दैनंदिन आध्यात्मिक आहार —प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाची अत्यावश्यक गरज
१ “मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर यहोवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल.” (मत्तय ४:४) हे शब्द केवढे खरे आहेत! आपल्याला जसा शारीरिक आहार दरदिवशी लागतो तसाच आध्यात्मिक आहार देखील प्रतिदिवशी घेतला पाहिजे. आपली देववचनावर नियमित रुपाने भरवणूक घडण्यासाठी संस्थेने एक्झामिनिंग द स्क्रिपचर्स डेली ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. मग, कुटुंब या नात्याने दर दिवशीच्या वचनावर विचार करण्यासाठी तुम्ही निश्चित वेळ ठरवली आहे का?
२ पालकांनी उदाहरण घालून दिले पाहिजे: दर दिवशी घाईघाईने कामे करावी लागत असल्यामुळे वचनाचे वाचन व चर्चा राहून जाऊ शकते व मग नंतर करु असे वाटायला लागते. पण पालकांना आध्यात्मिक गरजांची जाणीव आहे तर ते कुटुंब एकत्रित असताना दर दिवशी दैनंदिन वाचन करण्यासाठी वेळ घेतील किंवा तो दिलाच पाहिजे. (मत्तय ५:३) आपल्या मुलांसोबत केवळ दैनंदिन वचन वाचण्यातच नव्हे तर वॉचटावरच्या विवेचनातील ठळक मुद्यांची चर्चा करुन त्यातील माहिती व सल्ला यांचा व्यावहारिक अवलंब कसा लागू करता येईल याचीही चर्चा करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. ही सवय लावण्यासाठी प्रयत्न व सरावाची गरज आहे पण याद्वारे मिळणारे लाभ तर निश्चितच मोठे आहेत. (पडताळा प्रे. कृत्ये १७:११, १२.) तर पालकहो, मुलांसमोर आपले सुंदर उदाहरण मांडण्यासाठी झटा!
३ सोयीस्कर वेळ निवडा: दैनिक वचनाच्या चर्चेसाठी सबंध कुटुंब एकत्र येऊ शकेल अशी कोणती चांगली वेळ असेल? ते जमले तर ठीक नाही तर जाऊ द्या यावर सोडू नका. दर दिवसाच्या आरंभालाच पवित्र शास्त्र वचनाचा विचार करण्यात फायदे आहेत. जगभर बेथेल तसेच मिशनरी गृहात दिवसाची सुरवात सकाळच्या उपासनेने होते, यामध्ये दैनिक वचनाची त्रोटक चर्चा असते. यामुळे बांधवांना दिवसाची चांगली सुरवात करण्याची मदत मिळते आणि दर दिवशी यहोवाकडील स्मरणिका आठवता येतात.—स्तोत्र १:१, २; फिलि. ४:८.
४ अशा या सकाळच्या पवित्र शास्त्रीय चर्चेमुळे ख्रिस्ती कुटुंबांनाही लाभ मिळू शकतो. मुलांना शाळेत असताना त्यांच्या आध्यात्मिकतेस धोका ठरणाऱ्या गोष्टींसोबत कसे तोंड देता येते त्याची येथे मदत मिळू शकते. जर सबंध कुटुंब यावेळी एकत्र बसून दैनंदिन वचनाचा विचार करू शकत नसेल तर यासाठी कोणता पर्याय घ्यावा ते पालकांनी ठरवावे की, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण आध्यात्मिक पोषणतेस गमावले जाणार नाही. उदाहरणार्थ, बापाला, मुले उठण्याआधीच सकाळी कामाला जावे लागत असले तर मग, कदाचित आई मुलांसोबत मिळून त्या वचनाची चर्चा घेऊ शकेल. उलटपक्षी काही कुटुंबांना संध्याकाळी सर्वजण घरी असताना एकत्रितपणे वचनाची चर्चा करण्याचे बरे वाटते. यास्तव, प्रत्येक कुटुंबाने आपल्या परिस्थितीस अनुरुप असणारा आराखडा तयार करण्यास हवा.
५ ख्रिस्ती कुटुंबाने दर दिवशी आध्यात्मिक भरवणूक करणे जरुरीचे आहे. दैनंदिन वचनाचे वाचन व विचार करण्याला प्राधान्य द्या. (फिलि. १:१०) दर दिवशी पवित्र शास्त्र वचनाची चर्चा केल्यामुळे आपल्याला यहोवाच्या नीतीमान तत्त्वे व कायद्यांना उंचावून धरण्यास मदत मिळेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दिलेले सहकार्य या व्यवस्थेला सर्वांसाठी अधिक लाभदायक बनविण्यासाठी साहाय्यक ठरू शकेल.