स्तोत्र
दावीदचं शोकगीत. बन्यामीन वंशातला कूश दावीदला जे बोलला,
त्यामुळे त्याने यहोवाला उद्देशून हे गीत गायलं.
७ हे यहोवा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय घेतलाय.+
माझा छळ करणाऱ्या सर्वांपासून मला वाचव आणि माझी सुटका कर.+
२ नाहीतर, सिंह फाडतो तसे ते मला फाडून माझे तुकडेतुकडे करतील,+
ते मला उचलून नेतील आणि मला सोडवणारा कोणीच नसेल.
३ हे यहोवा, माझ्या देवा, जर या बाबतीत मी दोषी असेन,
जर मी अन्यायीपणे वागलो असेन,
४ जर माझं भलं करणाऱ्याचं मी नुकसान केलं असेल,+
किंवा कारण नसताना माझ्या शत्रूला लुटलं असेल,*
५ तर शत्रूने माझा पाठलाग करून मला गाठावं;
त्याने मला पायाखाली तुडवावं
आणि माझं वैभव धुळीला मिळवावं. (सेला )
६ हे यहोवा, क्रोधित होऊन ऊठ;
माझ्या संतापलेल्या वैऱ्यांविरुद्ध उभा राहा;+
माझ्यासाठी जागा हो आणि न्याय व्हावा असा हुकूम कर.+
७ राष्ट्रांना तुझ्याभोवती एकत्र होऊ दे
आणि उच्च स्थानावरून त्यांच्याविरुद्ध कारवाई कर.
८ यहोवा लोकांबद्दल आपला निर्णय सुनावेल.+
हे यहोवा, माझं नीतिमत्त्व
आणि माझा खरेपणा+ पाहून माझा न्याय कर.
कारण तू हृदयांचं+ आणि मनातल्या खोल भावनांचं*+ परीक्षण करणारा नीतिमान देव आहेस.+
१० देव माझी ढाल आहे;+ तो सरळ मनाच्या लोकांचं तारण करणारा आहे.+
११ देव नीतिमान न्यायाधीश आहे,+
तो दररोज आपले न्यायदंड घोषित करतो.
१२ जर एखाद्याने पश्चात्ताप केला नाही,+ तर देव आपल्या तलवारीला धार लावतो;+
तो आपलं धनुष्य ताणून सज्ज करतो.+
१३ तो आपली घातक शस्त्रं तयार करतो
आणि आपले जळते बाण सज्ज करतो.+
१४ पोटात दुष्टतेचं बीज असणाऱ्याकडे पाहा;
तो संकटाचा गर्भ वाढवतो आणि लबाडीला जन्म देतो.+
१५ तो खड्डा खोदतो; अगदी खोलपर्यंत खणत जातो.
पण त्याने खोदलेल्या खड्ड्यात तो स्वतःच पडतो.+
१६ त्याने आणलेलं संकट त्याच्यावरच उलटेल;+
त्याचा अत्याचार त्याच्याच माथी येईल.