स्तोत्र
पहिलं पुस्तक
(स्तोत्रं १-४१)
१ सुखी आहे तो माणूस, जो दुष्टांच्या सल्ल्याप्रमाणे वागत नाही;
पापी लोकांच्या मार्गात उभा राहत नाही,+
आणि निंदा करणाऱ्यांसोबत बसत नाही!+
३ तो वाहत्या पाण्याजवळ लावलेल्या अशा झाडासारखा होईल,
जे आपल्या ऋतूमध्ये फळ देतं,
आणि ज्याची पानं कोमेजत नाहीत.
तो जे काही करतो त्यात त्याला यश मिळतं.+
४ पण, दुष्टांचं तसं नाही;
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.