आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
१ तुम्ही एका पुस्तकालयाजवळ जाता तेव्हा तुम्हाला काय दिसते? नियतकालिके. रस्त्याच्या कोपऱ्यावरील दुकानात तुमचे लक्ष कोठे वेधले जाते? नियतकालिकांकडे. पोस्टमनला ओझे वाटणारे असे त्याच्या टपाल-पिशवीत काय असते? नियतकालिके. अशा प्रकारे, अनेक लोक काय वाचतात? नियतकालिके. सामान्य अभ्यासांनी असे दाखवून दिले आहे, की १० ते १८ वयोगटांतील १० पैकी ९ युवक आणि तितकेच प्रौढ प्रत्येक महिन्याला एक तरी नियतकालिक वाचतातच. हे जग नियतकालिकांबद्दल आस्थेवाईक आहे.
२ आपण प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांबद्दल आस्था निर्माण करण्यास प्रवृत्त करू शकतो का? होय, आपण टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांबद्दल आस्था बाळगत असलो तरच. आपल्याला काय मदत करील? या सूचनांचा विचार करा:
▪ नियतकालिके वाचा: एका प्रवासी पर्यवेक्षकांनी असा अहवाल दिला, की सरासरी त्यांच्या विभागातील ३ प्रचारकांपैकी केवळ १ प्रचारक टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचा अंक पाठपोट वाचतो. तुम्हीही वाचता का? प्रत्येक लेख वाचताना, स्वतःला विचारा, ‘हा लेख कोणाला आवडेल—एका मातेला, अज्ञेयवादी व्यक्तीला, व्यापाऱ्याला, की युवकाला?’ नियतकालिक सादर करताना तुम्ही उपयोगात आणू शकाल अशा एक किंवा दोन मुद्यांची तुमच्या व्यक्तिगत प्रतीमध्ये नोंद करून ठेवा. मग केवळ एक किंवा दोन वाक्यांत तुम्ही त्या विषयाबद्दल आस्था कशी निर्माण करू शकता याचा विचार करा.
▪ ठराविक नियतकालिक मागणी असू द्या: नियतकालिकांची हाताळणी करणाऱ्या बांधवाकडे प्रत्येक अंकाच्या ठराविक प्रतींसाठी एक व्यावहारिक मागणी करा. अशा प्रकारे, तुमच्याजवळ व तुमच्या कुटुंबाजवळ नियतकालिकांचा एक नियमित व पुरेसा साठा असेल.
▪ नियमित नियतकालिक दिवसाची योजना करा: अनेक मंडळ्यांनी प्रामुख्याने नियतकालिक साक्षकार्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. तुम्ही मंडळीच्या नियतकालिक दिवसाला पाठिंबा देऊ शकता का? तसे नसल्यास, घरोघरी जाताना तसेच नियतकालिक मार्ग करत असताना, अधूनमधून सेवेतील थोडा वेळ नियतकालिकाचे मार्ग साक्षकार्य आणि नियतकालिकांचे व्यक्तिगतरित्या वाटप करण्यासाठी उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा.
▪ “टेहळणी बुरूज” आणि “सावध राहा!” नियतकालिकांबद्दल दक्ष असा: प्रवास किंवा खरेदी करताना नियतकालिकांच्या प्रती सोबत ठेवा. सहकर्मचारी, शेजारी, शाळासोबती किंवा शिक्षक यांच्याशी बोलत असताना ती सादर करा. प्रवास करणारे एखादे जोडपे, बहुतेकवेळा त्यांच्याजवळ बसलेल्या व्यक्तीशी संभाषण सुरू करण्याकरता एखाद्या अलीकडील नियतकालिकातील एका मुद्याचा उपयोग करतात. त्यांना अनेक आनंददायी अनुभव मिळाले आहेत. काही युवक, त्यांच्या शिक्षकांना किंवा सह-विद्यार्थ्यांना पसंत पडतील असे लेख शाळेत नियमितपणे आणतात. तुमच्या परिसरातील दुकानांमध्ये जाण्यासाठी कमी वेळ लागत असला, तरी सोबत प्रती घ्या आणि तुमचे काम झाल्यावर त्या व्यापाऱ्यांना द्या. आपल्यातील अनेक जण नियमितपणे पेट्रोल भरण्याकरता जातात; तर पेट्रोल स्थानकाच्या कर्मचाऱ्याला नियतकालिके का सादर करू नयेत? नातेवाईक भेटी देतात, तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करता, किंवा एखाद्याला वेळ दिली असल्यामुळे थांबून असता तेव्हा ती नियतकालिके जवळ ठेवा. तुम्ही इतर उचित प्रसंगांचा विचार करू शकता का?
▪ एक संक्षिप्त नियतकालिक सादरता तयार करा: केवळ थोडेच, परंतु चांगल्यारितीने बोलण्याचे ठरवा. उत्साही असा. अंतःकरणाला अपीलकारक ठरणारे असा. स्पष्ट असा. एका लेखातील एक कल्पना निवडा, काही शब्दांमध्ये ती व्यक्त करा आणि नियतकालिके सादर करा. सर्वोत्तम सादरता करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, आस्थेच्या एखाद्या विषयावर प्रश्न उभा करा आणि मग त्याचे शास्त्रवचनीय उत्तर देणाऱ्या लेखाकडे निर्देश करा. हे कसे केले जाऊ शकते त्याची काही उदाहरणे विचारात घ्या:
३ वाढत्या हिंसेच्या प्रमाणावरील लेख तुम्ही ठळकपणे दाखवत असल्यास, तुम्ही असे विचारू शकता:
▪“हिंसेचे भय न बाळगता रात्रीच्या वेळी झोपी जाणे शक्य होण्यासाठी कशाची गरज आहे?” परिस्थिती सुधारेल याविषयी घरमालक निराश असेल. अनेक लोकांना असेच वाटते असे उत्तर द्या व त्यास आवडेल अशी माहिती तुमच्याजवळ आहे हे पुढे सांगा. त्यानंतर लेखातील एखाद्या उचित मुद्याचा संदर्भ द्या.
४ कौटुंबिक जीवनावर एखादा लेख सादर करताना, तुम्ही असे म्हणू शकता:
▪“आजकाल उदरनिर्वाह करणे आणि कुटुंबाचे पालनपोषण करणे हे खरोखर आव्हान असल्यासारखे अनेक लोकांना वाटते. या विषयावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहेत, पण तज्ज्ञ देखील आपल्या समस्यांवरील उपायांबद्दल सहमत नाहीत. विश्वसनीय मार्गदर्शन मिळणे संभव आहे का?” मग, नियतकालिकातील एक विशिष्ट विवेचन दाखवा.
५ एखाद्या सामाजिक समस्येवरील लेख सादर करताना, तुम्ही हा प्रस्ताव मांडू शकता:
▪“अनेक लोक आज दबावाखाली आहेत. आपण अशा प्रकारे जीवन जगावे असा देवाचा कधीच हेतू नव्हता.” मग लेखातील साहित्य आपल्याला आता जीवनाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी व भवितव्यातील कायमस्वरूपी उपायासाठी कसे मदत करू शकते हे दाखवा.
