वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९० पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • ऑडिओ रेकॉर्डिंग्स—यांचा उपयोग कसा कराल?
    आपली राज्य सेवा—२०१५
  • प्रश्‍नपेटी
    आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—१९९०
km ४/९० पृ. ३

प्रश्‍न पेटी

● यहोवाच्या साक्षीदारांनी संस्थेकरवी पुरवठा होणाऱ्‍या टेप रेकॉर्डिंगशिवाय इतर उगमाकडे कोणत्या दृष्टीकोणातून पहावे?

संस्था आज आध्यात्मिक अन्‍नाचा पुरवठा, ज्यात टेप रेकॉर्डिंगचाही समावेश आहे, अनेक रुपात करीत आहे. ही कॅसेट रेकॉर्डिंग आज स्वतः पवित्र शास्त्र, संस्थेकरवी प्रकाशित होणाऱ्‍या द वॉचटावर व अवेक! पाक्षिकांची, माय बुक ऑफ बायबल स्टोरिज आणि थोर शिक्षकाचे ऐका या पुस्तकांची, किंग्डम मेलडीज्‌ तसेच अनेक नाटकांची उपलब्ध आहे; तरीही आम्ही खाजगीरित्या तयार केलेल्या व तशाच असल्याचे भासवून खपविल्या जाणाऱ्‍या टेप्सपासून सावध राहणे बरे! कारण, आमचे आपसात एवढे विश्‍वस्त बंधुत्व असल्यामुळे, काही जन त्यांच्या मूळ उगमाची तितकीशी चौकशी न करता, टेप्स स्विकारतील व ऐकतील.

काही वेळा अशी भाषणे भरलेल्या ध्वनीफिती असतील ज्यात स्वतर्कावर अधिष्ठित वक्‍तव्ये किंवा सनसनाटी बातम्यांचा अंतर्भाव असेल. मग, याच अनुरोधात आम्ही २ तीमथ्य ३:१४ मध्ये पौलाने दिलेला उपदेश अनुसरणे शहाणपणाचे ठरणार नाही का? त्यात पौलाने दुष्ट व भोंदू मनुष्ये यांजबद्दलचा इशारा दिल्यानंतर आपण कोणाकडून काय ऐकत आहोत हे चांगल्याप्रकारे जाणून घेण्यावर जोर दिला आहे. यास्तव, आम्ही ही खात्री केली पाहिजे की जे काही आम्ही ऐकतो ते “शास्त्रलेखापलिकडे” म्हणजेच पवित्र शास्त्रवचन आणि “विश्‍वासू व बुद्धीमान दास” वर्गाने पुरविलेल्या आध्यात्मिक अन्‍नापलिकडे नाही.—१ करिंथ ४:६; मत्तय २४:४५-४७.

काही देशात लेकरांना पवित्र शास्त्राचे शिक्षण देणाऱ्‍या ध्वनिफिती म्हणून जाहिराती देऊन विकल्या जातात. या टेप्सवर मूळ अविर्भाव बंधूंचा असतो, आणि काही मंडळ्यातून त्या खपविल्याही जातात. त्यामागील हेतू जरी दिसण्यास चांगला वाटला तरी हे ईश्‍वरशासित संबंधाचा गैरफायदा करवून घेण्याजोगे ठरणार नाही का? (पहा, आमची राज्य सेवा जुलै १९७७ पृष्ठ ४; आणि जानेवारी १९८० पृष्ठ ४; आमचे राज्याचे उपाध्यपण ऑक्टोबर १९८७ पृष्ठ ३) आमच्या लेकरांना तालीम देण्यास, पवित्र शास्त्र वचनावर आधारीत असलेले कितीतीरी साहित्य यहोवाची स्तुती पुरवीत आहेत. यास्तव अशा प्रकारच्या टेप्सचे वितरणास आम्ही काट देऊ इच्छितो.

काहीजण व्यक्‍तीगत उपयोगासाठी मंडळीच्या सभांचा, सम्मेलनाच्या तसेच प्रांतिय अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण करतात. हे ध्वनिमुद्रण, ज्या बंधूंना काही कारणास्तव सभांना उपस्थित राहता आले नाही, अशांना कदाचित आवडेल. तथापि, यांचा इतर सर्वसाधारण बांधवात वितरीत करण्यासाठी किंवा इतरांना विक्रीस देण्यात उपयोग करू नये, यहोवाने त्याच्या संस्थेकरवी आमच्या आध्यात्मिक उन्‍नतीकरता जे सर्व पुरविले त्याचा आमच्या आध्यात्मिक उत्तेजनार्थ व उभारणीस्तव उपयोग करावा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा