जुलै २२ च्या सप्ताहाचा आराखडा
२२ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १३ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १३ परि. १०-१९ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये २२-२५ (१० मि.)
क्र. १: प्रेषितांची कृत्ये २२:१७-३० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: आपण कोणत्या अर्थी जगात राहूनसुद्धा जगाचे नाहीत? —योहान १७: १५, १६ (५ मि.)
क्र. ३: सुवार्तेचा सगळीकडे प्रसार होतो—बायबलचा संदेश पृ. २६ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: तुमच्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहचा. (लूक २४:३२) पुढील तीन प्रश्नांवर आधारित चर्चा: (१) बायबल अभ्यास करताना (क) यहोवाचे प्रेम आणि बुद्धी (ख) बायबलची तत्त्वे लागू करण्याचे महत्त्व (ग) एखादा निर्णय घेण्याआधी यहोवाकडे मार्गदर्शन मागणे या गोष्टींवर भर देणे का महत्त्वाचे आहे? (२) तुमच्या विद्यार्थ्याला पुढील प्रश्न विचारल्यामुळे तुम्ही त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहचत आहात की नाही हे जाणून घेण्यास तुम्हाला कशी मदत होऊ शकते? (क) तुला हे पटतं का? (ख) यावरून देव प्रेमळ आहे असं तुला वाटतं का? (ग) हा सल्ला लागू केल्यानं तुला काय फायदा होईल असं तुला वाटतं?
२० मि: “तरुण बांधवांनो, जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येऊ शकता का?” प्रश्न व उत्तरे. मंडळीतील एका वडिलांची किंवा सेवा सेवकांची संक्षिप्त मुलाखत घ्या ज्यांनी तरुण असताना ही ध्येय प्राप्त केली. त्यांना विचारा, सेवा सेवक बनण्याआधी त्यांना कोणत्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या आणि त्यांना कशा प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले? मंडळीतील इतरांनी त्यांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी कशी मदत केली? जबाबदारीचे पद मिळवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले?
गीत २६ आणि प्रार्थना