नीतिवचनं
३ माणसाचा स्वतःचा मूर्खपणा त्याला चुकीच्या मार्गाने नेतो
आणि त्याचं मन यहोवावर संतापतं.
४ संपत्ती आली की माणसाला बरेच मित्र मिळतात,
पण गरिबाचा एकुलता एक मित्रही त्याला सोडून देतो.+
५ खोट्या साक्षीदाराला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही,+
आणि जो क्षणाक्षणाला खोटं बोलतो तो सुटणार नाही.+
६ प्रतिष्ठित* माणसाची मर्जी मिळवण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात;
भेटवस्तू देणाऱ्या माणसाचा प्रत्येक जण मित्र असतो.
तो विनवण्या करत त्यांच्यामागे जातो, पण कोणीच त्याला उत्तर देत नाही.
८ जो समज मिळवतो, तो स्वतःवर* प्रेम करतो.+
जो समंजसपणाला मौल्यवान लेखतो, त्याला यश मिळेल.+
९ खोट्या साक्षीदाराला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही,
आणि जो क्षणाक्षणाला खोटं बोलतो त्याचा नाश होईल.+
१० ऐशआरामात राहणं मूर्खाला शोभत नाही,
मग सेवकाला अधिकाऱ्यांवर सत्ता चालवणं कसं शोभेल?+
१४ घर आणि संपत्ती वाडवडिलांकडून वारशाने मिळते,
पण सुज्ञ बायको यहोवाकडून मिळते.+
१५ आळशीपणामुळे गाढ झोप लागते;
सुस्त माणूस उपाशी राहील.+
१९ तापट स्वभावाच्या माणसाला दंड भोगावा लागेल;
जर तू एकदा त्याला वाचवलंस, तर तुला पुन्हापुन्हा तसं करावं लागेल.+
२२ दुसऱ्यांवर प्रेम करणाऱ्या माणसाला चांगलं म्हटलं जातं;+
खोटं बोलण्यापेक्षा गरीब असलेलं बरं.
२३ यहोवाची भीती जीवनाकडे नेते;+
जो ती बाळगतो त्याचं कोणतंही नुकसान होणार नाही, त्याला चांगली विश्रांती मिळेल.+
२४ आळशी माणूस मेजवानीच्या ताटात हात तर घालतो,
पण तो तोंडाजवळ नेण्याचाही त्रास तो घेत नाही.+
२५ थट्टा करणाऱ्याला मार दे,+ म्हणजे अनुभव नसलेल्याला शहाणपण येईल,+
आणि समजूतदार माणसाला ताडन दे, म्हणजे त्याचं ज्ञान वाढेल.+
२६ जो मुलगा आपल्या वडिलांशी वाईट वागतो आणि आपल्या आईला हाकलून देतो,
तो लाज वाटण्याचं आणि अपमानित होण्याचं कारण ठरतो.+
२७ माझ्या मुला, जर तू ताडनाकडे दुर्लक्ष केलंस,
तर तू ज्ञानाच्या मार्गापासून भरकटशील.