृ. ८

    ८/१/१९८७, पृ. ११

मत्तय १३:१६

समासातील संदर्भ

  • +लूक १०:२३, २४

मत्तय १३:१७

समासातील संदर्भ

  • +योह ८:५६; इफि ३:५; १पेत्र १:१०

मत्तय १३:१८

समासातील संदर्भ

  • +मार्क ४:१४; लूक ८:११

मत्तय १३:१९

तळटीपा

  • *

    शब्दशः “तो दुष्ट.”

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ५:८
  • +मार्क ४:१५; लूक ८:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. ८-९

    ८/१/१९९३, पृ. १८

मत्तय १३:२०

समासातील संदर्भ

  • +मार्क ४:१६, १७; लूक ८:१३

मत्तय १३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. ११

मत्तय १३:२२

तळटीपा

  • *

    किंवा “सध्याच्या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक १२:२२
  • +मत्त ६:२१; मार्क ४:१८, १९; १०:२३; लूक ८:१४; १ती ६:९; २ती ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!, ११/८/१९९८, पृ. २६

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१२, पृ. २५-२७

    ९/१५/२००८, पृ. २३-२४

    ९/१५/२००४, पृ. १२

    २/१/२००३, पृ. १२-१३

    ५/१५/१९९८, पृ. ५

    ५/१/१९८७, पृ. १३-१४

मत्तय १३:२३

समासातील संदर्भ

  • +मार्क ४:२०; लूक ८:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    राज्य सेवा,

    ११/२०१२, पृ. १

    २/१९९५, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. २१-२२

    १०/१५/१९९७, पृ. १४

मत्तय १३:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    २/२०१८, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. १९-२०

    २/१५/२००४, पृ. ५-६

    ९/१/२००३, पृ. ५-६

मत्तय १३:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ९८

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    २/२०१८, पृ. ३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. ३२

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. १९, २०-२१

    २/१५/२००४, पृ. ५-६

    ९/१/२००३, पृ. ५-६

    ९/१/२००२, पृ. १६

मत्तय १३:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१३, पृ. ९-१०

मत्तय १३:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१३, पृ. १०

मत्तय १३:२८

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:३८, ३९

मत्तय १३:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. १९, २१

मत्तय १३:३०

समासातील संदर्भ

  • +प्रक १४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ९८-९९

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    २/२०१८, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१३, पृ. १२-१३

    १/१५/२०१२, पृ. ७-८

    ६/१५/२०१०, पृ. ५

    ३/१५/२०१०, पृ. १९, २१-२२

    ५/१/१९९४, पृ. २३-२४

मत्तय १३:३१

समासातील संदर्भ

  • +मार्क ४:३०-३२; लूक १३:१८, १९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. ७-८

    ७/१५/२००८, पृ. १७-१९, २१

मत्तय १३:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. ७-८

    ७/१५/२००८, पृ. १७-१९, २१

    १२/१/१९८९, पृ. २९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

मत्तय १३:३३

तळटीपा

  • *

    म्हणजे, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक १३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. ८-१०

    ७/१५/२००८, पृ. १९-२१

मत्तय १३:३४

समासातील संदर्भ

  • +मार्क ४:३३, ३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. ११

    ९/१/२००२, पृ. १३-१८

मत्तय १३:३५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “जगाच्या स्थापनेपासून.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. ११

    ९/१/२००२, पृ. १३-१४

मत्तय १३:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. १९-२०

मत्तय १३:३८

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:१४; रोम १०:१८; कल १:६
  • +योह ८:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. १९-२१

    उपासनेतील ऐक्य, पृ. १७९-१८०

मत्तय १३:३९

तळटीपा

  • *

    शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

  • *

    किंवा “सध्याच्या काळाची समाप्ती.” शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१०, पृ. ५

    ३/१५/२०१०, पृ. २०-२२

मत्तय १३:४०

तळटीपा

  • *

    किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीला.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१९

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. २२

मत्तय १३:४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१३, पृ. १२

    ३/१५/२०१०, पृ. २२

मत्तय १३:४२

तळटीपा

  • *

    किंवा “दात खातील.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१३, पृ. १६

    ७/१५/२०१३, पृ. १३

    ३/१५/२०१०, पृ. २२

    १२/१/१९८८, पृ. ६

मत्तय १३:४३

समासातील संदर्भ

  • +शास ५:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१३, पृ. १३-१४

    ७/१५/२०१०, पृ. २२-२३

    ३/१५/२०१०, पृ. २३

    ५/१/१९८७, पृ. २५-२६

मत्तय १३:४४

समासातील संदर्भ

  • +फिलि ३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. १०

    २/१/१९९०, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

मत्तय १३:४५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१७, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. १०

