नीतिवचनं
१४ जी स्त्री खरंच बुद्धिमान असते, ती आपलं घर बांधते,+
पण मूर्ख स्त्री आपल्याच हातांनी ते पाडून टाकते.
३ मूर्खांचं गर्विष्ठ बोलणं काठीसारखं असतं,
पण बुद्धिमानांचे ओठ त्यांचं संरक्षण करतील.
४ गाय-बैल नसले, तर गोठा स्वच्छ राहतो,
पण बैलाच्या ताकदीमुळे भरपूर पीक मिळतं.
६ थट्टा करणारा बुद्धीचा शोध घेतो, तरी त्याला ती सापडत नाही,
पण ज्याच्याजवळ समजशक्ती असते, त्याच्यासाठी ज्ञान घेणं सोपी गोष्ट असते.+
१३ हसतानाही मन दुःखी असू शकतं
आणि आनंदाचा शेवट शोकाने होऊ शकतो.
१४ देवाचा अनादर करणारा आपल्या कामांचं फळ भोगेल,+
आणि चांगल्या माणसाला त्याच्या कार्यांचं प्रतिफळ मिळेल.+
१६ बुद्धिमान सावध असतो आणि वाइटापासून दूर राहतो,
पण मूर्ख बेपर्वा* असतो आणि फाजील आत्मविश्वास दाखवतो.
१७ लगेच रागावणारा मूर्खपणे वागतो,+
पण नीट विचार करून वागणाऱ्याचा द्वेष केला जातो.
१९ वाईट लोकांना चांगल्या लोकांपुढे झुकावं लागेल
आणि दुष्ट लोक नीतिमानांच्या फाटकांसमोर वाकतील.
२२ जे दुसऱ्याचं वाईट करण्याची योजना करतात, ते भरकटणार नाहीत का?
पण चांगलं करण्याची इच्छा असलेल्यांसोबत लोक एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्वासूपणे वागतील.+
२४ बुद्धिमानांची संपत्ती त्यांचा मुकुट आहे;
पण मूर्ख आपला मूर्खपणा सोडत नाहीत.+
२५ खरा साक्षीदार जीव वाचवतो,
पण खोटा साक्षीदार क्षणाक्षणाला लबाड बोलतो.
२६ यहोवाची भीती बाळगणारा सर्व गोष्टींत त्याच्यावर भरवसा ठेवतो+
आणि यामुळे त्याच्या मुलांना आश्रय मिळेल.+
२७ यहोवाची भीती म्हणजे जीवनाचा झरा;
ती माणसाला मृत्यूच्या सापळ्यांपासून वाचवते.
२८ मोठी प्रजा म्हणजे राजाचं वैभव,+
पण प्रजा नसलेल्या राजाची सत्ता टिकत नाही.
३१ दीनदुबळ्या माणसाची फसवणूक करणारा आपल्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,+
पण जो गरिबाला दया दाखवतो, तो देवाचा गौरव करतो.+
३२ दुष्टाचा त्याच्याच वाईट कामांमुळे नाश होईल,
पण नीतिमानाला त्याच्या खरेपणामुळे संरक्षण मिळेल.+
३३ समजशक्ती असलेला माणूस आपल्या बुद्धीचा दिखावा करत नाही,+
पण मूर्ख आपल्याला किती ज्ञान आहे, हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.