ईश्वरी शिक्षण शक्तिशाली प्रभाव पाडते
१ तो ईश्वर, आमचा निर्माणकर्ता, यहोवा देव याच्याकडून सूचना मिळवण्यास आम्हाला किती मोठा विशेषाधिकार आहे! (स्तोत्र. ५०:१; यश. ३०:२०ब) सर्व राष्ट्रांतून आज, प्रचंड झुंडीच्या झुंडी त्याच्याकडून शिकलेले होण्यासाठी त्याच्या पवित्र उपासनेच्या पवर्ताकडे जमत आहेत. (मीखा ४:२) लाखो इतर लोक, मानवी विचार आणि जगिक ज्ञानाला उंचावणाऱ्या शाळांमध्ये नावे नोंदवत आहेत. परंतु, यहोवाकडे आणि त्याच्या लिखित वचनाकडे दुर्लक्ष करणारे ज्ञान देवाच्या नजरेत मूर्खपणाचे आहे, व त्याच्याने निरवलेले निर्बुद्ध बनतात.—स्तोत्र. १४:१; १ करिं. १:२५.
२ मागील वर्षाच्या शेवटी आमच्या प्रांतीय अधिवेशनात, आम्ही एका विलक्षण मार्गाने ईश्वरी शिक्षणाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला. “ईश्वरी शिक्षण” हा विषय संपूर्ण कार्यक्रमातून झिरपला होता. आम्ही शिकलो की, देवाचे वचन त्याच्या आत्म्यासहित आम्हाला जागतिक बंधुत्वात एकत्रित करते, आमच्या व्यक्तिमत्वाला घडवते, दुरात्म्यांच्या शिक्षणापासून आम्हाला संरक्षण देते आणि आम्हाला उत्तम सेवक बनण्यास प्रशिक्षित करते. तुम्हाला व्यक्तिगतपणे ईश्वरी शिक्षणापासून लाभ कसा झाला आहे?
३ ख्रिस्ती जीवनावरील परिणाम: ईश्वरी शिक्षण आमच्या विवेकावर प्रभाव पाडण्यास मदत करते. सर्वांचा जन्म विवेकासहित होतो, परंतु जर त्याने आम्हाला नीतीच्या मार्गाने आणि यहोवाला संतुष्टविणारी सेवा करवण्यात मार्गदर्शित केले पाहिजे तर, त्याला तालीम दिली गेली पाहिजे. (स्तोत्र. १९:७, ८; रोम. २:१५) जगाच्या लोकांनी त्यांच्या विचारांना देव वचनानुरुप आकार दिलेला नाही, आणि त्यासाठी बरोबर काय व चूक काय याविषयी ते गोंधळलेले आणि अनिश्चित आहेत. प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या नजरेत जे बरोबर ते करण्यासाठी आग्रह धरीत असल्यामुळे, नैतिक आणि नीतीसंबंधीच्या विषयांबद्दल मतभेद होतात. बहुतांश लोकांना त्यांच्या स्वतःच्या जीवनमार्गाबद्दल निर्णय घेण्यासाठी संपूर्ण स्वतंत्रता पाहिजे. ते खऱ्या ज्ञानाच्या एकाच उगमाकडे लक्ष देण्यास नकार देतात. (स्तोत्र. १११:१०; यिर्म. ८:९; दानी. २:२१) परंतु ईश्वरी शिक्षणाने आम्हासाठी हे वादविवाद सोडवले आहेत, आणि त्याच्याकडून शिकलेले असल्याकारणाने आम्ही देवाचे घराणे या नात्याने ऐक्याने राहतो. आम्ही आत्मविश्वासाने व चांगल्या विवेकाने भविष्याचा सामना करतो व आमच्या सेवाकार्यात गढून जातो.
४ ईश्वरी शिक्षण आम्हास ‘प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याचा’ प्रतिकार करण्यास मदत देते. (इफि. ४:१४) ज्यामुळे लोक दोषैकदृष्टिचे आणि नास्तिकवादी बनतात, व जे स्वतःचा निश्चय करण्यास उत्तेजन देते आणि नैतिकरित्या ढासळण्याकडे निरवते अशा तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने आम्ही आकर्षिले जात नाही. आम्ही यहोवाकडून शिकवले जाण्यास आनंदित आहोत, आणि यामुळे पुष्कळ जण अनुभवत असलेले दुःख व हृदयव्यथा आम्ही टाळतो. यहोवाचे नियम आणि स्मरणिका ‘आमच्या मागून पडणाऱ्या वाणी सारख्या’ आहेत जे म्हणतात: “हाच मार्ग आहे; याने चला.”—यश. ३०:२१.
५ आमच्या सभा आणि सेवा: आम्ही इब्रीयांस १०:२३-२५ कडे देवाची आज्ञा या दृष्टिने पाहतो. मंडळीच्या सभांमध्ये आम्हाला यहोवाकडून शिकवले जाते. सभांना नेहमी उपस्थित राहण्याची आमची सवय आहे का की, आम्ही सभेच्या उपस्थितीकडे ती कमी महत्त्वाची असल्याच्या दृष्टिने पाहतो? लक्षात ठेवा की, एकत्र मिळणे हे आमच्या उपासनेचा एक भाग आहे. त्यास ऐच्छिक समजता कामा नये. यहोवाने आम्हासाठी तयार केलेला कोणताही आध्यात्मिक भरवणूकीच्या कार्यक्रमाचा भाग आम्ही चुकवू शकत नाही.
६ मोशेने देवाकडे अशी प्रार्थना केली: “ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.” (स्तोत्र. ९०:१२) हीच आमची देखील प्रार्थना आहे का? प्रत्येक मौल्यवान दिवसाची आम्ही गुणग्राहकता बाळगतो का? आम्ही तसे केले तर, प्रत्येक दिवस योग्य प्रकारे घालवून आम्हाला “सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल,” व त्यामुळे आमचा महान शिक्षक, यहोवा देव याचे गौरव होईल. ईश्वरी शिक्षण आम्हास तसे करण्यासाठी मदत करील.