    २/१/२००५, पृ. ८-१२, १३-१८

    ३/१/१९९२, पृ. १४-१५

    २/१/१९९०, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

मत्तय १३:४६

समासातील संदर्भ

  • +फिलि ३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१७, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. १०

    २/१/२००५, पृ. ८-१२, १३-१८

    ३/१/१९९२, पृ. १४-१५

    २/१/१९९०, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

मत्तय १३:४७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. १३

    ७/१५/२००८, पृ. २०-२१

    ९/१/१९९२, पृ. १९-२४

    २/१/१९९०, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

मत्तय १३:४८

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:९
  • +लेवी ११:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. १३-१४

    ७/१५/२००८, पृ. २०-२१

    ९/१/१९९२, पृ. १९-२०, २२-२३

    २/१/१९९०, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

मत्तय १३:४९

तळटीपा

  • *

    किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीला.” शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१४, पृ. १३-१४

    ४/१/२०११, पृ. २५

    ७/१५/२००८, पृ. २०-२१

    ९/१/१९९२, पृ. १९-२३

    २/१/१९९०, पृ. ९

    नवे जग भाषांतर, पृ. २५१९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

मत्तय १३:५०

तळटीपा

  • *

    किंवा “दात खातील.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २०-२१

    ९/१/१९९२, पृ. १९-२१, २३-२४

    २/१/१९९०, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४३

मत्तय १३:५२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१७, पृ. १२-१३

    राज्य सेवा,

    ११/२००८, पृ. १

मत्तय १३:५४

तळटीपा

  • *

    किंवा “अद्‌भुत कार्यं.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २:२३
  • +मार्क ६:१-६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४८

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९०, पृ. ११

    ७/१/१९९०, पृ. ८

मत्तय १३:५५

समासातील संदर्भ

  • +लूक ४:२२; योह ६:४२
  • +मत्त १२:४६; योह २:१२; प्रेका १:१४; १कर ९:५; गल १:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९०, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४८

मत्तय १३:५६

समासातील संदर्भ

  • +योह ७:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४८

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९०, पृ. ८

मत्तय १३:५७

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:७, ८
  • +मार्क ६:४; लूक ४:२४; योह ४:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ४८

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९०, पृ. ८

मत्तय १३:५८

तळटीपा

  • *

    किंवा “अद्‌भुत कार्यं.”

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मत्त. १३:२मार्क ४:१
मत्त. १३:३मत्त १३:३४
मत्त. १३:३मार्क ४:३-९; लूक ८:४-८
मत्त. १३:४मत्त १३:१९
मत्त. १३:५मत्त १३:२०, २१
मत्त. १३:७मत्त १३:२२; मार्क ४:१८, १९; लूक ८:१४
मत्त. १३:८मत्त १३:२३; मार्क ४:८; लूक ८:८
मत्त. १३:९मत्त ११:१५
मत्त. १३:१०मार्क ४:१०, ११; लूक ८:९, १०
मत्त. १३:१११कर २:९, १०; इफि १:९-१२; कल १:२६, २७
मत्त. १३:१२मत्त २५:२९; मार्क ४:२५; लूक ८:१८
मत्त. १३:१३यश ६:१०; मार्क ४:१२
मत्त. १३:१४योह १२:४०; रोम ११:८; २कर ३:१४
मत्त. १३:१५यश ६:९, १०; मार्क ४:१२; प्रेका २८:२६, २७
मत्त. १३:१६लूक १०:२३, २४
मत्त. १३:१७योह ८:५६; इफि ३:५; १पेत्र १:१०
मत्त. १३:१८मार्क ४:१४; लूक ८:११
मत्त. १३:१९१पेत्र ५:८
मत्त. १३:१९मार्क ४:१५; लूक ८:१२
मत्त. १३:२०मार्क ४:१६, १७; लूक ८:१३
मत्त. १३:२२लूक १२:२२
मत्त. १३:२२मत्त ६:२१; मार्क ४:१८, १९; १०:२३; लूक ८:१४; १ती ६:९; २ती ४:१०
मत्त. १३:२३मार्क ४:२०; लूक ८:१५
मत्त. १३:२८मत्त १३:३८, ३९
मत्त. १३:३०प्रक १४:१५
मत्त. १३:३१मार्क ४:३०-३२; लूक १३:१८, १९
मत्त. १३:३३लूक १३:२१
मत्त. १३:३४मार्क ४:३३, ३४
मत्त. १३:३५स्तो ७८:२
मत्त. १३:३८मत्त २४:१४; रोम १०:१८; कल १:६
मत्त. १३:३८योह ८:४४
मत्त. १३:४०मत्त १३:३०
मत्त. १३:४२मत्त १३:३०
मत्त. १३:४३शास ५:३१
मत्त. १३:४४फिलि ३:७
मत्त. १३:४६फिलि ३:८
मत्त. १३:४८लेवी ११:९
मत्त. १३:४८लेवी ११:१२
मत्त. १३:५४मत्त २:२३
मत्त. १३:५४मार्क ६:१-६
मत्त. १३:५५लूक ४:२२; योह ६:४२
मत्त. १३:५५मत्त १२:४६; योह २:१२; प्रेका १:१४; १कर ९:५; गल १:१९
मत्त. १३:५६योह ७:१५
मत्त. १३:५७१पेत्र २:७, ८
मत्त. १३:५७मार्क ६:४; लूक ४:२४; योह ४:४४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मत्तय १३:१-५८

मत्तयने सांगितलेला संदेश

१३ त्या दिवशी येशू घरातून बाहेर निघून समुद्रकिनाऱ्‍यावर बसला होता. २ तेव्हा त्याच्याभोवती इतके लोक जमले, की तो जाऊन एका नावेत बसला आणि सगळे लोक किनाऱ्‍यावर उभे राहिले.+ ३ मग त्याने उदाहरणं देऊन+ त्यांना बऱ्‍याच गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला: “एकदा एक शेतकरी पेरणी करायला निघाला.+ ४ तो पेरणी करत होता, तेव्हा काही बी रस्त्याच्या कडेला पडलं आणि पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकलं.+ ५ काही बी खडकाळ जमिनीवर पडलं. तिथे जास्त माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवलं.+ ६ पण सूर्य वर येताच कडक उन्हामुळे रोपं वाळून गेली, कारण त्यांनी मूळ धरलं नव्हतं. ७ काही बी काटेरी झुडपांत पडलं आणि ती झुडपं वाढल्यावर त्यांनी रोपांची वाढ खुंटवली.+ ८ पण काही बी चांगल्या जमिनीवर पडलं आणि कुठे शंभरपट, कुठे साठपट, तर कुठे तीसपट असं पीक येऊ लागलं.+ ९ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”+

१० मग शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाले: “तू त्यांच्याशी बोलताना उदाहरणं का देतोस?”+ ११ त्याने उत्तर दिलं: “स्वर्गाच्या राज्याच्या पवित्र रहस्यांची समज तुम्हाला देण्यात आली आहे,+ पण त्यांना नाही. १२ कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी दिलं जाईल आणि त्याच्याजवळ भरपूर होईल. पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडून जे आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.+ १३ म्हणूनच मी त्यांच्याशी बोलताना उदाहरणं देतो. कारण ते पाहत असूनही त्यांना दिसत नाही, ऐकत असूनही त्यांना ऐकू येत नाही आणि सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजत नाही.+ १४ त्यांच्या बाबतीत यशयाची भविष्यवाणी पूर्ण होत आहे. त्याने म्हटलं होतं: ‘तुम्ही ऐकाल तर खरं, पण तुम्हाला अर्थ कळणार नाही; तुम्ही पाहाल तर खरं, पण तुम्हाला दिसणार नाही.+ १५ कारण या लोकांची मनं कठोर झाली आहेत. ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये आणि आपल्या कानांनी ऐकू नये; तसंच, त्यांच्या मनाने याचा अर्थ समजून घेऊ नये आणि त्यांनी मागे फिरू नये आणि मी त्यांना बरं करू नये, म्हणून ते असं करतात.’+

१६ पण तुम्ही सुखी आहात, कारण तुमचे डोळे पाहतात आणि तुमचे कान ऐकतात.+ १७ मी तुम्हाला खरं सांगतो, पुष्कळ संदेष्ट्यांना आणि नीतिमान माणसांना, तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी पाहायची आणि तुम्ही ऐकत असलेल्या गोष्टी ऐकायची इच्छा होती. पण त्यांना त्या पाहता आणि ऐकता आल्या नाहीत.+

