नीतिवचनं
२० द्राक्षारसाने माणसाची थट्टा होते+ आणि दारूने तो बेफामपणे वागतो;+
यांमुळे जो वाईट मार्गाला लागतो तो बुद्धिमान नाही.+
४ आळशी माणूस हिवाळ्यात नांगरणी करत नाही,
त्यामुळे कापणीच्या वेळी त्याच्याकडे काही नसेल तेव्हा त्याला भीक मागावी लागेल.*+
६ एकनिष्ठ प्रेमाची भाषा बरेच जण करतात,
पण विश्वासू माणूस सापडणं कठीण आहे.
७ नीतिमान माणूस खरेपणाने चालतो.+
त्याच्यामागे त्याची मुलं सुखी होतात.+
९ “मी माझं मन शुद्ध केलंय;
मी पापापासून मुक्त झालोय,” असं कोण म्हणू शकतो?+
११ लहान मुलालाही त्याच्या वागणुकीवरून ओळखता येतं;
त्याची वृत्ती योग्य आणि शुद्ध आहे की नाही, हे त्याच्या वागण्यावरून कळतं.+
१२ ऐकणारे कान आणि पाहणारे डोळे
दोन्ही यहोवाने बनवले आहेत.+
१३ झोपेवर प्रेम करू नकोस, नाहीतर तुझ्यावर गरिबी येईल.+
डोळे उघड, म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल.+
१४ विकत घेणारा, “हे चांगलं नाही, ते चांगलं नाही,” असं म्हणतो;
नंतर जाऊन तो स्वतःबद्दल बढाई मारतो.+
१६ जर कोणी अनोळखी माणसाचं कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याचं वस्त्र घे;+
त्याने वाईट चालीच्या स्त्रीचं* कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याच्याकडून तारण जप्त कर.+
१७ फसवणूक करून मिळवलेली भाकर माणसाला गोड लागते,
पण नंतर त्याच्या तोंडात माती पडेल.+
१९ बदनामी करणारा गुप्त गोष्टी सांगत फिरतो;+
ज्याला इतरांबद्दल गप्पागोष्टी करायला आवडतं* त्याची संगत धरू नकोस.
२० जो आपल्या आईवडिलांना शाप देतो,
त्याचा दिवा, अंधार पडल्यावर विझवून टाकला जाईल.+
२१ हाव धरून मिळवलेला वारसा
शेवटी फायद्याचा ठरणार नाही.+
२२ “मी वाइटाचा बदला घेईन,” असं म्हणू नकोस.+
यहोवावर भरवसा ठेव+ म्हणजे तो तुला वाचवेल.+
२३ चुकीच्या वजनांची* यहोवाला घृणा वाटते;
फसवा तराजू वापरणं योग्य नाही.
२४ कोणत्या मार्गाने जावं हे* माणसाला कसं कळेल?
माणसाच्या पावलांना यहोवा वाट दाखवतो.+
२५ विचार न करताच, “हे पवित्र आहे,” असं म्हणणं
आणि केलेल्या नवसाबद्दल नंतर विचार करणं, माणसासाठी पाश ठरू शकतं.+
२७ माणसाचा श्वास हा यहोवाचा दिवा आहे,
त्याने तो माणसाचं अगदी खोलवर परीक्षण करतो.