सुवार्ता सादरता
वारंवार उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात
१ वारंवार उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात प्रचार करणे खास आव्हानांना उभे करते. यावेळी तुम्ही आपल्या संदेशाला ताजेपणा तसेच अपीलकारकपणा कसा देता? ज्यांनी ऐकायचेच नाही असा निर्धार करून घेतल्याचे दिसते अशांच्या बाबतीत कोणता पवित्रा घेण्यास हवा? जे लोक म्हणतात की, आम्ही वारंवार का येतो अशांना काय म्हणता येऊ शकते? अशा वारंवार उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात प्रकाशनांचे साधेपणात वितरण करण्याची योजना कशी अंमलात आणली जाऊ शकते?
सरळ मनोदय ठेवा
२ काहींचे प्रतिकूल मत असेल पण, वस्तुतः वारंवार उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात, कमी वेळा केल्या जाणाऱ्या क्षेत्रापेक्षा बहुधा चांगले परिणाम दिसून येतात. यासाठी पहिले अडखळण की, त्याच त्याच घरी वारंवार भेट घेण्याविषयी असणारा कोणताही नकारात्मक विचार काढून टाकणे जरुरीचे आहे. लोकांना राज्याचा संदेश ऐकण्याची प्रत्येक संधि दिली गेली पाहिजे. आम्ही वेळोवेळी भेट दिली असताही लोक जर ऐकत नाही तर यहोवाने अशांचा प्रतिकूल न्याय केलाच आहे असा निर्णय आम्ही घेणे हे चुकीचे असणार.
३ वारंवार उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात सहकाऱ्यांविषयीची समभावना राखणे हे खासपणे महत्त्वाचे आहे. स्थानिकपणे जवळच्या लोकांच्या बाबतीत काय घडत आहे हे सांगणारा निश्चित संदेश दिला तर तो जे बहुधा ऐकण्याचा कल राखून नाहीत अशांवर सरळ स्वरुपाचा परिणाम घडवून आणील. तुम्ही अलिकडील घटनांशी परिचित आहात का, तसेच लोकांना ज्या समस्या भेडसावून आहेत त्याबद्दल पवित्र शास्त्र संदेश कशी मदत देऊ शकतो हे दाखवण्याची तुमची तयारी आहे का?
पवित्रा बदलत राहा
४ वारंवार उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात आपला पवित्रा बदला. एकेवेळी तुम्ही आपणापाशी असलेल्या हस्तपत्रिकेचा वापर प्रस्तावना म्हणून करू शकता. दुसऱ्या वेळी रिझनिंग पुस्तकातील ९ ते १५ पृष्ठांवर देण्यात आलेल्या ४० विविध प्रस्तावनांपैकी साजेशी अशी स्थानिक घटनांना जोडून वापरु शकता. तुम्हाला या जवळच्या क्षेत्रातच अलिकडे केव्हा भेट द्यावी लागली त्याचाही उल्लेख करा म्हणजे आक्षेप समोर न येण्याचा आधार राहील. गेल्या भेटीच्या वेळी घरमालकाने काढलेले अर्थभरीत उद्गार जर तुम्ही नोंदून घेतले तर याचा यावेळी आस्था निर्माण करणारे संभाषण सुरु करण्यात एक टप्पा म्हणून उपयोग करता येईल.
५ लोकांना यहोवाच्या दृष्टीकोनातून बघा आणि ज्यांनी असे म्हटले होते की, त्यांना मुळीच आस्था नाही, अशांबद्दल काळजी दाखवण्याचे चालू ठेवा. प्राचीन लोकांनी यहोवाने पाठविलेल्या संदेशवाहकांकडे उदासीन वृत्ती दाखवली तरी तो त्यांना पुनःपुन्हा अपील करीत राहिला. (२ इतिहास ३६:१५; यिर्मया ७:१३) जे कित्येक जण पूर्वी आस्थेवाईक नाहीत असे वाटले होते तेच आज आमचे भाऊ-बहिणी आहेत. कडक विरोधकांनाही सत्यात जिंकण्यात आले आहे. हे लोक आज अत्यंत कृतज्ञ आहेत की, कोणीतरी त्यांच्याकडे वारंवार भेट देऊन त्यांना सुवार्ता सादर केली.
चांगली नोंद ठेवा
६ घरोघरच्या कार्याची चांगली नोंद ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे घरी भेटले नाहीत अशांची पुन्हा भेट घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे आमचे क्षेत्र पूर्ण रुपाने उरकले जाते व घरी भेटलेल्या लोकांमुळे आमच्या तासांमध्ये वाढ होते. आठवड्याच्या मधल्या दिवशी काम करताना जे घरी आढळले नाहीत अशांची केलेली नोंद आठवड्याच्या शेवटी काम करणाऱ्या प्रचारकांना सुपुर्द करण्याची चांगली गोष्ट काही प्रचारकांना आढळली आहे. यामुळे घरमालकांची भेट घेतल्या जाणाऱ्या वेळेत बदल तर होतोच पण सोबत जे विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट दिवशी घरी सापडत नाहीत अशांना घरी आढळण्याची शक्यता वाढली जाते. याबद्दलचे अधिक प्रस्ताव द वॉचटावरच्या जुलै १५, १९८८ च्या अंकात पृष्ठ १५-२० वर आढळू शकतील.
७ ऐकू शकतील अशा सर्व लोकांच्या बाबतीत पुरेसे प्रयत्न करण्यात आले आहेत हे यहोवा ठरवील. यास्तव, ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली आपण त्याच्या आज्ञेचे पालन करीत राहू या आणि आमचे काम हे योजिलेल्या वेळेत उरकले जाईल याबद्दल आत्मविश्वास राखू या.—यहे. ९:११.