शिष्य बनविण्यास आम्हास सहाय्य करणाऱ्या सभा
मार्च १२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १८० (१००)
१० मिः स्थानिक घोषणा. मे मध्ये सहाय्यक पायनियरिंग करण्याची योजना आत्ताच करा. एप्रिल व मे मध्ये तुम्हास लागणाऱ्या अधिक मासिकांची मागणी आत्ताच करा. कोणती जुनी पुस्तके उपलब्ध आहेत त्याची माहिती मंडळीस द्या.
२० मिः “कुशल कार्यकर्ते देवाच्या वचनास योग्यपणे उपयोगात आणतात.” प्रश्नोत्तराने चर्चा. वेळ असेल त्याप्रमाणे शास्त्रवचनांचे वाचन करावे. यावर जोर द्या की आम्ही उपाध्याय आहोत. यास्तव पवित्र शास्त्राचा उपयोग करण्यात कुशल असावे म्हणून श्रम करावेत. केवळ प्रकाशने खपविण्यात समाधान मानू नये. शाळा देखरेखे किंवा सेवा देखरेखे हे नवोदित प्रचारकास न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन (१९८४ ची आवृत्ती) ची वैशिष्ट्ये समजावीत आहेत हे प्रात्यक्षिक करावे.
१५ मिः प्रश्न पेटी. वडीलाकरवी भाषण. जरुरीप्रमाणे स्थानिक परिस्थितीला अनुसरुन विशेष सूचनांचा उल्लेख करावा. उपस्थितांना चर्चेत समाविष्ठ करू शकता.
गीत १९० (१०७) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च १९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ८५ (४४)
१० मिः स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. या आठवड्याच्या शेवटी सर्वांना क्षेत्रकार्याला येण्याचे उत्तेजन द्या. नवीन मासिकातील लेखांचा स्थानिक क्षेत्रावर कसा चांगला उपयोग करता येईल त्याविषयीची उजळणी. जमाखर्च अहवाल. संस्थेकडून देणगीविषयी फेब्रुवारीत काही पोचपत्र आले असेल तर ते वाचावे. स्थानिक बंधूंनी मंडळीला दिलेल्या आर्थिक साहाय्याविषयी त्यांचे अभिनंदन करा.
१५ मिः “मासिकांच्या उल्लेखनीय विषयांची प्रस्तुति.” भाषण व साहित्याची काही प्रश्नांच्या आधाराने चर्चा. रस्त्यावरील साक्षीकार्यात, अनौपचारिक साक्ष देताना किंवा मासिक मार्गावरील काही अनुभवांचा समावेश करा.
२० मिः मासिक वितरणाविषयीच्या काही व्यवहारी सूचना. पुढील सूचनांची चर्चा करा व ज्या प्रचारकांना त्या उपयोगात आणल्यामुळे यश मिळाले आहे अशांचे अनुभव सांगाः (१) मासिकांचे वाचन व लेखांची ओळख करून घेणे. (२) असे लेख निवडा की जे त्या भागातील रहिवाशांचे चित्त आकर्षित करतील. (३) मासिकांद्वारे सायंकाळचे साक्षीकार्य करा. (४) केवळ एकाच विषयावर बोला आणि एकाच मासिकाची ओळख द्या व दुसरे त्याच्या सोबतीत असणारे आहे एवढेच सांगा. (५) सावकाश, स्पष्ट व मित्रत्वाच्या सुरात बोला. स्थानिक क्षेत्रात मासिकांचे वितरण करीत असता या व्यवहारी सूचना अनुसरण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
गीत ६ (४) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च २६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २०७ (११२)
८ मिः स्थानिक घोषणा. यासोबतच आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या क्षेत्रकार्याच्या योजना जाहीर कराव्यात. ईश्वरशासित वृत्त.
७ मिः कौटुंबिक पवित्र शास्त्राभ्यास नित्याने चालविण्यामागील फायदे. भाषण. आज कित्येक दशके यहोवाची संस्था कुटुंब प्रमुखांना आपापल्या कुटुंबियासोबत नित्य नियमाने शास्त्राभ्यास चालविण्याचे उत्तेजन देत आहे. जेथे जेथे हे होत आहे तेथे कितीतरी फायदे मिळाले आहेत. या अभ्यासाने त्या कौटुंबिक वर्तुळात प्रेम व शांतीच्या आत्म्याची प्रबलता वाढविली. मुले यहोवाचे समर्पित सेवक बनण्यात प्रगति करू शकली आणि स्थानिक मंडळीत हितकारक प्रभाव घडला गेला. शिवाय त्यांनी पूर्ण वेळेचे कार्य करण्यात पदार्पण केले. त्यांची ही पदन्नोती पाहून त्यांच्या पालकांना तसेच इतरांना मोठा आनंद मिळाला.
१७ मिः युवकांच्या हृदयाप्रत पोहंचणे. युवकांच्या साहाय्यार्थ तयार करण्यात आलेल्या खास प्रकाशनातील काही मुद्यांची चर्चा वडील करतात. नित्याच्या कौटुंबिक अभ्यासाव्यतिरिक्त प्रसंगानुरुप ज्या आध्यात्मिक विषयावरील प्रश्नांची चर्चा रंगते तिजमुळे कौटुंबिक सदस्यांचा फायदा होतो. अशा एका कुटुंबाचे प्रात्यक्षिक दाखवा जेथे बाप व मुलांची आपसात उबदार चर्चा चालू आहे. चर्चेत प्रश्नोत्तर नव्हे तर माहितीयुक्त विचारविनिमय चाले आहे. एक मुलगा विचारतो की, तो शेजारच्या मुलांसोबत चेंडू खेळण्यास जाऊ शकतो का? चर्चचा रोख यंग पीपल आस्क पुस्तकातील पृष्ठ ६४-७ कडे वळवला जातो. पालक काही शोधक प्रश्न विचारुन हे बघतात की, मुलाला या विषयासंबंधाने असणारी शास्त्रवचनीय तत्त्वे समजली का व तो त्याच्याशी सहमत आहे का. निकटचे मित्र त्याच्याच वयाचे असण्याची गरज नाही यावर जोर द्या. ज्यांनी या पुस्तकाचे काही भाग वाचलेले आहेत अशा काही युवकांची निवड करा व त्यांनी हेरलेले परिक्षण सांगू द्या. कोणता विषय त्यांना अधिक साहाय्यक वाटला तो त्यांना दाखवू द्या. युवकांना ते पुस्तक वाचण्याचे उत्तेजन द्या. पालकांनीही त्यातील माहिती स्वतःस चांगली परिचित करून घेण्याची गरज दाखवा की ज्यामुळे याचा कौटुंबिक चर्चेत लाभ घडू शकेल.
१३ मिः वडील अशा पालकांची मुलाखत घेतात ज्यांना आपल्या मुलांना सत्यात वाढविण्यात यश मिळाले आहे. जो आनंद मिळाला तसेच घरात नित्य, अर्थभरीत असा कौटुंबिक अभ्यास चालविण्यात व चर्चा करण्यात कशाने मदत प्राप्त झाली त्यावर भर द्या. पालकांनी आपला कौटुबिक अभ्यास नियमितपणे चालवावा आणि युवकांनी याला आपला सहयोग द्यावा हे उबदार अपील करा. परिस्थिती नेहमीच मनाजोगी असेल असे नाही. यासाठीच कुटुंबातील सर्वांनी सहकार्य दिले पाहिजे. असे केल्यामुळे ते एकमेकांना जीवनाच्या मार्गावर टिकून राहण्यात साहाय्य करू शकतील.—१ तीमथ्य ४:१६.
गीत १२३ (६३) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७२ (९२)
५ मिः स्थानिक घोषणा. सर्व्हायवल पुस्तकाच्या प्रती घेऊन क्षेत्रकार्यात त्यांचा सादरतेसाठी उपयोग करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
२२ मिः “सुवार्ता सादरता—वैयक्तीक खात्रीसह.” लेखाची प्रश्नोत्तराने चर्चा.
१८ मिः “पायनियरिंग करण्याद्वारे यहोवावरील दृढ विश्वास व्यक्त करणे.” सेवा देखरेख्यांमार्फत या लेखाची उबदार, उत्तेजित अशी प्रश्नोत्तराची चर्चा. एक किंवा दोन पायनियरांची मुलाखत घ्या व त्यांना अडचणींना तोंड देऊनही त्यात कसा आनंद मिळतो ते ठळकपणे सांगू द्या. पायनियरांना व्यवहारी साहाय्य देण्यात स्थानिकपणे काय केले जात आहे ते सांगा.
गीत १४ (६) व समाप्तीची प्रार्थना.