नीतिवचनं
४ नम्र राहिल्याने आणि यहोवाची भीती बाळगल्याने
संपत्ती, गौरव आणि जीवन मिळतं.+
५ कपटी माणसाच्या मार्गात काटे आणि पाश असतात,
पण जो आपल्या जिवाची कदर करतो तो त्यांच्यापासून दूर राहतो.+
९ उदार माणसाला आशीर्वाद मिळेल
कारण तो गरिबाला आपल्या घासातला घास देतो.+
१२ यहोवाचे डोळे ज्ञानाचं रक्षण करतात,
पण विश्वासघात करणाऱ्याचे शब्द तो खोटे ठरवतो.+
१३ आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे!
मी भर चौकात मारला जाईन!”+
१४ वाईट चालीच्या* बायकांचं तोंड म्हणजे खोल खड्डा.+
यहोवाने ज्याला धिक्कारलंय तो त्यात पडेल.
१७ माझ्या ज्ञानाकडे आपलं मन लाव+
आणि बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक;+
१८ ते मनात खोल रुजवणं चांगलं आहे,+
कारण त्यामुळे ते सतत तुझ्या ओठांवर राहतील.+
१९ तू यहोवावर भरवसा ठेवावा
म्हणून मी आज तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगत आहे.
२० सल्ला आणि ज्ञान देणाऱ्या गोष्टींबद्दल
मी आधीच तुला लिहिलं नाही का?
२१ ज्याने तुला पाठवलं त्याच्याकडे तुला अचूक माहिती नेता यावी,
म्हणून तुला खऱ्या आणि भरवशालायक गोष्टी शिकवण्यासाठी मी असं केलं.
२३ कारण यहोवा त्यांना न्याय मिळवून देईल+
आणि त्यांना लुबाडणाऱ्यांना तो ठार मारेल.
२४ तापट माणसाशी मैत्री करू नकोस
आणि लगेच रागावणाऱ्याची संगत धरू नकोस,
२५ नाहीतर तूही त्याच्यासारखं वागायला शिकशील
२६ हात मिळवून हमी देणाऱ्यांपैकी
आणि कर्जासाठी जामीन राहणाऱ्यांपैकी असू नकोस.+
२७ तुला परतफेड करता आली नाही,
तर तुझ्या अंगाखालचं अंथरूण काढून घेतलं जाईल!
२८ तुझ्या वाडवडिलांनी फार पूर्वी ठरवलेली
सीमेची खूण तिच्या जागेवरून हलवू नकोस.+
२९ आपल्या कामात कुशल असलेला माणूस तू पाहिला आहेस का?
तो सर्वसामान्य लोकांसमोर नाही,
तर राजांसमोर उभा राहील.+