१८ आता बी पेरणाऱ्‍या शेतकऱ्‍याच्या उदाहरणाचा अर्थ काय, ते ऐका.+ १९ एखादा जेव्हा राज्याचं वचन ऐकतो पण त्याचा अर्थ समजून घेत नाही, तेव्हा सैतान*+ येऊन त्याच्या हृदयात जे पेरण्यात आलंय ते काढून घेतो. हा माणूस रस्त्याच्या कडेला पडलेल्या बीसारखा आहे.+ २० खडकाळ जमिनीवर पेरलेल्या बीसारखा असलेला माणूस, वचन ऐकल्यावर ते लगेच आनंदाने स्वीकारतो.+ २१ पण, वचनाने त्याच्यात मूळ न धरल्यामुळे तो फक्‍त काही काळ टिकून राहतो. मग वचनामुळे एखादं संकट आलं किंवा छळ झाला, तर तो लगेच अडखळून पडतो. २२ काटेरी झुडपांत पेरलेल्या बीसारखा असलेला माणूस वचन तर ऐकतो, पण जगाच्या व्यवस्थेच्या* चिंता+ आणि पैशाची फसवी ताकद यांमुळे वचनाची वाढ खुंटते आणि ते निष्फळ होतं.+ २३ पण चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखा माणूस वचन ऐकतो, त्याचा अर्थ समजून घेतो आणि खातरीने फळ देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट तर कोणी तीसपट.”+

२४ मग तो त्यांना आणखी एक उदाहरण देऊन म्हणाला: “स्वर्गाचं राज्य अशा एका माणसासारखं आहे, ज्याने आपल्या शेतात चांगलं बी पेरलं. २५ मग माणसं झोपेत असताना त्याचा एक शत्रू गव्हात जंगली गवताचं बी पेरून गेला. २६ पुढे गव्हाची रोपं वाढून त्यांना दाणे आले, तेव्हा शेतात जंगली गवतही दिसू लागलं. २७ म्हणून शेताच्या मालकाचे दास त्याच्याकडे येऊन म्हणाले, ‘मालक, तुम्ही आपल्या शेतात चांगलं बी पेरलं होतं ना? मग, हे जंगली गवत कसं काय उगवलं?’ २८ तो त्यांना म्हणाला, ‘हे काम एका शत्रूचं आहे.’+ तेव्हा ते त्याला म्हणाले, ‘आम्ही जाऊन ते गोळा करावं, अशी तुमची इच्छा आहे का?’ २९ तो म्हणाला, ‘नको, कारण गवत गोळा करताना तुम्ही त्यासोबत गहूपण उपटाल. ३० म्हणून कापणीपर्यंत दोन्ही सोबत वाढू द्या. मग कापणीच्या वेळी मी कापणी करणाऱ्‍यांना सांगीन, की आधी जंगली गवत गोळा करा आणि जाळून टाकण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. नंतर गहू माझ्या कोठारांत जमा करा.’”+

३१ तो त्यांना आणखी एक उदाहरण देऊन म्हणाला: “स्वर्गाचं राज्य एका माणसाने आपल्या शेतात पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखं आहे.+ ३२ खरंतर तो दाणा सर्व बियांपेक्षा लहान असतो. पण वाढल्यावर त्याचं रोप सर्व भाज्यांपेक्षा मोठं होऊन त्याचं झाड होतं. मग आकाशातले पक्षी त्याच्या फांद्यांवर आपली घरटी बांधतात.”

३३ त्याने त्यांना आणखी एक उदाहरण दिलं: “स्वर्गाचं राज्य अशा खमिरासारखं* आहे, जे एका स्त्रीने तीन मापं पिठामध्ये घातलं आणि त्यामुळे सगळं पीठ फुगलं.”+

३४ या सगळ्या गोष्टी येशूने जमलेल्या लोकांना उदाहरणं देऊन सांगितल्या. खरंतर, तो कधीच उदाहरणांशिवाय त्यांच्याशी बोलायचा नाही.+ ३५ संदेष्ट्याने जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून हे घडलं. ते असं: “मी आपलं तोंड उघडून उदाहरणं देईन. सुरुवातीपासून* गुप्त असलेल्या गोष्टी मी घोषित करीन.”+