६ मार्ग साक्षकार्य प्रभावशाली आहे: जानेवारी १९४० च्या बातमीदार (आमची राज्य सेवा) या अंकात नियतकालिकांचा उपयोग करून प्रत्येक आठवडी एक खास दिवस, मार्ग साक्षकार्यासाठी ठरवावा असे उत्तेजन प्रचारकांना पहिल्या वेळेस देण्यात आले होते. तुम्ही वेळोवेळी मार्ग साक्षकार्यात भाग घेता का? भाग घेत असल्यास, तुम्ही जी पद्धत वापरता ती खरोखर प्रभावशाली आहे का? असे निरीक्षण करण्यात आले आहे, की काही प्रचारक वर्दळ असणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून गप्पा ठोकत असताना अनेक लोक त्यांच्या नजरेतून चुकले आहेत. नियतकालिके घेऊन एकत्र उभे राहण्याऐवजी वेगवेगळे उभे राहून लोकांकडे जाणे अधिक प्रभावशाली आहे. जर एकच व्यक्ती कोणा अनोळखींकडे जाऊन बोलू लागली, तर ते थोड्या वेळासाठी थांबून ऐकतील पण संभाषण करत असलेल्या गटाशी जाऊन बोलण्यास फार कमी लोक पुढाकार घेतील. आपण रस्त्यावर स्वतःकडे खूप लक्ष आकर्षित करत असल्यामुळे, देवाच्या सेवकांना साजेशी नीट केशभूषा व सभ्य पेहराव करण्याची खास गरज आहे.—१ तीम. २:९, १०.
७ दारावर जाऊन नियतकालिकांचे वितरण करणे: मार्ग साक्षकार्य हाच केवळ नियतकालिके देण्याचा एकमेव मार्ग नाही, ती घरोघरच्या सेवेत देखील दिली जाऊ शकतात आणि दिली पाहिजेत. घरी भेटी देताना आपण सामान्यपणे तीन ते आठ मिनिटांकरता बोलण्याचे ठरवतो, एक किंवा दोन शास्त्रवचने दाखवतो आणि त्या महिन्यासाठी सुचवलेली सादरता मग ते पुस्तक, पुस्तिका किंवा वर्गणी असो ती प्रस्तुत करतो. पण मंडळी जेव्हा नियतकालिक दिवस योजते (पुष्कळ मंडळ्या प्रत्येक शनिवारी तसे करतात) त्यावेळी, दुपारी मार्ग साक्षकार्य करण्यास पण सकाळी घरोघरचे कार्य—केवळ नियतकालिके सादर करण्यास तुम्ही निवडू शकता. अशा नियतकालिक कार्यादरम्यान, दारावरील आपली सादरता संक्षिप्त—केवळ ३० ते ६० सेकंदांची—असेल आणि नियतकालिके सामान्यतः शास्त्रवचन न दाखवता सादर केली जातील. आस्था दाखवली असल्यास तिची नोंद करण्यात यावी आणि आस्थेवाईक व्यक्तींना पुन्हा भेट दिली जावी. किंवा नंतर त्याच क्षेत्रात हळूहळू मोहिमेच्या साहित्याचा उपयोग करून कार्य केले जाऊ शकते. पण दारोदारी वेगाने नियतकालिक कार्याच्या मूल्यास कधीच कमी लेखले जाऊ नये. खरे म्हणजे, मार्ग साक्षकार्याच्या तुलनेत दारावर नियतकालिके सादर केल्याने पुढील गोष्टी सुरू करण्यास बहुधा सोपे जाते:
८ नियतकालिक मार्ग: क्षेत्र नियमितपणे पूर्ण केले जात असले, तरी ज्यांच्याकडे नियतकालिक मार्ग आहेत ते पुष्कळ नियतकालिकांचे वाटप करतात. नियतकालिक मार्ग, संभाव्य गृह बायबल अभ्यासांचा सर्वोत्तम उगम आहेत.
९ तुम्ही नियतकालिके देण्यासाठी नियमित पुनर्भेटी करता, तेव्हा तुमच्यातील व घरमालकामधील स्नेह व मैत्री वाढेल असे तुम्हाला आढळेल. तुम्ही जितके परिचित व्हाल तितकेच शास्त्रवचनीय विषयांबाबत चर्चा करणे सोपे होईल. यामुळे एक फलदायी गृह बायबल अभ्यास सुरू केला जाऊ शकतो. ज्या पुनर्भेटी नियतकालिकांबद्दल स्पष्ट गुणग्राहकता दाखवतात तेथे वर्गणी सादर करा. तसेच लक्षात ठेवा, तुम्ही घरमालकाला भेटता त्या प्रत्येक वेळी तुम्ही पुनर्भेटीचा अहवाल देऊ शकता.
१० एक बहीण नियमितरित्या एका स्त्रीकडे नियतकालिके घेऊन जात असे, ती स्त्री त्यांचा स्वीकार करी पण, “तुम्ही मला जे सांगता त्यावर माझा विश्वास नाही” असे ती म्हणत. नंतरच्या भेटीत, बहिणीला त्या स्त्रीचा पती घरी भेटला. एका मैत्रिपूर्ण संभाषणानंतर, बायबल अभ्यास सुरू करण्याची योजना करण्यात आली. अभ्यासाला येणाऱ्या तीन मुलांसोबत त्या बहिणीने मैत्री केली. कालांतराने, आई व तिच्या मुलांनी त्यांचे जीवन यहोवाला समर्पित केले आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला. आजपर्यंत, त्या कुटुंबाच्या ३५ सदस्यांनी सत्य स्वीकारले आहे. हे सर्वकाही त्या बहिणीने तिच्या नियतकालिक मार्गाचा मागोवा घेतल्यामुळे झाले.
११ नियतकालिक मार्ग सुरू करण्याचे अनेक मार्ग आहेत. केवळ तुमच्या वाटपांची नोंद ठेवून त्यांच्याजवळ अलीकडील अंक घेऊन दर दोन आठवड्यांनी परतण्यास योजना करण्याद्वारे तुम्ही मार्ग सुरू करू शकता. “आमच्या पुढील अंकात” या शीर्षकाखालील माहितीचा उपयोग करणे हा एक मार्ग आहे. तुम्ही परताल, तेव्हा आधी उल्लेखिलेला लेख तुमच्याजवळ आहे हे घरमालकास सांगा. किंवा, पुनर्भेट करताना, तुम्ही असे म्हणू शकता: “हा लेख वाचताना, तो तुम्हाला आवडेल असे मला वाटले . . . .” मग लेखावर काही संक्षिप्त विवेचने मांडा आणि सादर करा. तुमची भेट देऊन झाल्यावर, तुमच्या घरोघरच्या अहवालावर या पाच साध्या मुद्यांची नोंद करा: (१) घरमालकाचे नाव, (२) घरमालकाचा पत्ता, (३) भेटीची तारीख, (४) दिलेले अंक आणि (५) दाखवलेला लेख. काही प्रचारक नियतकालिक मार्ग निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत, व त्यांनी त्यांच्या यादीत ४० किंवा त्याहून अधिक मार्ग जमवले आहेत!
१२ व्यापार क्षेत्र: जे प्रचारक व्यापार क्षेत्रात कार्य करतात त्यांनी अनेक नियतकालिकांचे वाटप केले आहे. तुम्ही दुकानादुकानांतील कार्य करून पाहिले आहे का? काही मंडळ्यांमध्ये, सेवेतील या क्षेत्रातील सहभाग फारच मर्यादित आहे असे अहवाल दाखवून देतात. सुरवातीला, व्यापारी लोकांना भेटी देण्याबद्दल अनेकजणांना भीती वाटते, पण काही वेळा तसे करून पाहिल्याने ते मनोरंजक आणि प्रतिफलदायक असल्याचे त्यांना आढळून येते. एखाद्या अनुभवी प्रचारकाला किंवा पायनियरला तुम्हाला पुढाकार घेण्यास मदत करण्यासाठी का विचारू नये?
१३ दुकानादुकानांतील कार्य करण्याचे अनेक फायदे आहेत. निदान व्यापाराच्या वेळी तरी, घरी नसलेले असे फारच कमी असतात! व्यापारी व दुकानदार यांना विशेष आस्था नसली, तरी ते बहुधा सभ्य असतात. सकाळीच प्रचाराची सुरवात करा; संभवतः तुमचे स्वागत चांगल्या पद्धतीने केले जाईल. स्वतःचा परिचय करून दिल्यावर, व्यापारी लोक घरी भेटतच नाहीत म्हणून त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांचे अलीकडील अंक देण्यासाठी तुम्ही त्यांना काही मिनिटांकरता भेट देत आहात असे म्हणू शकता. जगीक घटनांविषयी व्यापाऱ्यांना अद्ययावत असण्याची गरज आहे पण त्यांच्याजवळ फार कमी वेळ असल्यामुळे अनेक जण आपल्या नियतकालिकांची गुणग्राहकता बाळगतात. ही नियतकालिके धार्मिक, राजनैतिक किंवा व्यापारी पूर्वग्रह न देता एका नवीन दृष्टिकोनातून मनास उद्दीपित करणारी माहिती प्रस्तुत करतात. व्यापारी क्षेत्रात भेटणाऱ्या आस्थेवाईक व्यक्तींशी नियतकालिक मार्ग निर्माण केला जाऊ शकतो.
१४ कुटुंब या नात्याने तयारी करा: तुमच्या क्षेत्रात उपयोगी ठरतील असे अलीकडील नियतकालिकांतील कोणते लेख उचित असतील याची चर्चा करण्यासाठी तुमच्या कौटुंबिक अभ्यासादरम्यान थोडा वेळ बाजूला राखून ठेवा. कुटुंबाचे सदस्य—मुले देखील—आळीपाळीने त्यांच्या सादरतांचा सराव आणि सर्वसामान्य आक्षेप जसे की, “मी कामात आहे,” “आम्हाला आमचा धर्म आहे,” किंवा “मला यात काही रस नाही” यांवर मात करू शकतात. चांगल्या सहकार्यामुळे संपूर्ण कुटुंब नियतकालिक वितरण करण्यामध्ये नियमित सहभाग घेऊ शकतात.
१५ पुस्तक अभ्यास चालक मदत करू शकतात: व्यावहारिक असते, तेव्हा संपूर्ण मंडळीला राज्य सभागृहात एकत्र होण्यास सांगण्याऐवजी नियतकालिक दिवसाच्या क्षेत्र सेवेच्या सभा, पुस्तक अभ्यासाच्या ठिकाणी किंवा क्षेत्राजवळील एखाद्या प्रचारकाच्या घरी भरवल्या जाऊ शकतात. क्षेत्र सेवेच्या सभा घेण्यास ज्यांना नेमले आहे, त्यांनी गटाला विशिष्ट सूचना देण्याकरता चांगल्यारितीने तयार असले पाहिजे. यामध्ये सादरतेचा नमुना आणि स्थानिकरित्या आस्था निर्माण करण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकतील अशा अलीकडील नियतकालिकांमधील एक किंवा दोन मुद्दे समाविष्ट असू शकतात. क्षेत्र सेवेच्या सभा—गटाला सुसंघटित करणे देखील—संक्षिप्त असून, १० ते १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ त्यासाठी घेतला जाऊ नये. संपूर्ण क्षेत्र सेवेच्या कालावधीत गट प्रचार करण्यात व्यग्र असेल इतके पुरेसे क्षेत्र देण्यासाठी अभ्यास चालकांनी खात्री केली पाहिजे.
१६ नियतकालिकांबद्दल गुणग्राहकता व्यक्त करा: आमची राज्य सेवा हिच्या जुलै १९९३ च्या अंकात “द वॉचटावर व अवेक! यांचा चांगला उपयोग करणे” या प्रकाशित झालेल्या लेखात हा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला होता: “टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही सर्व नियतकालिके त्यांच्या अंक दिनांकानंतरच्या एक किंवा दोन महिन्यांमध्ये देण्यात आली नाहीत तरी त्यांचे मूल्य कमी होत नाही. वेळ उलटल्यामुळे त्यांच्यामधील माहितीचे महत्त्व कमी होत नाही . . . जुन्या नियतकालिकांचा साठा करून ठेवणे आणि त्यांचा कधी उपयोग न करणे यामुळे या मौल्यवान साधनांप्रती गुणग्राहकता नसल्याचे प्रदर्शित होते. . . . जुने अंक बाजूला ठेवून त्यांना विसरून जाण्याऐवजी, आस्थेवाईक लोकांना देण्यासाठी खास प्रयत्न करणे चांगले होणार नाही का?”
१७ आज सत्याचा शोध घेणारे अनेक प्रामाणिक अंतःकरणाचे लोक आहेत. केवळ एका नियतकालिकेतील माहितीच त्यांना सत्याकडे मार्गदर्शित करण्यास आवश्यक असेल! यहोवाने आपल्याला एक रोमांचक संदेश घोषित करावयास दिला आहे, आणि तो संदेश इतरांपर्यंत पोहंचवण्यात आपली नियतकालिके एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. भवितव्यात नियतकालिकांचे वितरण करण्यास तुम्ही अधिक दक्ष असाल का? याच सप्ताहांती यातील काही सूचनांना तुम्ही लागू कराल का? तसे केल्यास तुम्हाला समृद्ध आशीर्वाद प्राप्त होईल.
व्यावहारिक सूचना:
▪ अगोदरच नियतकालिके वाचा, आणि लेखांचा परिचय करून घ्या.
▪ तुमच्या समाजात सर्वसामान्य आस्थेच्या विषयाची हाताळणी करणारा लेख निवडा.
▪ विविध लोकांसाठी, मग ते पुरुष, स्त्रिया किंवा युवक असोत त्यांना उचित असेल अशा सादरतेची तयारी करा. ते नियतकालिक घरमालकाशी कसे संबंधित आहे आणि संपूर्ण कुटुंब त्याचा आनंद कसा लुटेल ते दाखवा.
▪ बहुतांश लोक घरी असतात त्यावेळी क्षेत्र सेवेचे कार्य करण्याची योजना करा. काही मंडळ्या नियतकालिकांसह सायंकाळचे साक्षकार्य करण्यासाठी योजना करतात.
▪ तुमची सादरता संक्षिप्त आणि मुद्याला धरून असू द्या.
▪ खूप भरभर बोलू नका. तुमचे ऐकणाऱ्याला आस्था नसल्यास, भरभर बोलल्याने काही उपयोग होणार नाही. शिथिल असण्याचा प्रयत्न करा आणि घरमालकाला प्रतिसाद देण्याची संधी द्या.
घरोघरी नियतकालिके सादर करणे:
▪ एक मैत्रिपूर्ण स्मित आणि नम्र आवाज असू द्या.
▪ नियतकालिकांबद्दल उत्साही असा.
▪ सावकाश आणि स्पष्ट बोला.
▪ एकाच विषयावर बोला; थोडी आस्था जागृत करा, आणि घरमालकाला त्याचे महत्त्व दाखवून द्या.
▪ एकच लेख ठळकपणे दाखवा.
▪ केवळ एकच नियतकालिक सादर करा आणि दुसरे सोबतीचे नियतकालिक म्हणून सादर करा.
▪ घरमालकाच्या हातात ती नियतकालिके द्या.
▪ तुम्ही पुन्हा येण्याची योजना करत आहात हे घरमालकाला सांगा.
▪ नियतकालिके नाकारण्यात आल्यास, मैत्रिपूर्ण, सकारात्मक समाप्ती करा.
▪ दाखवलेली सर्व आस्था आणि झालेले वाटप यांची घरोघरच्या अहवालात नोंद करा.
नियतकालिकांचे वाटप करण्याच्या संधी
▪ घरोघरचे साक्षकार्य
▪ मार्ग साक्षकार्य
▪ दुकानादुकानातील कार्य
▪ नियतकालिक मार्ग
▪ सायंकाळचे साक्षकार्य
▪ पुनर्भेटी करताना
▪ पूर्वीच्या बायबल विद्यार्थ्यांना भेटी देणे
▪ प्रवास किंवा खरेदी करताना
▪ नातेवाईक, सहकर्मचारी, शेजारी, शाळासोबती, शिक्षक यांच्याशी बोलताना
▪ सार्वजनिक वाहतूक किंवा प्रतिक्षालयात असताना