ईश्वरशासित वृत
◆ ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अर्जेंटिनामध्ये २८ प्रांतिय अधिवेशने पार पडली, ज्यांची एकूण उपस्थिती १,३०,२६२ होती. नोव्हेंबरमध्ये एक नवा उच्चांक गाठण्यात ७९,८५८ प्रचारकांनी कार्य अहवाल दिला.
◆ आईसलँडने नोव्हेंबरमध्ये २३३ प्रचारकांचा एक नवा टप्पा गाठल्याचा अहवाल दिला. त्यांच्या एक दिवसाच्या खास संमेलनात ३८२ उपस्थितांचा खास उच्चांक होता.
◆ आयर्लंडने नोव्हेंबरमध्ये प्रचारक संख्येत २० वी वाढ गाठून ३,२५५ चा टप्पा सहज गाठला. हे लक्षात घेणे उत्साहवर्धक ठरेल की, एका दिवसाच्या खास संमेलन मालिकेत ७८ लोकांनी बाप्तिस्मा करवून घेतला.
◆ मादागास्करने नोव्हेंबर महिन्यात प्रचारकात कमालीची ८ टक्के वाढ मिळविली व ३,४२४ प्रचारकांनी अहवाल दिला.
◆ सेंट मार्टेनने अलिकडील नोव्हेंबरच्या अहवालात १४१ प्रचारक म्हणजेच १७ टक्के वाढीचा नवा उच्चांक गाठला. एक दिवशीय खास संमेलनात २८२ उपस्थिती होती.
◆ झिम्बाब्वे १७,११३ प्रचारकांच्या अहवालासह नोव्हेंबरमध्ये एक नवा उच्चांक गाठण्यात यश मिळविले. ते सर्व मिळून १९,१९० पवित्र शास्त्र अभ्यास चालवीत आहेत.
◆ अमेरिकेत लॉस एंजल्स, कॅलेफोर्निया येथे रविवार, जानेवारी १४, १९९० रोजी मिनिस्ट्रीयल ट्रेनिंग स्कूलचा पाचवा वर्ग अभ्यासक्रम पुरा करून पार पडला. २० पदवीधरांना अमेरिकेबाहेर सहा वेगवेगळ्या देशात पाठविण्यात आले.