ईश्वरशासित वृत्त
ब्रिटीश व्हर्जिन आयलँड: मे महिन्यातील १३६ प्रचारकांच्या नव्या उच्चांकाने २०६ पवित्र शास्त्र अभ्यास चालविले; हा देखील एक नवा उच्चांक होता.
फिजी: मे महिन्यात त्यांचा प्रचारकांचा ७७ वा सलग उच्चांक गाठला गेला. १,६४२ प्रचारकांनी अहवाल दिला. त्यांनी तासांचा ३२ वा आणि पुनर्भेटी व पवित्र शास्त्र अभ्यासाचा ४८ वा सलग उच्चांक गाठला. शाखा दप्तराच्या क्षेत्रात मे महिन्यात ५ नव्या मंडळ्या स्थापित झाल्या.
केनया: मे महिन्यात ६,०६५ प्रचारकांचा अहवाल कळवून पहिल्यांदाच ६,००० प्रचारकांची संख्या ओलांडण्यात आली.
कोरिया: मे मध्ये ६५,२६० प्रचारकांचा अहवाल देण्यात आला. हा गेल्या ८९ महिन्यातील ८४वा उच्चांक आहे.
पापुआ न्यू गिनिआ: मे महिन्यात २,५४७ प्रचारकांचा अहवाल कळवून आणखी एक प्रचारकांचे शिखर गाठले गेले.
यु. एस. व्हर्जिन आयलँडस्: मे महिन्यातील १९ टक्के वाढीने ५६० प्रचारकांचे नवे शिखर गाठण्यात आले.