योग्य बोलक्या मुद्यांना निवडा
१ लोकांनी द वॉचटावर व अवेक! नियमित वाचावे असे उत्तेजन देण्यास आम्ही काय केले पाहिजे? मासिके सादर करतेवेळी त्यातील काही मनोरंजक मुद्यांवर आपण बोलले पाहिजे. आमच्या क्षेत्रातील लोकांसोबत जर आपण चांगल्यारितीने परिचित आहोत तर त्यांना मनात ठेवून आपण जेव्हा मासिक वाचतो तेव्हा त्यांचे लक्ष आकर्षित करणाऱ्या बोलक्या मुद्यांना आपण शोधून काढू.
२ काही भागात लोक एकाच पार्श्वभूमीचे कदाचित असतील, व सर्वांची आस्था सर्वसामान्य आहे हे आपण पाहिले असेल. पण दुसऱ्या भागामध्ये आम्ही अशा लोकांना भेटू ज्यांची पार्श्वभूमी वेगळी असेल. आपल्या मनात जर पुष्कळसे बोलके मुद्दे आहेत तर ज्या व्यक्तिस आपण भेटतो त्यास जो लागू होत असेल तो निवडू शकू.
३ नविन मासिके मिळाल्यावर, लगेच जुन्या मासिकांचा त्याग करु नका. एक बांधव नेहमी तीन किंवा चार टेहळणी बुरुज मासिके घरमालकासमोर ठेवतो व त्यास आवडेल तो अंक निवडण्यास सांगतो. जर आम्हाला वाटते की मासिकांचे वितरण करतो त्या प्रमाणापेक्षा जास्त मासिके मिळत आहेत तर आम्ही आपली मागणी कमी केली पाहिजे.
४ अशा प्रकारे योग्य बोलक्या मुद्यांचा वापर करुन आम्ही इतरांना आमची मासिके वाचण्यास उत्तेजन देऊ व त्यांना कदाचित जीवनाच्या मार्गाकडे निरवू शकू. (मत्तय ७:१४) जर आम्ही ह्या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर यहोवाच्या आशीर्वादांची आम्हाला खात्री असेल.