वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९३ पृ. २
  • नोव्हेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • उपशिर्षक
  • नोव्हेंबर १ ने सुरु होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर ८ ने सुरु होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर १५ ने सुरु होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २२ ने सुरु होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २९ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९३
km ११/९३ पृ. २

नोव्हेंबरसाठी सेवा सभा

नोव्हेंबर १ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ५ (१०४)

१० मि:स्थानिक घोषणा तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. राज्याच्या कामात म्हणजेच प्रचार कार्यात प्रचारकांच्या सहभागितेसाठी त्यांची प्रशंसा करा.

१० मि:“ड्रिम्झ्‌,” रिझनिंग पुस्तक, पृष्ठ १०४-६. पवित्र शास्त्र विद्यार्थ्यासोबत चर्चा, अशाप्रकारे हाताळावे. आपल्या स्वप्नांद्वारे मार्गदर्शित होण्यात कितपत सुज्ञता आहे याबद्दल विद्यार्थी विचारतो. याच्या धोक्यांबद्दल, व त्यामुळे जगिक तर्क आणि पिशाच्चवादाला आपण कशाप्रकारे बळी पडू याबद्दल चर्चा करा. देव वचनाच्या तत्त्वांनी मार्गदर्शित होण्याचे महत्त्व दाखवा.

१० मि:स्थानिक गरजा किंवा वॉचटावरच्या ऑगस्ट १, १९९३, पृष्ठ ३-८ वरील लेखांवर आधारित “कम्युनिकेशन—मोर दॅन जस्ट टॉक” भाषण.

१५ मि:“आजच्या जगामध्ये पवित्र शास्त्राचे महत्त्व.” सेवा पर्यवेक्षक आणि घरोघरच्या कामात कार्यक्षमता सुधारण्याची इच्छा असलेला प्रचारक, यांच्यामधील चर्चा. परिच्छेद ३ विचारात घेतल्यावर, सेवा पर्यवेक्षकाला घरमालक समजून, सूचित केलेल्या सादरतेचा प्रयत्न करण्यासाठी सेवा पर्यवेक्षक प्रचारकास सांगतो. परिच्छेद ४ विचारात घेतल्यावर, सेवा पर्यवेक्षक प्रचारकास, सूचित केलेली सादरता कशी करावी ते दाखवतो. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या मूल्याबद्दल कृतज्ञ असण्यासाठी आस्थेवाईक लोकांना आणि पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना मदत करण्यास मंडळीला उत्तेजन द्या.

गीत ५२ (५९) व समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर ८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७ (९३)

१० मि:स्थानिक घोषणा. या सप्ताहांती क्षेत्र सेवेत उपयोगात आणल्या जाणाऱ्‍या लेखाला दाखवून चालू मासिकांच्या सादरतेबद्दल प्रात्यक्षिक दाखवा. “क्षेत्र सेवेसाठी एक खास महिना,” याकडे लक्ष आकर्षित करा आणि डिसेंबर महिन्यात साहाय्यक पायनियर म्हणून किंवा पायनियरांसोबत कार्य करून सर्वांना त्यांची क्षेत्र सेवा वाढण्याच्या शक्यतेकडे गंभीरतेने लक्ष देण्यास आमंत्रण द्या.

१५ मि:“खरे मार्गदर्शन पुरवणारे पुस्तक.” लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा करा. परिच्छेद ३ मध्ये दिलेल्या पुनर्भेटीचे प्रात्यक्षिक दाखवा. घरोघरचे काम करतेवेळी तसेच पुनर्भेटी करतेवेळी लोकांशी बोलत असताना त्यांना पवित्र शास्त्राच्या व्यावहारिक मूल्याबद्दल उत्सुकतेने सांगावयास सर्वांना उत्तेजन द्या.

२० मि:“युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा.” वडील परिच्छेद १-१८ ची चर्चा दोन किंवा तीन बाप्तिस्मा प्राप्त तरुण प्रचारकांबरोबर करतात. युवकांच्या चांगल्या उदाहरणामुळे ते ज्या लाभांची कापणी करतात त्यावर आणि “तरुण लोक विचारतात. . . .” या लेखांच्या मूल्यांवर जोर द्या. वेळ अनुमती देईल तसे शास्त्रवचनांना विचारात घ्या.

