घोषणा
▪साहित्य सादरता मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय राखा. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात. जून: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. (पायनियरांसाठी याचे दर १५.०० रुपये आहे.) पर्याय म्हणून, अर्ध्या दर अथवा खास दर यादीतील कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्यांची मागणी पाठवलेली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-AB-14) ती पाठवावी.
▪ एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान सहायक पायनियरींग करू इच्छिणाऱ्या प्रचारकांनी आताच योजना कराव्यात व होता होईल तितक्या लवकर आपले अर्ज द्यावेत. यामुळे वडिलांना क्षेत्र सेवेच्या आवश्यक योजना करण्यास व पुरेशी नियतकालिके व साहित्य उपलब्ध करण्यास मदत होईल. सहायक पायनियर म्हणून ज्यांना स्वीकृती मिळाली त्या सर्वांची नावे मंडळीत घोषित केली जावीत.
▪ अध्यक्षीय पर्यवेक्षक अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने मार्च १ रोजी अथवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यानंतर मंडळीत त्याची घोषणा करण्यात यावी.