पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी तयारी करण्यास मदत करा
१ प्रत्येक आठवडी, अभ्यासासाठी तयारी करणारे पवित्र शास्त्र विद्यार्थी अभ्यासामध्ये खरोखरची आवड दर्शवतात आणि तयारी न करणाऱ्यांपेक्षा ते बहुधा अधिक आध्यात्मिक प्रगती करतात. कधीकधी विद्यार्थ्याला तयारी कशी करावी हे ठाऊक नसल्याने तो ती करत नसेल. तेव्हा त्याला तयारी कशी करावी हे शिकवणे आवश्यक ठरेल. ते कसे केले जाऊ शकते?
२ अगदी सुरवातीपासूनच, तयारी करण्यात वैयक्तिक अभ्यास गोवलेला असतो हे विद्यार्थ्याला समजते का, याची खात्री करण्यासाठी काही वेळ घ्या. पुष्कळ लोकांना, वाचता येत असले तरी, अभ्यास कसा करावा हे शिकवलेले नसते. थिऑक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक या पुस्तकामध्ये पृष्ठ ३३-४३ वर पुष्कळ मदतदायी सल्ले दिले आहेत, ज्यांना तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याची गरज असेल त्याप्रमाणे देऊ शकाल.
३ विद्यार्थ्याला अभ्यासाचे महत्त्व दाखवा: मुख्य शब्दांना किंवा शब्दप्रयोगांना अधोरेखीत केलेले किंवा खुणा केलेले तुमचे अभ्यासाचे पुस्तक, तुम्ही विद्यार्थ्याला दाखवू शकता. त्याला हे पाहू द्या की, खुणा केलेल्या भागांवर एक दृष्टी टाकल्यामुळे, त्याच्या स्वतःच्या शब्दात तो व्यक्त करू शकेल अशा विचारांची त्याला आठवण होईल. अशाप्रकारे, प्रश्नांची उत्तरे देताना पुस्तकातून संपूर्ण भाग वाचून दाखवण्याची तो इच्छा करणार नाही. या स्तरावर योग्य शिक्षण दिल्यामुळे, पुढे मंडळीत अर्थपूर्ण विवेचन करण्यासाठी त्याला मदत होईल. त्याच्या उत्तरातून विचारासाठी घेतलेल्या साहित्याबद्दलची गुणग्राहकता प्रतिबिंबित होईल आणि त्यावरुन त्याच्या समजबुद्धीची सखोलता दिसून येईल.
४ पवित्र शास्त्राचा उपयोग करण्यास त्याला शिकवा: अभ्यासातील साहित्यामध्ये संदर्भ दिलेल्या शास्त्रवचनांना कोठे शोधावे हे शिकण्याची विद्यार्थ्याला गरज आहे. तो हे कार्यक्षमतेने करू शकेल तेव्हा, तो खरोखरीच एक पवित्र शास्त्र विद्यार्थी आहे याची तो पूर्णपणे गुणग्राहकता बाळगू शकेल. पवित्र शास्त्राच्या सुरवातीला दिलेल्या सूचीचा विद्यार्थ्याला पहिल्यांदा उपयोग करावा लागत असला तरी, पवित्र शास्त्राच्या ६६ पुस्तकांच्या क्रमाचा परिचय करुन घेण्यासाठी त्याला उत्तेजन द्यावे. तो शास्त्रवचन काढून वाचतो तेव्हा, चालू अभ्यासाशी थेट संबंधीत नसलेल्या भागांकडे मन न वळवता, विचारात घेतल्या जाणाऱ्या परिच्छेदातील मुद्याला पुष्टी देणाऱ्या भागाला ओळखण्यासाठी त्याची मदत करा.
५ विद्यार्थी प्रगती करत जाईल तसे, पवित्र शास्त्राचे सुरवातीपासून शेवटापर्यंत वाचन करण्यास त्याला प्रोत्साहन द्या. संपूर्ण पवित्र शास्त्र देवाचे प्रेरित वचन आहे आणि खऱ्या ख्रिश्चनांनी त्यातून आध्यात्मिक पौष्टिकता मिळवावी यावर जोर द्या.—मत्त. ४:४; २ तीम. ३:१६, १७.
६ इतर ईश्वरशासित संदर्भांचा परिचय करुन द्या: विद्यार्थ्याने बरीच प्रगती केली असल्यास, इतर ईश्वरशासित संदर्भांचा उपयोग करावयास तो सुरवात करू शकतो. तो मंडळीतील सभांना उपस्थित राहील तसे, परिचित झालेल्या संस्थेच्या प्रकाशनांतून, समजबुद्धीने, अधिक माहिती मिळवण्यासाठी उत्तेजन द्या. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मधून “वर्णानुक्रमानुसार पवित्र शास्त्राचे शब्द” अशा खास वैशिष्ट्यांचा उपयोग कसा करावा हे त्याला शिकवा. तो स्वतःचा ईश्वरशासित संग्रह वाढवतो तसे, कॉम्प्रीहेनसिव्ह कॉन्कॉरडन्स्, रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स, इंडेक्स्, आणि इन्साईट खंडांचा उपयोग कसा करावा ते शिकवा.
७ पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना पवित्र शास्त्र अभ्यासासाठी कशी तयारी करावी हे शिकवल्यास, आम्ही, त्यांचा वैयक्तिक घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास संपल्यानंतर देखील कार्यक्षम पवित्र शास्त्र विद्यार्थी म्हणून सत्यामध्ये प्रगती करत राहण्यास त्यांना सज्ज करू.