नीतिवचनं
२३ तू राजासोबत जेवायला बसलास,
तर आपल्यासमोर काय आहे याचा नीट विचार कर.
२ तू खादाड असशील,
तर आपल्या गळ्याला सुरी लाव.*
३ त्याच्या पंचपक्वान्नांची हाव धरू नकोस,
नाहीतर त्यांमुळे तू फसशील.
४ संपत्ती मिळवण्यासाठी आपली शक्ती वाया घालवू नकोस.+
थांबून विचार कर आणि समजूतदारपणा दाखव.*
६ कंजूस माणसाकडे जेवू नकोस;
त्याच्या पंचपक्वान्नांची हाव धरू नकोस.
७ कारण तो हिशोब ठेवतो;
“पोटभर खा, प्या” असं तो म्हणत असला, तरी ते मनापासून नसतं.*
८ तू जे काही खाल्लंस, ते ओकून टाकशील
आणि तू केलेली स्तुती वाया जाईल.
१२ शिक्षणाकडे मन लाव
आणि बुद्धीच्या वचनांकडे लक्ष दे.
१३ मुलाला* शिस्त लावायला मागेपुढे पाहू नकोस.+
छडीने मारल्यामुळे तो काही मरणार नाही.
१६ तुझ्या ओठांतून खऱ्या गोष्टी निघतील,
तेव्हा मला अगदी मनापासून आनंद होईल.
१७ आपल्या मनात पापी लोकांचा हेवा करू नकोस,+
तर दिवसभर यहोवाची भीती बाळग,+
१८ म्हणजे तुझं भविष्य उज्ज्वल होईल+
आणि तुझी आशा नाहीशी होणार नाही.
१९ माझ्या मुला, ऐक आणि बुद्धिमान हो,
तुझ्या मनाला योग्य मार्ग दाखव.
२१ कारण दारुड्या आणि खादाड माणसावर दारिद्र्य येईल,+
आणि गुंगीमुळे त्याला चिंध्या घालाव्या लागतील.
२४ नीतिमानाचा पिता नक्कीच आनंदी होईल;
जो बुद्धिमान मुलाला जन्म देतो, तो त्याच्यामुळे खूश होईल.
२५ तुझे आईवडील आनंदी होतील,
जिने तुला जन्म दिला ती हर्ष करेल.
२६ माझ्या मुला, माझ्याकडे मनापासून लक्ष दे,
माझ्या मार्गांनी चालण्यात आनंद मान.+
२८ ती लुटारूंसारखी टपून बसते;+
ती धोकेबाज माणसांची संख्या वाढवते.
२९ कोण दु:खी आणि बेचैन आहे?
कोण सारखं-सारखं भांडतं आणि तक्रारी करतं?
कोणाला विनाकारण जखमा होतात? कोणाचे डोळे निस्तेज दिसतात?
३१ प्याल्यात चमकणाऱ्या आणि सहज गळ्याखाली उतरणाऱ्या
द्राक्षारसाच्या लाल रंगाकडे पाहू नकोस.
३२ कारण शेवटी तो सापासारखा दंश करतो;
त्याच्या तोंडातून विषारी सापासारखं जहर निघतं.
३४ तू समुद्राच्या मधोमध पडलेल्या,
डोलकाठीच्या* टोकावर झोपलेल्या माणसासारखा होशील.
३५ तू म्हणशील: “त्यांनी मला फटके मारले, पण मला लागलंच नाही.*
त्यांनी मला मारलं तरी मला कळलं नाही.
मी कधी जागा होईन+
आणि आणखी एक प्याला पिईन?”