वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९८ पृ. ७
  • ‘यहोवा माझा सहायक आहे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘यहोवा माझा सहायक आहे’
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्र आत्म्याला मी माझा कैवारी केला आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • प्रेमामुळे बळकट होणारे धैर्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • धैर्य धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • ‘खंबीर व्हा व हिंमत धरा!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km २/९८ पृ. ७

‘यहोवा माझा सहायक आहे’

येशूने आपल्या पहिल्या शिष्यांना कार्यनियुक्‍तीवर पाठवले तेव्हा त्याने त्यांस सांगितले: “पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो.” (मत्त. १०:१६) यावर भयभीत होऊन त्यांनी माघार घेतली का? नाही. प्रेषित पौलाने पुढे व्यक्‍त केलेली मनोवृत्तीच त्यांनी बाळगली जेव्हा त्याने सहख्रिश्‍चनांना म्हटले: ‘धैर्याने म्हणा यहोवा माझा सहायक आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?’ (इब्री. १३:६) येशूच्या नावासाठी अपमानास पात्र ठरविण्यात आल्यामुळे त्यांनी आनंद केला आणि शिकविण्याचे व सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.—प्रे. कृत्ये ५:४१, ४२.

२ आज जगव्याप्त प्रचार कार्य अंतिम टप्प्यांत येऊन ठेपले आहे. येशूने भाकीत केले त्याप्रमाणे, सर्व राष्ट्रे आपला द्वेष करत आहेत. (मत्त. २४:९) आपल्या प्रचार कार्याचा विरोध व उपहास केला जात आहे; आणि पृथ्वीच्या पाठीवरील काही भागांत तर त्यावर बंदी घालण्यात आली आहे. आपल्यामध्ये विश्‍वासाचा अभाव असता तर कदाचित आपण घाबरून गेलो असतो. तथापि, यहोवा आपला सहायक असल्याची जाणीवच, आपल्याला उभारी देते आणि चिकाटी राखण्यास आपल्याला सामर्थ्यवान करते.

३ धैर्य हा बलवान, धाडसी व शूर असण्याचाच एक गुण आहे. ते भय, भित्रेपणा, भेकडपणा यांच्याविरुद्ध आहे. येशूच्या शिष्यांना नेहमीच सहन करण्यासाठी धैर्याची गरज भासली. देवाशी वैर असलेल्या जगाच्या प्रवृत्त्या व कृत्यांमुळे खचून जाऊ नये म्हणून आपल्यालाही धैर्याची गरज आहे. जगावर विजय मिळवलेला येशू, याच्या सर्वोत्तम उदाहरणाचा विचार करणे किती उत्तेजनात्मक ठरेल बरे! (योहा. १६:३३) हे देखील लक्षात असू द्या, की भयंकर संकटप्रसंगांतही प्रेषितांनी धैर्याने घोषित केले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रे. कृत्ये ५:२९.

४ माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही: आपल्या कार्यासंबंधी एक सकारात्मक मनोवृत्ती राखण्यास आपण प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. (इब्री. १०:३९) मानवजातीप्रती असलेल्या देवाच्या प्रेमाची व दयेची अभिव्यक्‍ती म्हणून आपल्याला पाठवले जात आहे याचा कधीही विसर पडू देऊ नका. तो आपल्या सेवकांना कधीच कोणतेही अर्थहीन काम करायला लावत नाही. आपल्याला नियुक्‍त केलेले हरएक कार्य, देवावर प्रेम करणाऱ्‍यांसाठी शेवटी कल्याणकारीच ठरेल.—रोम. ८:२८.

५ आपल्या क्षेत्रातील मेंढरांसमान लोकांना शोधत राहण्यास एक सकारात्मक मनोवृत्ती आपल्याला मदत करील. लोक दाखवत असलेली उदासीनता त्यांच्या वैफल्याची व निराशेची अभिव्यक्‍ती असल्याचे आपण मानू शकतो. आपले प्रेम आपल्याला सहानुभूतीशील व सहनशील असण्यास प्रवृत्त करो. आपण साहित्याचे वाटप करतो त्या प्रत्येक प्रसंगी किंवा मग आस्थेची एखादी ठिणगी देखील आपल्याला आढळते तेव्हा तत्परतेने पुनर्भेट करून आणखीन आस्था चेतविणे हा आपला उद्देश असला पाहिजे. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या किंवा तो संचालित करण्यात प्रभावकारी असण्याच्या आपल्या कुवतीसंबंधी आपण कदापि साशंक असू नये. उलटपक्षी, यहोवा आपल्याला साह्‍य करील अशा भरवशानिशी आपण वारंवार व प्रार्थनापूर्वक त्याचे साह्‍य व मार्गदर्शन मिळविण्यास झटले पाहिजे.

६ यहोवा हे कार्य सिद्धीस नेईल यावर आपला दृढ विश्‍वास आहे. (पडताळा फिलिप्पैकर १:६) ‘चांगले ते करण्याचा आपण कंटाळा करू नये’ म्हणून आपला सहायक या नात्याने त्याच्यावरील आपला संपूर्ण भरवसा आपल्याला सामर्थ्यवान करतो.—गलती. ६:९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा