यशया
१ आमोजचा मुलगा यशया*+ याने यरुशलेम आणि यहूदा यांबद्दल एक दृष्टान्त पाहिला; त्याने हा दृष्टान्त यहूदाचे राजे+ उज्जीया,+ योथाम,+ आहाज+ आणि हिज्कीया+ यांच्या काळात पाहिला. तो दृष्टान्त असा:
२ हे आकाशांनो ऐका, हे पृथ्वी लक्ष दे,+ कारण यहोवा* असं म्हणाला आहे:
३ बैल आपल्या मालकाला चांगलं ओळखतो,
आणि गाढवालाही हे चांगलं माहीत असतं, की आपला मालक आपल्याला चारापाणी कुठे घालतो;
माझे स्वतःचे लोक समंजसपणे वागत नाहीत.”
४ या पापी राष्ट्राचा धिक्कार असो!+
अपराधांच्या भाराने वाकून गेलेल्या या लोकांचा धिक्कार असो!
दुष्ट माणसांच्या टोळीचा, भ्रष्टाचार माजवणाऱ्या मुलांचा धिक्कार असो!
त्यांनी यहोवाला सोडून दिलंय;+
त्यांनी इस्राएलच्या पवित्र देवाचा अपमान केलाय;
त्यांनी त्याच्याकडे आपली पाठ फिरवली आहे.
५ तुम्ही बंड का करत आहात? तुमच्या अंगावर मार द्यायला एकही जागा उरली नाही;+
तुमच्या संपूर्ण डोक्याला जखमा झाल्यात,
आणि तुमचं संपूर्ण हृदय रोगट झालंय.+
६ पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत काहीच निरोगी नाही.
तुमच्या संपूर्ण अंगावर घाव, वळ आणि ओल्या जखमा आहेत;
त्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत, त्यांना पट्ट्या किंवा तेल लावण्यात आलं नाही.+
७ तुमचा देश ओसाड पडलाय.
तुमची शहरं आगीने भस्म झाली आहेत.
विदेशी लोक तुमच्या डोळ्यांसमोर तुमच्या जमिनीचं पीक खात आहेत.+
तुमचा देश शत्रूंनी उद्ध्वस्त केल्यासारखा झालाय.+
८ सीयोनची मुलगी द्राक्षमळ्यातल्या मंडपासारखी* रिकामी पडली आहे,
ती काकडीच्या शेतातल्या झोपडीसारखी रिकामी पडली आहे.
शत्रूने वेढा घातलेल्या शहरासारखी ती झाली आहे.+
९ सैन्यांच्या देवाने, यहोवाने जर आपल्यापैकी काहींना जिवंत ठेवलं नसतं,
तर आपलीही अवस्था सदोमसारखी,
आणि आपली दशा गमोरासारखी झाली असती.+
१० हे सदोमच्या हुकूमशहांनो,* यहोवाचा संदेश ऐका.+
हे गमोराच्या लोकांनो, देवाच्या नियमाकडे* लक्ष द्या.+
११ यहोवा म्हणतो: “तुमच्या भरमसाट बलिदानांचा मला काय उपयोग?+
तुम्ही देत असलेली एडक्यांची होमार्पणं+ आणि धष्टपुष्ट प्राण्यांची चरबी+ मला नकोशी झाली आहे.
गोऱ्ह्यांच्या,*+ कोकरांच्या आणि बकऱ्यांच्या+ रक्ताने मला आनंद होत नाही.+
१२ तुम्ही माझ्यासमोर येता,+
माझ्या मंदिराची अंगणं पायांखाली तुडवता, पण तुम्हाला हे करायला कोणी सांगितलं?+
१३ यापुढे माझ्यासाठी व्यर्थ अन्नार्पणं आणू नका.
तुम्ही जाळत असलेल्या धूपाची मला किळस वाटते.+
तुम्ही नवचंद्राचा दिवस*+ व शब्बाथ+ पाळता आणि पवित्र मेळावे+ भरवता,
पण पवित्र मेळाव्यांसोबत तुम्ही जादूटोणा करता,+ हे मला अजिबात सहन होत नाही.
१४ तुमच्या नवचंद्राच्या दिवसांचा आणि सणांचा मला अगदी वीट आलाय.
ते मला ओझ्यासारखे झालेत;
ते ओझं वाहून मी थकून गेलोय.
१७ चांगलं ते करायला शिका, न्यायीपणे वागा,+
जुलूम करणाऱ्यांना सुधारा,
अनाथ मुलाच्या* हक्कांचं रक्षण करा,
आणि विधवेच्या बाजूने बोला.”+
१८ यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.+
तुमची पापं रक्तासारखी लाल असली,
तरी ती बर्फासारखी* शुभ्र केली जातील;+
ती किरमिजी रंगाच्या कापडासारखी लालभडक असली,
तरी ती लोकरीसारखी पांढरी होतील.
१९ तुम्ही जर माझं ऐकायला तयार असाल,
तर तुम्ही देशातलं उत्तम पीक खाल.+
२० पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि माझ्याविरुद्ध बंड केलं,
तर तुम्हाला तलवारीने मारून टाकलं जाईल.+
यहोवा स्वतः हे बोलला आहे.”
२१ पाहा! हे विश्वासू शहर+ कसं वेश्येसारखं बनलंय!+
२३ तुझे अधिकारी अडेल वृत्तीचे आणि चोरांचे साथीदार आहेत.+
त्यांच्यापैकी प्रत्येकाला लाच खायला आणि नजराण्यांच्या मागे धावायला आवडतं.+
२४ म्हणून खरा प्रभू, सैन्यांचा देव यहोवा,
इस्राएलचा जो शक्तिशाली देव, तो म्हणतो:
“आता पाहा! माझ्या शत्रूंचा मी माझ्यापुढून नाश करीन,
आणि माझ्या वैऱ्यांचा मी बदला घेईन.+
२५ मी तुझ्यावर आपला हात उगारीन.
क्षाराने धातू शुद्ध करतात, तसं मी तुझ्यातला गाळ काढून टाकीन,
तुझ्यातली सगळी अशुद्धता मी नाहीशी करीन.+
त्यानंतर तुला ‘नीतिमत्त्वाचं शहर, एक विश्वासू नगर’ म्हणून ओळखलं जाईल.+
२७ सीयोनची सुटका न्यायाने होईल,+
आणि परत येणाऱ्या तिच्या लोकांची सुटका नीतिमत्त्वाने होईल.
३० कारण पानं सुकून गेलेल्या मोठ्या वृक्षासारखे तुम्ही व्हाल,+
पाणी न घातलेल्या बागेसारखी तुमची अवस्था होईल.
३१ त्यांच्यातला शक्तिशाली माणूस वाळलेल्या गवतासारखा* होईल,
आणि त्याचं काम ठिणगीसारखं होईल;
ते दोन्ही एकत्र आगीत जळतील,
आणि कोणीही ती आग विझवू शकणार नाही.”