गीत ८० (७१) व समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर १५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७३ (१८)

५ मि:स्थानिक घोषणा व त्याचबरोबर जमाखर्च अहवाल आणि देणगीची पोचपावती वाचून दाखवा. स्थानिक मंडळीच्या तसेच संस्थेच्या राज्य सभागृहाच्या निधीसाठी आणि संस्थेच्या जगव्याप्त कामासाठी जी आर्थिक मदत केली गेली त्याबद्दल मंडळीला आभार प्रदर्शित करा. येणाऱ्‍या जगिक सुट्टीच्या हंगामाच्या वेळी क्षेत्र सेवेच्या व्यवस्थेबद्दल सांगा.

२० मि:“देवाच्या संघटनेशी सहवास ठेवण्यासाठी पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना मदत करणे.” प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद ८ मधील प्रात्यक्षिक दाखवा, व परिच्छेद ९ मध्ये दर्शवल्यानुसार राज्य सभागृहास आमंत्रण देऊन त्याचा समारोप करा.

२० मि:“युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा.” पुरवणीच्या १९-३३ परिच्छेदांची प्रश्‍नोत्तराने चर्चा. एक किंवा दोन तरुण प्रचारकांची मुलाखत घ्या. मंडळी त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी किती मदतदायी ठरली आहे त्याबद्दल त्यांची मते घ्या.

गीत ९० (१०२) व समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर २२ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७४ (४४)

१० मि:स्थानिक घोषणा व ईश्‍वरशासित वृत्त. या सप्ताहांती साक्षकार्य करत असताना चालू मासिकांचा उपयोग करण्यासाठी उत्तेजन द्या.

१५ मि:“पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी तयारी करण्यास मदत करा.” प्रश्‍नोत्तरे. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे परिच्छेदांना वाचा.

२० मि:“तुम्ही शास्त्रवचनांमधून तर्क करता का?” घरोघरच्या आणि पुनर्भेटीच्या कार्यात प्रभावकारी असणाऱ्‍या बांधवाने प्रश्‍नोत्तराने हाताळावे. परिच्छेद ४ विचारात घेतल्यावर, घरमालक कामात असताना प्रचारक स्मरण करुन एखादे वचन कसे सांगू शकतो किंवा त्याच्या शब्दात कसे मांडू शकतो हे दाखवा. प्रात्यक्षिकानंतर, पुष्कळ लोक, कामात असलेल्या किंवा नित्यक्रमात व्यग्र असलेल्या क्षेत्रात, “वचनाची घोषणा” करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असताना या सल्ल्याचा अवलंब करण्याच्या महत्त्वावर जोर द्या. (२ तीम. ४:२) परिच्छेद ६ विचारात घेतल्यावर, रिझनिंग पुस्तक वापरुन प्रभावकारी असणाऱ्‍या प्रचारकाला साक्षकार्यात त्याचा उपयोग तो कसा करतो हे सांगावयास बोलवा.

गीत १०८ (६९) व समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर २९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ८३ (२)

१० मि:स्थानिक घोषणा. डिसेंबर महिन्यात साहाय्यक पायनियरींग करू शकतील अशांना उत्तेजन द्या.

१५ मि:“द बायबल—ए प्रॅक्टीकल गाईड फॉर मॉर्डन मॅन.” मे १, १९९३ च्या वॉचटावर लेखावर आधारित कुटुंब प्रमुखाद्वारे भाषण. पवित्र शास्त्र तत्त्वांचा अवलंब केल्याने कुटुंबात शांतीमय, प्रेमळ वातावरण राहील, यावर जोर द्या. देव वचनातील सल्ल्यामुळे एका कुटुंबाला किंवा व्यक्‍तीला कशी मदत मिळाली त्यासाठी श्रोत्यांमधून एक किंवा दोन तयार केलेले अभिप्राय विचारा.

२० मि:डिसेंबरमध्ये मेंढरासमान लोकांची मदत करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक वापरणे. श्रोत्यांबरोबर चर्चा. अशाप्रकारचे प्रश्‍न विचारा: येशूच्या सेवेबद्दल किंवा इतरांबरोबर त्याच्या वागणूकीविषयी कोणत्या एका अहवालाने तुम्हाला प्रभावीत केले? या अहवालाने तुम्हाला प्रभावीत का केले? या प्रकाशनाचे तुम्हासाठी काय महत्त्व आहे? त्याचा अभ्यास करुन तुम्ही यहोवाविषयी काय शिकला आहात? ते सादर करताना तुम्ही कोणत्या मुद्यांना दाखवले आहे? एका अनुभवी प्रचारकाला पुस्तकाची सादरता करण्याचे प्रात्यक्षिक दाखवा. सर्वांना रविवारच्या क्षेत्र सेवेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्या.

गीत ९४ (२२) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा