वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • कलस्सैकर ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

कलस्सैकर रूपरेषा

      • मालकांना सल्ला (१)

      • “नेहमी प्रार्थना करत राहा” (२-४)

      • बाहेरच्यांशी सुज्ञपणे वागणं (५, ६)

      • निरोपाचे शब्द (७-१८)

कलस्सैकर ४:१

समासातील संदर्भ

  • +इफि ६:९

कलस्सैकर ४:२

समासातील संदर्भ

  • +लूक १८:१; रोम १२:१२; इफि ६:१८
  • +कल ३:१५; १थेस ५:१८

कलस्सैकर ४:३

समासातील संदर्भ

  • +रोम १५:३०
  • +इफि ६:१९, २०; फिलि १:७

कलस्सैकर ४:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “नियुक्‍त वेळ विकत घेऊन.”

समासातील संदर्भ

  • +इफि ५:१५, १६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९३, पृ. १५-२०

कलस्सैकर ४:६

तळटीपा

  • *

    किंवा “कृपायुक्‍त.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:१३; मार्क ९:५०
  • +१पेत्र ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २२

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१०, पृ. २०-२४

    १/१५/१९९९, पृ. २२-२३

    १/१/१९९२, पृ. २८

    १/१/१९८८, पृ. १०-१५

    ६/१/१९८६, पृ. १०-११

    राज्य सेवा,

    १/२००८, पृ. ८

    कुटुंब, पृ. ३६, १८६-१८७

कलस्सैकर ४:७

समासातील संदर्भ

  • +इफि ६:२१, २२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९८, पृ. ८

कलस्सैकर ४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९८, पृ. ८

कलस्सैकर ४:९

समासातील संदर्भ

  • +फिले १०

कलस्सैकर ४:१०

समासातील संदर्भ

  • +प्रेका १९:२९; २०:४; २७:२
  • +प्रेका १२:१२; १५:३७; फिले २३, २४
  • +रोम १५:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ८

    १२/१५/२०००, पृ. १७

    ९/१५/१९९७, पृ. ३१

    ५/१/१९९१, पृ. २५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११८

कलस्सैकर ४:११

तळटीपा

  • *

    किंवा “ते मला धीर देणारे सहायक आहेत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. १३

    ५/१/२००४, पृ. १८-२१

    १२/१५/२०००, पृ. १७-१९

    १२/१५/१९९९, पृ. २७

    ९/१५/१९९७, पृ. ३१

कलस्सैकर ४:१२

समासातील संदर्भ

  • +कल १:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००८, पृ. ३-४

    १२/१५/२०००, पृ. १५-१६, १९-२४

    ५/१५/१९९७, पृ. ३१

कलस्सैकर ४:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००८, पृ. ३-४

    ५/१५/१९९७, पृ. ३१

कलस्सैकर ४:१४

समासातील संदर्भ

  • +लूक १:३; प्रेका १:१
  • +फिले २३, २४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. २५

कलस्सैकर ४:१५

समासातील संदर्भ

  • +रोम १६:५; १कर १६:१९

कलस्सैकर ४:१६

समासातील संदर्भ

  • +१थेस ५:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. २८

    १/१/१९९१, पृ. ३२

कलस्सैकर ४:१७

समासातील संदर्भ

  • +फिले १, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००८, पृ. ६-७

कलस्सैकर ४:१८

समासातील संदर्भ

  • +२थेस ३:१७
  • +फिलि १:७; फिले ९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

कलस्सै. ४:१इफि ६:९
कलस्सै. ४:२लूक १८:१; रोम १२:१२; इफि ६:१८
कलस्सै. ४:२कल ३:१५; १थेस ५:१८
कलस्सै. ४:३रोम १५:३०
कलस्सै. ४:३इफि ६:१९, २०; फिलि १:७
कलस्सै. ४:५इफि ५:१५, १६
कलस्सै. ४:६मत्त ५:१३; मार्क ९:५०
कलस्सै. ४:६१पेत्र ३:१५
कलस्सै. ४:७इफि ६:२१, २२
कलस्सै. ४:९फिले १०
कलस्सै. ४:१०प्रेका १९:२९; २०:४; २७:२
कलस्सै. ४:१०प्रेका १२:१२; १५:३७; फिले २३, २४
कलस्सै. ४:१०रोम १५:७
कलस्सै. ४:१२कल १:७, ८
कलस्सै. ४:१४लूक १:३; प्रेका १:१
कलस्सै. ४:१४फिले २३, २४
कलस्सै. ४:१५रोम १६:५; १कर १६:१९
कलस्सै. ४:१६१थेस ५:२७
कलस्सै. ४:१७फिले १, २
कलस्सै. ४:१८२थेस ३:१७
कलस्सै. ४:१८फिलि १:७; फिले ९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
कलस्सैकर ४:१-१८

कलस्सैकर यांना पत्र

४ मालकांनो, स्वर्गात तुमचाही एक मालक आहे हे लक्षात ठेवून, आपल्या दासांशी नीतीने आणि न्यायाने वागा.+

२ बांधवांनो, नेहमी प्रार्थना करत राहा.+ या बाबतीत जागे राहा आणि उपकारस्तुती करा.+ ३ त्याच वेळी, आमच्यासाठीही प्रार्थना करा.+ हे यासाठी, की वचनाचा प्रचार करण्याकरता, म्हणजे ख्रिस्ताबद्दलचं पवित्र रहस्य घोषित करण्याकरता देवाने आमच्यासाठी संधीचं दार उघडावं. याच पवित्र रहस्यासाठी मी कैदेत आहे.+ ४ तसंच अशीही प्रार्थना करा, की मी ते जितक्या स्पष्टपणे घोषित केलं पाहिजे, तितक्या स्पष्टपणे मला ते करता यावं.

५ वेळेचा चांगला उपयोग करून* बाहेरच्यांशी सुज्ञपणे वागा.+ ६ तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ,* मिठाने रुचकर केल्यासारखं असावं,+ म्हणजे प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजेल.+

७ माझा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये असलेला विश्‍वासू सेवक आणि माझा सोबतीचा दास, तुखिक+ तुम्हाला माझ्याबद्दल सगळी माहिती देईल. ८ त्याने तुम्हाला आमची खुशाली कळवावी आणि तुमच्या मनाला दिलासा द्यावा, म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवत आहे. ९ तुमच्यातलाच एक असलेला माझा विश्‍वासू आणि प्रिय भाऊ अनेसिम+ याच्यासोबत तो येत आहे. इथे घडत असलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल ते तुम्हाला कळवतील.

१० माझ्यासोबत कैदेत असलेला अरिस्तार्ख+ तुम्हाला नमस्कार सांगतो. तसंच, बर्णबाचा नातेवाईक मार्क+ (ज्याच्याबद्दल तुम्हाला सूचना मिळाल्या होत्या, की तो आला तर तुम्ही त्याचं स्वागत करावं)+ ११ आणि युस्त म्हटलेला येशू हेसुद्धा तुम्हाला नमस्कार सांगतात. हे सुंता झालेल्यांपैकी आहेत. देवाच्या राज्यासाठी हेच माझे सहकारी आहेत आणि त्यांनी मला खूप सांत्वन दिलं आहे.* १२ तुमच्यापैकीच असलेला ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास+ तुम्हाला नमस्कार सांगतो. तुम्ही शेवटपर्यंत प्रौढांप्रमाणे आणि देवाच्या इच्छेबद्दल पक्की खातरी असलेल्यांप्रमाणे स्थिर उभं राहावं, म्हणून तो नेहमी तुमच्यासाठी जीव ओतून प्रार्थना करत असतो. १३ तुमच्यासाठी, तसंच लावदिकीया आणि हेरापली इथल्या सगळ्यांसाठी तो किती मेहनत घेतो, याची मी स्वतः साक्ष देतो.

१४ आपल्या सगळ्यांचा लाडका वैद्य लूक+ आणि देमास+ हेही तुम्हाला नमस्कार सांगतात. १५ लावदिकीयातल्या बांधवांना, तसंच नुंफा आणि तिच्या घरी जमणाऱ्‍या मंडळीला माझा नमस्कार सांगा.+ १६ हे पत्र तुमच्या इथे वाचल्यावर ते लावदिकीयातल्या मंडळीतही वाचायची व्यवस्था करा.+ आणि त्यांना पाठवलेलं पत्र तुमच्या इथे वाचायची व्यवस्था करा. १७ तसंच, अर्खिप्प याला सांगा:+ “प्रभूमध्ये तू स्वीकारलेली सेवा पूर्ण करण्याकडे लक्ष दे.”

१८ आणि आता मी पौल, स्वतःच्या अक्षरांत लिहून तुम्हाला माझा नमस्कार सांगतो.+ माझी तुरुंगवासातली बंधनं+ आठवणीत असू द्या. देवाची अपार कृपा तुमच्यावर असो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा