१९९२ चे “ज्योती-वाहक” प्रांतिय अधिवेशन
१ येशूने आपल्या अनुयायांबद्दल म्हटले की, ते “जगाचे प्रकाश” असतील. (मत्तय ५:१४) याउलट, जगाचा आध्यात्मिक व नैतिक अंधःकार हा प्रत्येक दिवशी अधिकाधिक काळोखी बनत आहे. (यशया ६०:२; रोम. १:२१) आपण या व्यवस्थेच्या अंताला येत असताना आपली ज्योती-वाहक या नात्याने असणारी जबाबदारी अधिकच महत्त्वपूर्ण बनते. आपण जी गहन भूमिका सध्या राखून आहोत त्याची जाण राखूनच १९९२च्या “ज्योती-वाहक” प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची उत्सुकता आम्हाठायी आहे. यातील पहिले संमेलन शुक्रवार सप्टेंबर ११ रोजी सुरु होईल.
२ तीन दिवसांचे अधिवेशन: या वर्षी आपण भारतात एकंदर ३१ अधिवेशने आयोजित केलेली आहेत. कार्यक्रमाची सुरवात शुक्रवारी सकाळी १०:२० होईल व अधिवेशन रविवारी दुपारी गीत व प्रार्थनेने साधारण ४.१५ वाजता संपेल. सभागृह सकाळी ७.३० वाजता खुले होईल आणि त्या आधी अधिवेशनात काम करणाऱ्यांशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. यहोवाच्या सर्व लोकांनी कार्यक्रमाला पूर्णपणे उपस्थित राहण्याची इच्छा धरावी. अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्याचे तुम्ही व्यक्तिगतपणे ठरविलेले आहे का? आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद असावा यासाठी यहोवाकडे प्रार्थना करण्याची खात्री बाळगा.
३ शुक्रवारी सकाळी उद्घाटनाच्या भाषणापासून ते रविवारी सायंकाळच्या समारोपाच्या विचारापर्यंत होणाऱ्या सबंध कार्यक्रमाकडे आपण लक्ष देऊन तो श्रवण करावा. अत्यंत स्फुरण देणारी माहिती भाषणे, प्रात्यक्षिके, मुलाखती, व एक नाटक याद्वारे प्रसारीत केली जाईल. शुक्रवार सकाळी कार्यक्रम सुरु होण्याच्या बऱ्याच आधी आपल्या जागेवर बसण्याची योजना आखा. साधारणपणे पहिल्या दिवशी आपले वाहन लावणे, जागा मिळवणे इत्यादि गोष्टींसाठी अधिक वेळ लागतो. यासाठी आपल्याला अधिक वेळ द्या. कार्यक्रमातील सर्व सत्रांना तसेच शेवटच्या गीत व प्रार्थनेला उपस्थित राहण्याने आपण कार्यक्रमाचा पूर्ण लाभ उचलतो व ज्योती-वाहक या अर्थी आपल्या हक्काची आवड प्रदर्शित करतो.
४ तुमचे कान लक्ष देणारे असू द्या: स्तोत्रकर्त्याने हे जाहीर केलेः “मी तुझे निर्णय ध्यानात धरीन. अहाहा! तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते.” (स्तोत्र. ११९:९५ब, ९७) आपण ज्या ज्या वेळी यहोवाकडून शिक्षण घेण्यासाठी एकत्र येत असतो तेव्हा लक्ष देण्याची व केवळ कानांनीच नव्हे तर आपल्या अंतःकरणानेही ऐकण्याची जरुरी आहे. ही गरज, प्रांतिय अधिवेशनांसारख्या मोठ्या मेळाव्यांना तर अधिकपण लागू होते. डोळ्यांनी पाहण्याजोगे व कानांनी ऐकण्याजोगे पुष्कळसे असते. आपण इतका पैसा खर्च करून व शिवाय वेळ काढून अधिवेशनाला उपस्थित राहिलो आणि ज्योती-वाहक या नात्याने आपली जी सुधारणा व्हावयाची आहे याबद्दलचे जे सुंदर मुद्दे सांगितले जातील त्यापैकीचे थोडकेच आपण आपल्या बरोबर घेऊन गेलो तर ते केवढे व्यक्तिगत नुकसान ठरेल! आपल्याला कार्यक्रमाकडून पूर्ण लाभ मिळवावयाचा आहे तर उपस्थित होणाऱ्या सर्व अडथळ्यांवर आपण मात करण्याचा सर्वतोपरि प्रयत्न करावयास हवा. अधिवेशनाचा कार्यक्रम संपल्यावर सांगण्यात आलेली एकंदर माहिती आपल्या मनावर व अंतःकरणावर बिंबलेली राहील याची खात्री आम्हाला कशी करता येईल?
५ ऐकणे ही एक कला आहे जी जोपासली व वाढवली पाहिजे. “ऐकणे” या शब्दाचा “लक्ष देऊन ऐकून घेणे,” असा अर्थ होतो. पुढील काही प्रस्तावांचा विचार कराः (१) चांगली विश्रांती घेऊनच दर दिवशी सकाळी अधिवेशनाला या. यासाठी योजना व कुटुंबाचे सहकार्य जरुरीचे राहील. तुम्ही पुरेश्या विश्रांतीच्या अभावामुळे थकलेले असाल किंवा सकाळची न्याहारी न केल्यामुळे भूख लागल्याचे वाटत असेल किंवा घाईघाईने यावे लागल्यामुळे मानसिक त्रागा निर्माण झाला असेल तर तुम्हाला कार्यक्रमाचा फारसा लाभ मिळू शकणार नाही. (२) कार्यक्रमात विषय कसा हाताळला जाईल याविषयी उत्कंठा निर्माण करा. अधिवेशनाच्या काही आठवड्यांआधी, आपल्या कौटुंबिक अभ्यासाचा भाग म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ज्योती-वाहक असण्याचा काय अर्थ होतो हे सांगण्याचे का नेमून देऊ नये? अधिवेशनात असताना कार्यक्रम सुरु होण्याआधी त्या दिवसाच्या प्रत्येक भागाची उजळणी करा. (३) साजेसा पेहराव करा आणि कार्यक्रम चालू असताना खाणे-पिणे टाळा. सभागृहातील बैठकीच्या जागी, कार्यक्रम चालू असताना काहीजण खाणे-पिणे करीत असल्याचे आढळले आहे. हे अपमानजनक, इतरांचे लक्ष विचलीत करणारे आणि स्वतःला संयम नाही, असे दाखविणारे आहे.—पाहा, द वॉचटावर, नोव्हेंबर १५, १९९१, पृष्ठे ८-१८.
६ नोंदी घेण्याच्या प्रकाराबद्दल आपण खास लक्ष दिले पाहिजे. ते योग्य प्रकारे केल्यास आपण वक्त्याला काळजीपूर्वक अनुसरु आणि जे ऐकू ते अधिक काळ स्मरणात राखू. आपल्या ऐकण्याचा वेग हा बोलण्यापेक्षा चौपटीने अधिक असल्यामुळे मनाचे मनोरे उभारण्याच्या पाशात न पडण्याचा चांगला उपाय हा नोंदी घेणे हा आहे. एका लेखकाचे हे परिक्षण आहेः “एखादे भाषण ऐकणे हे ते देण्यापेक्षा अधिक अवघड आहे.” आरंभीचे ख्रिस्तीजन सभेला जाताना आपणाबरोबर मांतीची मोडलेली भांडी नेत असत व त्यावर शाईने नोंदी घेत असल्याची कदाचित तुम्हाला माहिती असेल. आपणही हे साधारण मध्यम आकाराची नोंदवही व एखादी पेन्सिल किंवा पेनने करू शकतो. नोंदी घेण्यात कुशल असण्याचा अर्थ मुख्य मुद्दा काय आहे ते जाणण्याएवढे शब्द लिहिणे हे आहे आणि लिहितच जाणे हे नाही. लिहितच जात राहिलो तर मग आपला हेतु साध्य होणार नाही आणि वक्त्याने सांगितलेले महत्त्वपूर्ण मुद्दे वगळले जातील. यासाठीच प्रमुख शब्द लिहा आणि संक्षिप्तपणे लिहा. दर दिवशी संध्याकाळी तुम्ही या नोंदीची परत उजळणी केली आणि पुन्हा एकदा ज्या दिवशी मंडळीतील सेवा सभेत या अधिवेशनाच्या कार्यक्रमाची उजळणी होईल त्या आधी या नोंदी बघितल्या तर त्यांचा खूपच परिणामकारक प्रभाव घडू शकेल.
७ अंतःकरणपूर्वक गायन व प्रार्थना: यहोवाची गीताद्वारे स्तुति करणे तसेच त्याला सद्भावाने प्रार्थना करणे हा आमच्या उपासनेतील आवश्यक भाग आहे. (२ इतिहास ३०:२१, २७) अधिवेशनाची ही प्रमुख अंगे असून यात आम्हा सर्वांना सहभागी होता येईल. “ज्योती-वाहक” प्रांतिय अधिवेशनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात आपण यहोवास १८ स्तुतीगीते गाणार आहोत व आपल्या स्वर्गीय पित्यास एकत्रपणे आठ वेळा प्रार्थना करणार आहोत. हे खरेच अमूल्य हक्क आहेत. यहोवा आम्हाला १२ तासांपेक्षा अधिक काळ आध्यात्मिक शिक्षण व तालीम देणार आहे. गीत व प्रार्थनेच्या काही मिनिटांदरम्यान आपण यहोवाचे, त्याच्या उदार देणग्यांबद्दल आभार मानून त्याची स्तुती करतो. आपण यहोवापुढे प्रार्थनेत एक मंडळी या नात्याने सामोरे जात असल्यामुळे, आपल्या विस्कळीत योजनांमुळे आपल्याला गीत व प्रार्थनेत सहभागी होता आले नाही म्हणून यहोवाने आम्हाबाबत स्वार्थी व कृतघ्न असल्याचा दृष्टिकोण धरावा असे आपल्याला वाटते का? या वर्षी देखील प्रकाशन साठा प्रत्येक अधिवेशनात मुबलक असेल, त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत आपल्या जागी बसून राहणाऱ्यांना काळजी करण्याचे कारण नसणार. याचप्रमाणे, जेवण किंवा उपहारासाठी कार्यक्रम सोडून आधी रांग लावण्यासाठी पळण्याचीही गरज नाही.—मत्तय ७:१२; रोमकर १२:१०; फिलिप्पै. २:१-४.
८ सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा: अधिवेशनात आपला शिष्टाचार व वागणूक योग्यतेची असावी असे स्मरण आपल्याला दरवर्षी प्रेमाने दिले जाते. अशा या स्मरणांकडे सतत लक्ष दिल्याबद्दल बहुतेकांची प्रशंसा करणे उचित आहे. या व्यवस्थेचा शेवट जवळ येत असता, आपण नोकरीवर तसेच शाळेत अशा लोकांच्या संपर्कात नित्य येत असतो ज्यांच्या स्वभावाबद्दल २ तीमथ्य ३:१-५ मध्ये माहिती दिली आहे. आपण स्वतःचे रक्षण केले नाही तर या सहवासाचा आम्हावर प्रतिकूल परिणाम घडू शकेल. आम्ही कोणालाही आमच्याबद्दल “दुष्कर्मी समजून दुर्भाषण करण्या”स सोडू नये. (१ पेत्र २:१२) यामुळेच आमच्या ख्रिस्ती व्यक्तित्वाकडे नेहमीपेक्षा अधिक लक्ष देण्याची आपल्याला हाक आहे. आम्ही सर्वांनी अधिवेशनात तसेच हॉटेल्स व उपाहारगृहे यासारख्या जाहीर स्थळी लोकांत असताना आपल्या वागणूकीबद्दल दक्ष असावे. वडील त्यांच्या सर्व बांधवांबद्दल आस्थेवाईक आहेत. (फिलिप्पै २:४) त्यांनी इतरांच्या चांगल्या वागणूकीबद्दल साहाय्यक तसेच प्रशंसा करणारे ठरावे. त्याचप्रमाणे कोणा बंधू वा भगिनीशी परिचित नाही, आणि जरुर पडते आहे तर वडिलांनी अशांना प्रेमळ सूचना मोकळेपणाने द्याव्या. एखादी गंभीर समस्या उद्भवली असल्यास ती अधिवेशनाच्या दप्तरी कळवावी.
९ आम्ही काय लक्षात ठेवावयास हवे? हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना आपण सन्मानाने वागवावे. रुमिंग खात्याने अधिक माफक दरात राहण्याच्या जागेची व्यवस्था मिळवण्यात खूप कष्ट घेतलेले आहेत. आपण जर अवास्तव मागणी करीत राहिलो किंवा जाताना खोलीची स्थिती वाईट दर्शत सोडली तर मग, हॉटेल व्यवस्थापक भावी अधिवेशनांसाठी यहोवाच्या साक्षीदारांना आपणाकडे राहू देण्याचे पसंद करणार नाहीत. आमच्यापैकी काहींना याबद्दलचे स्मरण दिलेच पाहिजे. समाज या नात्याने मिळविलेली ख्याति कलंकित करण्यासाठी केवळ थोडेच पुरेसे असते.
१० आपली काळजी घेतल्याबद्दल कर्मचारी वर्गाला बक्षिसी देण्याच्या प्रकाराबद्दल आमची राज्य सेवा याच्या जुलै १९९१ च्या पुरवणीत माहिती देण्यात आली आहे. याचे मुख्य मुद्दे कृपया तपासून बघा.
११ इफिसकर ४:२४ मध्ये सांगण्यात आलेले नवे व्यक्तित्व हा असा पेहराव आहे, जो एखादा आपले जुने व्यक्तित्व काढून टाकल्यावर परिधान करीत असतो. व्यक्तित्वातील हा बदल आमच्या खरोखरीच्या वस्त्रप्रावरणात देखील दिसला पाहिजे. काही बंधू व भगिनी व विशेषेरित्या काही युवक तर अगदी गबाळा पोषाख घातलेले व कधी कधी अगदी असभ्यपणे वागणारे दिसले. काही आपले बूट काढून आपले पाय पुढील खुर्चीच्या मागील बाजूला रेलतात. आम्ही राज्य सभागृही असताना अशाच पद्धतीने बसतो का? तसेच बाप्तिस्मा घेणारे काही उमेदवार निरनिराळ्या जाहिराती असलेले टी-शर्ट घालून आलेले होते. बाप्तिस्मा घेण्याची तयारी करणाऱ्यांसोबत वडील जेव्हा उजळणी प्रश्न घेतील तेव्हा त्यांनी प्रसंगाला अनुसरुन पेहराव कसा असावा याबद्दलची उजळणी करण्याची खात्री बाळगावी.—पहा, द वॉचटावर, जून १, १९८५, पृ. ३० आणि एप्रिल १५, १९७३, पृष्ठे २५४-५.
१२ ध्वनिमुद्रणाची उपकरणे: व्हिडीओ कॅमेरा वापरण्याची मुभा असली तरी वापरणाऱ्यांनी दुसऱ्यांबद्दल काळजी राखवी, जे ध्वनिमुद्रण करणार त्यात निवडक असावे आणि जेवताना, कार्यक्रम ऐकताना ज्यांची फोटो काढण्याची इच्छा नाही अशांबद्दल आदर दाखविणे तसेच प्रार्थनेच्या वेळी फोटो न काढण्याचाही आदर दाखवावा. व्हिडीओटेपिंग किंवा कॅसेट रेकॉर्डिंग करणाऱ्यांनी सभागृहास विचलीत करणाऱ्या किंवा त्रासदायक गोष्टी टाळाव्यात. आपल्या बसलेल्या जागेवरुन कार्यक्रमातील काही भागांचे ध्वनिमुद्रण करण्याला मनाई नाही; परंतु कार्यक्रमादरम्यान दोन रांगातील जागेत कॅमेरा घेऊन फिरकत राहणे, सभागृहात स्टेजकडे जाणे व ध्वनिमुद्रण करणे बरोबर नाही. याबाबतीत बंधूप्रीतीची उणीव प्रदर्शित करणाऱ्याला अटेंडंटनी जरुर तर समज द्यावी. कृपया हे लक्षात ठेवा की, कोणताही कॅमेरा किंवा ध्वनिमुद्रणाचे उपकरण अधिवेशनाच्या विद्युत किंवा ध्वनिमाध्यमाला जोडायचे नाहीत. तसेच दोन रांगेतील पायवाटेवर ही उपकरणे ठेवू नयेत.
१३ पालकांसाठी: पालकांनी आपल्या मुलांवर अधिवेशनात तसेच राहण्याची जागा जेथे नेमून दिली आहे तेथे लक्ष ठेवावे या महत्त्वपूर्ण गरजेबद्दल आम्ही पुन्हा जोर देऊ इच्छितो. (नीती. २९:१५ब; लूक २:४८) कार्यक्रम चालू असताना तुमची मुले त्याकडे लक्ष देत आहेत व नोंद करीत आहे याची खात्री बाळगा. इतर मंडळीतील मित्रांना भेटण्यासाठी मध्यंतराच्या वेळेची संधि आहे.
१४ आपली मुले कोठे असतात ते जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे याची स्पष्टता करणारा एक अनुभव असा की, एका अधिवेशन शहरी एका टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या बंधूला सांगितले की, त्याने दोन तरुण मुलींना अधिवेशन केंद्री गाडीत बसविले. त्या दोघींचा दुपारभर कोठेतरी भटकण्याचा कार्यक्रम होता व त्यांनी त्याला सांगितले की, सायंकाळी ५पर्यंत त्यांची आई त्यांना शोधणार नाही. या टॅक्सी ड्रायव्हरला मुलींची काळजी वाटत होती, पण त्यांच्या आईबद्दल काय? जर काही घातक प्रसंग त्यांच्यावर ओढवला असता तर किती वाईट झाले असते आणि देवाचे नाव व त्याचे लोक यांनाही किती काळिमा लागला असता!
१५ आपल्या मंडळीला ज्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे नेमून दिले आहे त्या संस्थेच्या मार्गदर्शनाला आम्हा प्रत्येकाने सहकार्य देणे हे केवढे महत्त्वाचे आहे! प्रत्येक अधिवेशनाला संस्थेने तसेच ते जेथे होते त्या शहरातील जबाबदार बांधवांनी तयारीसाठी खूप प्रयत्न उपसलेले असतात. यात सर्वांना पुरेशा बसण्याच्या जागा, प्रकाशने, अन्न व इतर तरतुदी यांचा समावेश आहे. नेमून न दिलेल्या अधिवेशनाला अधिक बांधव उपस्थित राहिल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. अर्थात, अशी परिस्थिती असेल की जी काही थोडक्यांना अधिवेशनास इतर भागात उपस्थित राहाणे जरूरीचे बनवेल. कदाचित इतर संमेलनाची शहरे अनेक कारणास्तव अधिक आकर्षित वाटत असतील, पण जर आपणास पसंत वाटणाऱ्या ठिकाणी बंधू मोठ्या प्रमाणात गेले तर यामुळे खूपच त्रासदायक परिणाम उद्भवतील.
१६ बैठका राखून ठेवण्याबाबत तुमच्या पूर्ण सहकार्याबद्दल विनंती केली जात आहे. कृपया हे लक्षात ठेवा की जागा केवळ तुमच्या जवळच्या कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रवास करतात त्यांच्यासाठी राखल्या जाव्यात. वयस्कर तसेच अपंगासाठी सर्व अधिवेशनात खास विभाग नेमून देण्यात आलेले असतील. सर्वांनी विभागाची नावे पहावीत आणि जागा करून देणाऱ्या सेवकांचे मार्गदर्शन अनुसरावे असे आम्ही आपणाला विनंती करतो. काही वयस्कर बांधवांना अधिक चढता येणार नाही अशा ठिकाणी जागा बघाव्या लागल्या कारण युवकांनी वयस्करांसाठी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट जागा पटकाविल्या होत्या. कृपया वयस्करांबद्दल लक्ष द्या. ज्यांना ॲलर्जी आहे अशांसाठी वेगळ्या खोल्या किंवा वेगळी जागा नेमून देणे शक्य होणार नाही याचा आम्हाला खेद वाटतो.
१७ आम्ही आपणास असे सुचवितो की, अधिवेशनाला येताना कमीत कमी सामान आणा. एखादी वस्तु आपल्या बैठकीच्या खाली मावू शकत नसल्यास ती घरीच सोडणे बरे. सुरक्षा कारणामुळे मोठमोठे कुलर्स आणून ते रांगाच्या मध्ये ठेवण्याची आम्ही शिफारस करीत नाही. हेच कुलर्स जर तुम्ही आपल्या बाजूच्या बैठकीवर ठेवले तर त्यामुळे दुसऱ्याला बसायला जागा मिळणार नाही.
१८ प्रत्येक अधिवेशनाला जितकी उपस्थिती असण्याची शक्यता जमेस धरली आहे त्यांना पुरेल इतके जेवण तयार करण्याच्या योजना करण्यात आली आहे. युवकांसोबत प्रत्येकाने आपणास हवे तितकेच जेवण घेतले तर सर्वांना पुरेसे मिळू शकेल. यासाठी कृपया, स्वतः व आपल्या कुटुंबाकरिता पुरेसे अन्न घेण्याचे आपल्या विचारात असू द्या. हेही आठवणीत असू द्या की, जेवण हे अधिवेशनाच्या जागेपासून इतरत्र नंतर खाण्यासाठी घेऊन ठेवायचे नाही. या गोष्टीला, जे दर दिवशी तसेच रविवारी शेवटास स्टँडबाहेर अधिक म्हणून दिले जाईल तो अपवाद असेल.
१९ जेवण ताटात भरपूर वाढून घेतले आहे पण ते न खाल्ल्यामुळे शेवटी कचऱ्यात टाकून दिलेले पाहण्यात आले आहे. यासाठी आरंभाला बेताचे जेवण घ्यावे व मग सर्वांचे वाढून झाल्यावर काही उरलेच तर पुन्हा घेण्याची इच्छा असल्याचे घ्यावे असे करणे चांगले. जेवणाबद्दलच्या मूलभूत गरजा शक्यतो सोयीने पुऱ्या होत आहे याकडे अधिवेशनाचे लक्ष राहील.—पहा, द वॉचटावर, नोव्हेंबर १५, १९९१, पृ. ११, परिच्छेद १३ व १४.
२० तयार केलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमाचे फायदे सर्वांना एकत्रपणे मिळावे म्हणून जे स्थळ निवडण्यात आलेले आहे तेथे एकत्र होण्यात यहोवाच्या लोकांना धय्ता वाटते. अशा या मेळाव्यासाठी ज्या विविध सेवा व सोयी पुरवल्या जातात त्याबद्दल आम्हाला कदर वाटते. पुष्कळ काळजी आणि संस्थेच्या खूप आर्थिक खर्चाने बैठकीच्या व्यवस्था, महागडी ध्वनिक्षेपण व्यवस्था, कार्यक्षम असे जेवणाचे खाते, आणि अशासारख्या इतर अनेक सेवा बांधवांना अधिवेशनास उपस्थित राहून आनंद व आध्यात्मिकतेत उत्साहवर्धक वाटावे या उद्देशाने केल्या जातात.
२१ “ज्योती-वाहक” प्रांतिय अधिवेशनास या. “ज्योती-वाहक” प्रांतिय अधिवेशनास “ज्योती-वाहक” प्रांतिय अधिवेशनास आम्हाला, ज्योती-वाहक असणे हा मोठा सन्मान व हक्क का आहे ते जाणून निश्चये आनंद वाटेल. याचप्रमाणे ती एक गंभीर जबाबदारी देखील आहे याच आम्हाला स्मरण दिले जाईल. यास्तव, अधिवेशनात ऐकवल्या जाणाऱ्या गोष्टींकडे वाजवीपेक्षा जास्त लक्ष दिल्यामुळे आम्ही ज्योती-वाहक असण्यामधील आमची कुशलता तसेच त्या भूमिकेबद्दल वाटणारी कदर या दोहोंमध्ये आणखी सुधारण करू शकू. यास्तव, शुक्रवारचे सुरवातीचे गीत ते रविवार दुपारची समाप्तीची प्रार्थना या दरम्यानच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची आत्ताच योजना आखा.
[५ पानांवरील चौकट]
प्रांतिय अधिवेशन स्मरणिका
राहण्याच्या व्यवस्था: अधिवेशनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या राहण्याच्या जागांचा उपयोग करण्यातील तुमच्या सहकार्याची फारच गुणग्राहकता बाळगली जाते. तुमच्या जागेचे आरक्षण रद्द करणे तुम्हास जरूरीचे वाटते तर तुम्ही हॉटेलला सरळपणे लिहावे किंवा फोन करावा हे करणे शक्य तो लवकर करावे ज्यामुळे खोली दुसऱ्या कोणास उपलब्ध करून दिली जाईल.
बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी सकाळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी विशेष आयोजित केलेल्या विभागात त्यांच्या खुर्चीवर असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साजेसा असा अंघोळीचा पेहराव व टॉवेल जे बाप्तिस्मा घेण्याची इच्छा करतात त्या प्रत्येकाने आणावा. बाप्तिस्म्याचे भाषण व वक्त्याने केलेल्या प्रार्थनेनंतर, कार्यक्रम अध्यक्ष बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना संक्षिप्त सूचना देतील व नंतर गीत होईल. शेवटच्या ओळीच्या सुरुवातीस ॲटेन्डन्ट बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना बाप्तिस्मा ठिकाणाकडे किंवा त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनाकडे मार्गदर्शित करतील तेथील उपस्थित सर्व गीताचे गायन पूर्ण करतील. बाप्तिस्मा हा एखाद्याच्या समर्पणाचे द्योतक असून ही गोष्ट यहोवा व त्या व्यक्तीमधील वैयक्तीक व खाजगी बाब आहे हे पाहता भागीदारीचा बाप्तिस्मा असे संबोधला जातो ती तरतुद येथे नाही ज्यात दोन किंवा अधिक बाप्तिस्मा घेणारे उमेदवार बाप्तिस्मा घेताना मिठी मारतात किंवा हात पकडतात.
स्वयंसेवक सेवा: प्रांतिय अधिवेशनाच्या सुरळीत कार्य प्रवणासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे. तुम्हास अधिवेशनाच्या मध्यंतरी, शेवटास काम करणे शक्य असेल तरीही तुमच्या सेवेची कदर जाणली जाईल. तुम्ही मदत करू शकाल तर कृपया तुम्ही अधिवेशन ठिकाणी याल तेव्हा स्वयंसेवक विभागास ते कळवा. १६ वर्षे वयाखालची मुले ही अधिवेशनाच्या यशस्वीपणास हातभार लावू शकतात, पण त्यांनी त्यांच्या पालकांच्या किंवा इतर जबाबदार प्रौढांच्या सोबत काम करण्याची आवश्यकता आहे.
लेपल कार्डस: कृपया मुद्दाम तयार केलेली लेपल कार्ड अधिवेशनात व अधिवेशन ठिकाणाकडे येताना किंवा जाताना ती परिधान करा. हे आम्हास प्रवास करताना उत्तम साक्ष देणे शक्य करून देते. लेपल कार्डस तुमच्या मंडळीतून प्राप्त केली जावीत कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतात.
सावधानतेचा इशारा: तुम्ही तुमचे वाहन कोठेही लावत असाल पण ते सर्ववेळी कुलूप लावलेले व त्यात दिसेल असे कधीही कांही ठेवू नका. शक्य असेल तर तुमच्या मालकीच्या वस्तु ट्रंक मध्ये कुलुप लावून ठेवा. तसेच चोर व खिसेकापू यापासून सावध असा कारण लोकसमुदाय पाहून ते आकर्षित होतात. यामध्ये अधिवेशनातील खुर्च्यावर कोणतीही मोलवान वस्तु कोणाच्या देखरेखीशिवाय मागे सोडू नये हे समाविष्ठ आहे. काही अधम लोकांनी लहान मुलांना अधिवेशनाच्या जागेपासून दूर पळवून नेण्याच्या हेतून त्यांना काही आमिषे दाखवली असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी कृपया दक्षता घ्या.
असे कळविले गेले आहे की काही हॉटेल्स टेलिव्हीजनवर पाहण्यास अनैतिकता काय पण अश्लीलता असणाऱ्या चित्रपटाच्या सोई पुरवितात. अशा राहत्या ठिकाणी लेकरांनी देखरेखीविना टी.व्ही. पाहणे टाळावे या निकडीवर हे प्रकाशझोत टाकते.
काही बांधवांनी तसेच आस्थेवाईक लोकांनी अधिवेशने जेथे होताता त्या ठिकाणच्या व्यवस्थापकांचा फोनने संपर्क साधून कार्यक्रम सुरु होण्याच्या वेळा तसेच इतर गोष्टींबद्दल विचारणा केली. कृपया असे करू नका. तुम्हास हवी असणारी माहिती टेहळणी बुरुज किंवा आमची राज्य सेवा यात मिळू शकत नाही, तर कृपया अधिवेशनाच्या कार्यालयीन पत्त्यावर लिहून ती विचारणा करावी. हे कार्यालयीन पत्ते मंडळीच्या सचिवांच्या दप्तरी मिळतील.