वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९८ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९८
आमची राज्य सेवा—१९९८
km २/९८ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना आहे), किंवा संस्थेने पुरविलेल्या अर्ध्या दर किंवा खास दर यादीतील कोणतीही १९२-पृष्ठांची जुनी पुस्तके. जेथे स्थानिक भाषेत अशा प्रकारची पुस्तके उपलब्ध नाहीत तेथे ज्ञान किंवा कौटुंबिक सौख्यानंद ही पुस्तके प्रत्येकी २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय राखा.एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या.

मे ४, १९९८ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहापासून सप्टेंबर १४, १९९८ या सप्ताहापर्यंत सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, देव खरोखरी आपली काळजी करतो का? आणि देव आपल्याकडून काय अपेक्षितो? ही माहितीपत्रके एका पाठोपाठ एक मंडळीच्या पुस्तक अभ्यासात अभ्यासिली जातील.

सचिव आणि सेवा पर्यवेक्षकांनी सर्व नियमित पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. जर कोणाला तास भरण्यात समस्या असेल, तर वडिलांनी त्यांना मदत देण्याची व्यवस्था करावी. सूचनांकरता, संस्थेने पाठवलेल्या ऑक्टोबर १, १९९३ व ऑक्टोबर १, १९९२ पत्रांची (S-201) उजळणी करा. तसेच, ऑक्टोबर १९८६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीतील १२-२० परिच्छेद पाहा.

मंडळी स्थानीय संमेलनांना उपस्थित राहते तेव्हा पुढील बदल करण्याची गरज आहे याची वडीलवर्गाला जाणीव असली पाहिजे: खास संमेलन दिवस कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा जाहीर सभा आणि टेहळणी बुरूज अभ्यास यांखेरीज मंडळीने संपूर्ण आठवड्यात नेहमीप्रमाणे सभा घ्याव्यात. विभागीय संमेलनाला उपस्थित राहावे लागते तेव्हा मंडळी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा देखील रद्द करील; फक्‍त आठवड्यादरम्यान मंडळीचा पुस्तक अभ्यास स्थानीयरीत्या घेतला जाईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा