मेंढरासमान लोकांना भक्कम पायावर बांधण्यास मदत करा
१ घर बांधावयास काळजीपूर्वक योजनेची व एकाग्र प्रयत्नाची गरज आहे. घराची रचना आखल्यावर, जेथे घर बांधणार आहोत त्या जागेची तयारी करून भक्कम पाया घातला पाहिजे. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रगतीशीलपणे वाढत राहतो. अशारीतीने, मेंढरासमान लोकांना प्रगतीशीलपणे सत्य शिकण्यासाठी आम्ही मदत करण्यास हवी. पहिल्याच भेटीत आस्था वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यानंतर, पूनर्भेटीद्वारे आम्ही देवाबद्दल आणि मानवजातीकरता असलेल्या त्याच्या उद्देशांबद्दलचे मूळ सत्य शिकवून, पाया घालतो.—लूक ६:४८.
२ तरी, घरमालकाची परिस्थिती लक्षात घेऊन जणू काय, पाया घालण्याआधी, बांधकाम जेथे करणार आहोत त्या जागेची तयारी केली पाहिजे. मागच्या वेळी कोणता विषय हाताळला होता? कोणत्या शास्त्रवचनांचा उपयोग केला होता? प्रतिसाद कसा होता? कोणते प्रकाशन दिले होते? पुन्हा जाताना, मनामध्ये विशिष्ट मुद्दे ठेवा, आणि प्रगतीशीलपणे पाया बांधा. प्रत्येक भेटीत घरमालकाचे ज्ञान वाढते व देवामध्ये त्याचा विश्वास वाढतो.
३ “अनंतकाळ जगू शकाल” पुस्तक सादर केले होते, तर तुम्ही असे म्हणू शकता:
▪“तुम्हाला घरी पाहून मला फार आनंद वाटतो. तुम्हाला कदाचित आठवत असेल की मागच्या वेळी आपण, आपल्या परिसरामधील लोकांची देवावरील आस्था कमी होत चालली आहे यावर चर्चा केली होती. पवित्र शास्त्र स्पष्टपणे कळविते की देव मानवजातीबद्दल आस्था राखून आहे आणि त्याच्या राज्यामध्ये धार्मिक लोकांना आशीर्वाद मिळेल. [वाचा मत्तय ६:९, १०.] त्याच्या राज्याकरवी, धार्मिकता आणि न्यायाची वृद्धी होईल.” यशया ११:३-५ वाचा, आणि मग अनंतकाळ जगू शकाल पुस्तकाच्या १ ल्या धड्याच्या पहिल्या दोन परिच्छेदांकडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करा. त्यामधील माहितीचा अभ्यास कसा केला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवा.
४ पहिल्या भेटीत, शांतीदायक नवीन जगातील ही पत्रिका दिली होती, तर चांगल्या परिस्थितीच्या गरजेबद्दल व पवित्र शास्त्राच्या अभिवचनांबद्दलच्या मुख्य मुद्यांच्या आधी केलेल्या चर्चेची उजळणी घेऊ शकता. नवीन जगात जगावयाचे आहे तर, आम्ही अचूक ज्ञान घेतले पाहिजे यावर जोर द्या. योहान १७:३ वाचा. अशाप्रकारचे ज्ञान घेतल्यावर, आम्ही देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे याचे स्पष्टीकरण द्या. पहिले योहान २:१७ वाचा. पत्रिकेच्या पृ. ५ वरील विशिष्ट मुद्यांकडे घरमालकाचे लक्ष वेधवा.
५ पहिल्या भेटीत “अनंतकाळ जगू शकाल” पुस्तक सादर करताना कौटुंबिक जीवनाचा विषय ठळकपणे मांडण्यात आला होता तर तुम्ही म्हणू शकता:
▪“मागच्या वेळी मी आलो तेव्हा, आपण कौटुंबिक जीवनाच्या विषयावर चर्चा केली होती. आम्ही कबूल केले होते की आनंदी कौटुंबिक जीवन हवे आहे तर पवित्र शास्त्रामधील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विवाहाला यशस्वी करण्यासाठी कशाची गरज आहे असे तुम्हाला वाटते?” प्रतिसादास वाव द्या. अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या पृ. २४३-६ वरील माहितीतील मुख्य मुद्दे स्पष्ट करा. चित्रांबद्दल घरमालकाचे विवेचन काय आहे ते विचारा व योग्य असतील अशा निवडक मुद्यांची चर्चा करा. पवित्र शास्त्रीय तत्त्वांच्या व्यावहारिक मूल्यावर जोर द्या.
६ जर एन्जॉय फॅमिली लाईफ पत्रिका दिली होती, तर पृ. ४ आणि ५ वरील मुख्य पवित्र शास्त्रीय तत्त्वांची उजळणी करा. आस्था वाढली असेल तर, अनंतकाळ जगू शकाल पुस्तक सादर करा. “कौटुंबिक जीवन यशस्वी करणे” हा २९ वा अध्याय दाखवा, व घरमालक आणि त्याच्या कुटुंबासमवेत यावर विचार कसा केला जाऊ शकतो हेही दाखवा.
७ पुनर्भेट करण्यात सर्वांनी नियमितपणे भाग घेतला पाहिजे. सप्टेंबर मध्ये जो कोणी आस्था दाखवेल त्याच्याकडे प्रभावी पुनर्भेटी करून त्याची आस्था वाढवा.