नीतिवचनं
९ खऱ्या बुद्धीने आपलं घर बांधलंय;
तिने सात खांबांवर ते उभारलंय.
४ “जे भोळे आहेत,* त्यांनी इथे यावं.”
ज्यांना समज नाही, त्यांना ती म्हणते:
५ “या, माझ्याकडची भाकर खा
आणि मी तयार केलेला द्राक्षारस प्या.
७ जो थट्टा करणाऱ्याची चूक सुधारतो, तो आपला अपमान करून घेतो+
आणि जो दुष्टाचं ताडन करतो त्याचं नुकसान होईल.
८ थट्टा करणाऱ्याचं ताडन करू नकोस, नाहीतर तो तुझा द्वेष करेल.+
बुद्धिमानाचं ताडन कर, म्हणजे तो तुझ्यावर प्रेम करेल.+
९ बुद्धिमान माणसाला ज्ञान दे, म्हणजे तो आणखी बुद्धिमान होईल.+
नीतिमानाला शिकव, म्हणजे तो आपलं ज्ञान वाढवेल.
१२ तू बुद्धिमान झालास, तर तुलाच त्याचा फायदा होईल,
पण थट्टा करत राहिलास, तर तुलाच त्याचे परिणाम भोगावे लागतील.
१३ मूर्ख स्त्री मोठमोठ्याने बोलते.+
तिला कसलंही ज्ञान नसतं; कशाचीच माहिती नसते.
१५ ती येणाऱ्या-जाणाऱ्यांना;
आपल्या रस्त्याने सरळ जाणाऱ्यांना हाक मारून म्हणते:
१६ “जे भोळे आहेत, त्यांनी इथे यावं.”
ज्यांना समज नाही त्यांना ती म्हणते:+