३६ मग लोकांना निरोप दिल्यावर तो घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “जंगली गवताच्या उदाहरणाचा अर्थ आम्हाला समजावून सांग.” ३७ तो त्यांना म्हणाला: “चांगलं बी पेरणारा, मनुष्याचा मुलगा आहे. ३८ शेत म्हणजे जग.+ चांगलं बी म्हणजे राज्याची मुलं, तर जंगली गवत सैतानाची मुलं आहेत.+ ३९ आणि ते पेरणारा शत्रू, सैतान* आहे. कापणी म्हणजे या जगाच्या व्यवस्थेची समाप्ती* आणि कापणी करणारे स्वर्गदूत आहेत. ४० म्हणून जसं जंगली गवत गोळा करून जाळून टाकलं जातं, तसंच या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला* घडेल.+ ४१ तेव्हा मनुष्याचा मुलगा आपल्या स्वर्गदूतांना पाठवेल. ते त्याच्या राज्यातून अडखळायला लावणाऱ्‍या सर्व गोष्टी आणि अनीतीने वागणाऱ्‍या लोकांना गोळा करतील. ४२ ते त्यांना आगीच्या भट्टीत टाकून देतील.+ तिथे ते रडतील आणि आक्रोश करतील.* ४३ त्या वेळी नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तेजस्वीपणे चमकतील.+ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.

४४ स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या अशा खजिन्यासारखं आहे, जो एका माणसाला सापडला आणि त्याने तो लपवून ठेवला. त्याला इतका आनंद झाला, की त्याने जाऊन आपल्याजवळ असलेलं सगळं काही विकलं आणि ते शेत विकत घेतलं.+

४५ तसंच, स्वर्गाचं राज्य मौल्यवान मोत्यांच्या शोधात देशोदेशी फिरणाऱ्‍या एका व्यापाऱ्‍यासारखं आहे. ४६ त्याला एक खूप मौल्यवान मोती सापडला. तेव्हा त्याने जाऊन आपल्याजवळ असलेलं सगळं काही विकलं आणि तो मोती विकत घेतला.+

४७ तसंच, स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या अशा एका जाळ्यासारखं आहे, ज्यात सर्व प्रकारचे मासे अडकले. ४८ जाळं पूर्ण भरल्यानंतर त्यांनी ते किनाऱ्‍यावर आणलं आणि बसून चांगले मासे+ भांड्यांमध्ये जमा केले, तर खराब मासे+ फेकून दिले. ४९ जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला* असंच घडेल. स्वर्गदूतांना पाठवलं जाईल आणि ते दुष्टांना नीतिमानांपासून वेगळं करतील ५० आणि त्यांना आगीच्या भट्टीत टाकतील. तिथे ते रडतील आणि आक्रोश करतील.*

५१ तुम्हाला या सर्व गोष्टींचा अर्थ समजला का?” ते त्याला म्हणाले: “हो.” ५२ मग तो त्यांना म्हणाला: “लोकांना शिकवणारा प्रत्येक शिक्षक, ज्याला स्वर्गाच्या राज्याबद्दल शिकवण्यात आलंय, तो अशा एका घरमालकासारखा आहे जो आपल्या भांडारातून नव्या आणि जुन्या गोष्टी बाहेर काढतो.”

५३ ही सगळी उदाहरणं सांगितल्यावर येशू तिथून निघाला. ५४ मग आपल्या गावी+ आल्यावर तो तिथल्या सभास्थानात जाऊन लोकांना शिकवू लागला. तेव्हा त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “या माणसाला ही बुद्धी आणि चमत्कार* करण्याची शक्‍ती कुठून मिळाली?+ ५५ हा त्या सुताराचाच मुलगा ना?+ आणि याच्या आईचं नाव मरीया आहे ना? याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा हे याचेच भाऊ आहेत ना?+ ५६ आणि याच्या सगळ्या बहिणीही इथेच राहत नाहीत का? मग हा या सगळ्या गोष्टी कुठे शिकला?”+ ५७ यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही.+ पण येशू त्यांना म्हणाला: “संदेष्ट्याचा सगळीकडे आदर केला जातो, फक्‍त त्याच्या स्वतःच्या गावात आणि स्वतःच्या घरात केला जात नाही.”+ ५८ त्यांच्या अविश्‍वासामुळे त्याने तिथे जास्त चमत्कार* केले नाहीत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा