मार्चसाठी सेवा सभा
मार्च ९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ६३ (३२)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. मासिकाचे अलिकडील अंक वापरुन मासिक सादरता दाखवा. सप्ताहाच्या शेवटाला गटाचे साक्षीकार्य करण्याचे उत्तेजन द्या.
२० मि: “मार्चच्या सादरतेसाठी आपली तयारी करा” (१० मि.) प्रश्नोत्तरे. (८ मि.) तुमच्या क्षेत्रात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या प्रस्तावांपैकीच्या दोन किंवा तिघांचे चांगली तयारी केलेले प्रात्यक्षिक सादर करा. (२ मि.) सर्वांना एक किंवा सर्वच सुचविलेल्या प्रस्तुति शिकून घेऊन त्यांचा उपयोग करण्याचे प्रोत्साहन द्या.
१५ मि: “आदाम व हव्वा,” रिझनिंग पुस्तक, पृष्ठ २७-९. (५ मि.) “वेअर ॲडम ॲण्ड इव्ह मिअरली ॲलेगोरीकल (फिक्शनल) पर्सन्स?” या उपशीर्षकावर आधारलेले प्रास्ताविक भाषण. (६ मि.) प्रचारक एका व्यक्तीची पुनर्भेट घेत असल्याचे दृश्य, जेथे त्याने घरमालकाला “वॉस ॲडम्स् सीन गॉडस् वील, गॉडस् प्लॅन?” हा प्रश्न मागील वेळी विचारला होता. (४ मि.) पुनर्भेटीसाठी रिझनिंग पुस्तकातील “इफ समवन सेस—” हे सदर संभाषणाचा विषय म्हणून वापरण्याचे उत्तेजन द्या. आणखी उदाहरणे दाखवा.
गीत ३० (११७) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च १६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २१५ (३४)
१० मिः स्थानिक घोषणा. आठवड्यासाठी नियोजित असणाऱ्या कार्याच्या व्यवस्था सांगा. या आठवडी व या महिन्यात पुनर्भेटीसाठी अधिक प्रयत्न करण्याचे उत्तेजन द्या. आजची ही सभा आस्थेवाईक लोकांच्या पुनर्भेटी घेण्यासंबंधाने चार व्यावहारिक मार्गांचे स्पष्टीकरण व सादरता करील. यापैकीच्या एक वा अधिकाचा या आठवडी उपयोग करा.
२० मिः “परत भेट घेताना संभाषण सुरु करणे.” (३ मि.) परिच्छेद १ व २ मधील मुद्यांवर प्रास्ताविक भाषण. (१५ मि.) परिच्छेद ३-५ मधील तीन वेगवेगळ्या सादरतेसंबंधाची प्रत्येकी चांगली तयारी केलेली प्रात्यक्षिके. वेळ मिळेल त्यानुसार प्रत्येक सादरतेनंतर त्यातील व्यावहारिकतेच्या मोलाची स्पष्टता करणारे विवेचन मांडा. (२ मि.) परिच्छेद ६ मधील विचार बोलून दाखवा, सर्वांना, आस्था दाखविणाऱ्या लोकांशी संभाषण सुरु करण्यासंबंधाने सुचविलेल्या निदान एक तरी प्रस्तावाची तयारी करून तो वापरण्याचे उत्तेजन द्या.
१५ मिः “तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करता येईल का?” मागे पायनियरींग केलेल्या व आता पुन्हा एप्रिल व मे मध्ये पायनियरींग करण्याची योजना आखलेल्या अनेक प्रचारकांसोबत वडीलांद्वारेची चर्चा. लेखातील मुद्दे हाताळताना, प्रचारक, आपल्याला साहाय्यक पायनियरींग करण्याची का इच्छा आहे त्याचे स्पष्टीकरण करतात. त्यांना मिळालेले आशीर्वाद तसेच तासांची गरज पूर्ण करण्यासाठी जे फेरबदल करावे लागले त्याबद्दल कळवितात. चर्चा साहाय्यक पायनियरींग कार्याच्या आनंदावर अधिक भर देते आणि सर्वांना त्यांची परिस्थिती मुभा देत असल्यास या सेवा हक्काचा जरुर विचार करण्याचे उत्तेजन द्या.
गीत ११४ (६१) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च २३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २११ (१०५)
१० मिः स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल, आणि संस्थेकडून मिळालेल्या अनुदान पोचपावतीची माहिती. राज्य आस्थेसाठी बंधुजनांनी जो हातभार लावला त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. प्रचारकांना या आठवड्याच्या शेवटी कार्य करण्याचे उत्तेजन द्या.
२० मिः “पुनर्भेट घेण्याची खात्री बाळगा.” प्रश्नोत्तर व प्रात्यक्षिके. परिच्छेद ५चा विचार केल्यावर एका व्यक्तीकडे मागे हस्तपत्रिका सोडली होती, त्याची पुनर्भेट घेत असल्याचे दाखवा. चर्चा लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील पवित्र शास्त्र अभ्यासाकडे नेते. परिच्छेद ६चा विचार केल्यावर मागे प्रकाशन नाकारले अशा व्यक्तीची परत भेट घेत असल्याचे दाखवा. प्रात्यक्षिक झाल्यावर प्रचारकाला विचारा की, त्याने आरंभीच्या भेटीत प्रकाशनाचा स्वीकार केला नव्हता त्या या माणसाची परतभेट घेण्याचे का ठरविले.
१५ मिः “पुट गॉड फर्स्ट इन युवर फॅमिली लाईफ.” द वॉचटावर मे १५, १९९१ च्या अंकातील पृष्ठ ४-७ वरील साहित्यावर आधारीत भाषण. (प्रादेशिक: “येशूचे ईश्वरी भक्तीबद्दलचे उदाहरण अनुसरा.” टेहळणी बुरुज, जुलै १, १९९०.)
गीत १३३ (६८) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च ३० ने सुरु होणारा सप्ताह
गीत ११५ (३६)
१० मिः स्थानिक घोषणा. या सप्ताहाच्या सेवाकार्याबद्दलच्या योजना व ईश्वरशासित वृत्त.
१५ मिः “पायनियरांना आधार देणे.” प्रश्नोत्तरे व मुलाखती. पायनियरांना योग्य तो आधार दिल्यावर सबंध मंडळीला जे आशीर्वाद मिळतात त्यावर भर द्या. पायनियरांची मुलाखत घ्या व त्यांना मंडळीतील वडील व इतरांनी त्यांच्या सेवाकार्यात कशी मदत दिली ते ठळकपणे सांगू द्या.
२० मिः “ख्रिश्चन युथ्स—बी फर्म् इन द फेथ.” वॉचटावर जुलै १५, १९९१ च्या अंकातील पृष्ठे २३-२६ वरील साहित्याची कुटुंबामार्फत चर्चा. बाप चर्चेत पुढाकार घेऊन बायको व मुलांना समाविष्ट करतो. शाळेत विश्वासाच्या ज्या विविध परिक्षांना युवकांना कसे यशस्वीरित्या तोंड देता येईल ते मुद्दे वेगवेगळे करून सांगा. (प्रादेशिक: “सुवार्तेची लाज वाटत नाही.” टेहळणी बुरुज, जून १, १९९०.)
गीत ४३ (१०३) व समाप्तीची प्रार्थना.