सुवार्तेची घोषणा करण्यात ढिलाई नाही
१ आरंभीच्या ख्रिश्चनांनी त्यांच्या सेवेला अतिशय गंभीर समजले. लूकने अहवाल दिला: ‘दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्यात व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्यात त्यांनी ढिलाई केली नाही.’ (प्रे. कृत्ये ५:४२) काहीच त्यांना रोखू शकले नाही, अगदी छळणूक देखील! (प्रे. कृत्ये ८:४) ते इतरांशी दररोज सत्याविषयी बोलायचे.
२ आपल्याबद्दल काय? स्वतःला विचारा: ‘मी समयाची निकड जाणून आहे का? सुवार्तेची घोषणा ढिलाई न करता करत राहण्याकडे माझा कल आहे काय?’
३ ढिलाई न करता केलेल्या प्रचारातील आधुनिक दिवसाची उदाहरणे: पोलिओ झालेल्या एका बहिणीला कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे साधन लावलेले होते. तिला राज्य सभागृहात जाता येत नव्हते अथवा संमेलनाला उपस्थित राहता येत नव्हते. परंतु, सुवार्तेची घोषणा करण्यात ती अतिशय व्यग्र होती. स्वास्थ्यामुळे ३७ वर्षे बंदिस्त अवस्थेत असताना, ती १७ लोकांना सत्य शिकण्यास मदत करू शकली! हे तिने कसे केले? दारोदारी जाऊ शकत नसल्यामुळे, तिच्या संपर्कात जे यायचे त्यांना अनौपचारिकपणे दररोज साक्ष देण्याचा मार्ग तिने शोधून काढला.
४ बॉस्नियातील आपल्या बांधवांना युद्ध आणि हानीला तोंड द्यावे लागले आहे. तरीसुद्धा, ते नियमितपणे इतरांना प्रचार करत राहतात. सारायेवोमध्ये, प्रचारक इतरांना सुवार्ता सांगण्यात दर महिन्याला सरासरी २० तास घालवत आहेत आणि सरासरीने प्रत्येकी दोन बायबल अभ्यास चालवत आहेत. त्यांच्या संकटमय परिस्थितींखेरीज, ते ढिलाई न करता प्रचार व शिकवण्याचे काम करत राहतात.
५ चिमुकले देखील सेवेकरता आवेश प्रदर्शित करतात. र्वांडा येथे, साक्षीदारांच्या एका कुटुंबाला एका खोलीत डांबण्यात आले जेथे सैनिक त्यांना ठार मारण्यासाठी तयारच होते. कुटुंबाने आधी प्रार्थना करण्याची परवानगी मागितली. ती देण्यात आल्यावर त्यांची लहान मुलगी, डबोरा हिने मोठ्याने प्रार्थना केली: “यहोवा, या आठवडी पप्पा आणि मी पाच नियतकालिकांचे वाटप केले. त्या लोकांना सत्य शिकवण्यासाठी व जीवन मिळण्यास मदत करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे कसे जाऊ शकू?” सेवेप्रती असलेल्या तिच्या दृढ विश्वासामुळे व प्रीतीमुळे ते संबंध कुटुंब बचावण्यात आले.
६ आज, इतरांना साक्ष देण्याकरता संधी साधण्याचे आणि ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांना’ शोधून काढण्याचे अगत्य आहे. (प्रे. कृत्ये १३:४८) स्थानिक परिस्थित्यनुरूप, मंडळीतील वडील सोयीस्कर वेळी, मग ते सकाळी, दुपारी अथवा संध्याकाळी असे कधीही असो, गट साक्षकार्यासाठी योजना करतात. आमची राज्य सेवा यातील लेख आणि सेवा सभांमधील भाग, विभागीय संमेलने आणि प्रांतीय अधिवेशने राज्य साक्षकार्याच्या विविध पैलूंमध्ये भाग घेण्यासाठी समयोचित सूचना आणि उत्तेजन देतात. या शिवाय, विभागीय तसेच प्रांतीय पर्यवेक्षक मार्ग साक्षकार्यात प्रचारकांना प्रशिक्षित करतात, व्यापारी क्षेत्रात कार्य कसे करावे ते दाखवतात आणि लोक जेथे कोठे भेटतात तेथे त्या सर्वांना साक्ष देण्याचे इतर मार्ग दाखवतात. हे सर्व, सुवार्तेची घोषणा करण्यात ढिलाई करू नये यावर जोर देते!
७ येशूच्या शिष्यांनी धैर्याने घोषणा केली: “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही.” अडचणी असताना देखील ते कसे टिकून राहिले? मदतीसाठी त्यांनी यहोवाकडे याचना केली, जी त्याने देऊ केली, आणि “ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.” (प्रे. कृत्ये ४:२०, २९, ३१) सर्वांना सेवाकार्यात उल्लेखनीय अनुभवांचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही, पण ढिलाई न करता आपण सुवार्तेची घोषणा करण्याची खरीच इच्छा धरली आणि तसे करण्यासाठी दररोज प्रयत्न केला तर यहोवा आपल्याला मदत करील.