यहोवाच्या सेवेत कार्यमग्न राहणे
१ यहोवाची सेवा करण्याचा आम्हाला खराच हक्क आहे. त्याच्याबद्दल तसेच त्याचा एकुलता पुत्र येशूबद्दलचे अचूक ज्ञान घेतल्यामुळे आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे देण्याची प्रेमाने चालना लाभली आहे. (योहान १७:३) आम्हास कधी थकवा आलाच, तर यहोवा आम्हाला सामर्थ्य देतो की ज्यामुळे आम्हाठायी पूर्ण बळ येते.—यशया ४०:२९.
२ यहोवा देव व येशू ख्रिस्ताने जे थोर प्रेम आम्हासंबंधाने व्यक्त केले आहे त्याबद्दल आम्ही आपली कदर सर्वात उत्तम पद्धतीने कशी दाखवू शकतो? (२ करिंथ. ५:१४, १५) याचा मूलभूत मार्ग म्हणजे येशूचे अनुकरण करणे, ज्याने अविरतपणे आपल्या पित्याचे नाव व त्याचे राज्य याबद्दल साक्ष दिली. (१ पेत्र २:२१) आम्हाठायी बळकट विश्वास असला तर आमचे जीवन सुवार्तेचा प्रचार करण्याच्या देव-नियोजित कामी गुंफलेले राहील.—मत्तय २४:१४.
३ आम्ही क्षेत्र सेवेत कमीत कमी वेळ देऊ शकू असे काही आहे का? याबाबतीत परिस्थिती भिन्न आहे. वाढते वयोमान, ढासळते आरोग्य किवा कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे आमच्यावर मर्यादा पडत असतील. तरी आम्ही सर्वांनीच यहोवास करीत असलेल्या आमच्या सेवेत पूर्ण हृदयी असण्याची गरज आहे. याचा हा अर्थ होतो की, आम्ही व्यक्तीशः कार्यात जितके करता येते ते करुन आमची निष्ठा व आमच्या समर्पणाचा खरेपणा याचे प्रमाण दिले पाहिजे. (२ तीमथ्य २:१५) आमच्या व्यक्तीगत परिस्थितीनुसार आम्हापुढे सुसंध्या उघड्या असतात. यापैकी काही कोणत्या आहेत?
४ सेवाकार्य वाढविण्याचे मार्ग: पहिल्या प्रथम आम्ही आमच्या सेवकपणाचा दर्जा सुधारण्याची आस्था राखली पाहिजे. हे शिक्षक या नात्याने आमची गुणवत्ता वाढवून साध्य केले जाऊ शकते. ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेचे एक प्रमुख ध्येय हे आहे की, आम्हाला क्षेत्रकार्यात अधिक प्रभावी होण्यासाठी मदत देणे. आम्ही आमच्या भाषणाच्या नेमणूकीची तयारी करतो तेव्हा क्षेत्रसेवेचा विचार करतो का? आम्हास देण्यात येणाऱ्या सूचनेचा अवलंब करून आम्ही आपली व्यक्तीगत सेवा सुधरवितो का? (sg पृ. ९६-९) याचप्रमाणे सेवा सभेच्या वेळीही क्षेत्रकार्याबाबत अनेक सूचना देण्यात येतात. यांचा होता होईल तितक्या लवकर अवलंब करु या.
५ यापुढे, आपल्या परिस्थितीत फेरबदल करण्याचा विचार करा की ज्यामुळे साहाय्यक किंवा नियमित पायनियरिंग करण्यात सहभाग घेता येईल. असे केल्यामुळे आमचा पिता यहोवा याच्या सेवेत तुम्हाला निश्चितपणे मग्न राहता येईल. (१ करिंथ १५:५८) पण तुम्हाला पायनियरिंग करता आली नाही तर काय? तर, सेवाकार्याबद्दलची आपली खरी प्रीती तसेच क्षेत्रातील लोकांबद्दल खोल काळजी वाढवीत राहून तुम्हाला पायनियर आत्मा प्रदर्शित करता येईल. आपणापाशी असणाऱ्या प्रत्येक संधीचा वापर पुनर्भेटी करण्यासाठी व पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यासाठी करून प्रांजळ लोकांना यहोवा व त्याच्या अद्भूत उद्देशांचे ज्ञान देण्याची मदत देण्यासाठी करू शकाल.
६ जेथे गरज आहे तेथे सेवा करण्याच्या आमंत्रणास प्रतिसाद देणे हे देखील आमच्या प्रगतीचा एक भाग असेल. (यशया ६:८) सेवकवर्गाच्या मदतीची गरज आहे किंवा क्षेत्राचा उरक होण्यासाठी साहाय्याची गरज असणाऱ्या मंडळीत ज्यांनी स्थलांतर केले आहे अशांना मुबलक आशीर्वादांचा लाभ मिळाला आहे.
७ आम्हाला सत्य प्रथम शिकायला मिळाले तेव्हा यहोवा व ख्रिस्त येशू यांजवरील प्रेमामुळेच आम्ही आपल्या जीवनात मोठे बदल करू शकलो. आता, आपण आमच्या स्वर्गीय पित्याच्या नातेसंबंधात आणि त्याच्या पुत्राने आम्हासाठी जे केले आहे त्याच्या रसिकतेमध्ये वाढत असता आम्हाला आमचे सेवकपण वाढीस लावता येण्यासाठी काही फेरबदल करणे शक्य आहे का? तर यहोवाच्या सेवेत कार्यमग्न होऊन आपण स्वत:ला खर्ची घालू या.—रोमकर १२:११.