वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९२ पृ. ३
  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारक विधीच्या तयारीसाठी
    आमची राज्य सेवा—१९९३
  • १९९१चा स्मारक विधी समारंभ
    आमची राज्य सेवा—१९९१
  • स्मारक विधीची तयारी करा
    आमची राज्य सेवा—१९९५
  • स्मारक विधीकरता सूचना
    आमची राज्य सेवा—२००१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km ४/९२ पृ. ३

“माझ्या स्मरणार्थ हे करा”

१ येशूने आपल्या अनुयायांना त्याच्या मृत्युचे स्मरण करण्याची आज्ञा दिली. (लूक २२:१९) येशूने मानवजातीप्रीत्यर्थ आपले जे महान यज्ञार्पण सादर केले त्याचे स्मरण हा विधी आम्हास देतो. या वर्षी, यहोवाचे लोक जगभर, ख्रिस्ताच्या मृत्युचे स्मरण शुक्रवार, एप्रिल १७ रोजी, सूर्यास्तानंतर करतील.

२ व्यक्‍तीगत तयारी: या महत्त्वाच्या प्रसंगाचे उचितपणे पालन करण्यासाठी आपण कशी तयारी करू शकतो? येशूचे पृथ्वीवरील जीवन व उपाध्यपण याबद्दल प्रार्थनापूर्वक विचार करणे हा यापैकीचा एक मार्ग आहे. आपले परिपूर्ण मानवी जीवन यज्ञार्पणात देऊन तो मानवजातीचा उद्धारक बनला. (मत्तय २०:२८) या तरतुदीची रसिकता वाढविण्याची मदत मिळावी यासाठी आम्ही द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड्‌ पुस्तकातील ११२ ते ११६ प्रकरणांचा विचार करण्याची शिफारस करीत आहोत.

३ या वर्षी स्मारकविधीच्या आधी आपल्याला जे पवित्र शास्त्र वाचन करायचे आहे ते यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९२ च्या कॅलेंडरवर दर्शविण्यात आले आहे. ते वाचन मार्क पुस्तकाच्या निवडक वचनांवर आधारीत आहे. हे खास पवित्र शास्त्र वाचन एप्रिल १२ ते १७ या रविवार ते शुक्रवार दरम्यानच्या सहा दिवसांच्या कालावधीकरता योजिलेले आहे. आपण सर्वांनीच त्या गंभीर घटनांचे वाचन व मनन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे.

४ वडीलांद्वारेची जय्यत तयारी: स्मारक विधीची आमंत्रण पत्रिका उपलब्ध आहे याची खात्री करा. जे उपस्थित राहणार त्या सर्वांसाठी पुरेशा बसण्याच्या व्यवस्था आहेत का? जेथे सभागृह एकापेक्षा अधिक मंडळ्या वापरणार आहेत तेथे प्रत्येक मंडळीने व्यवस्थित योजना आखली पाहिजे की, ज्यामुळे प्रत्येक मंडळीला स्मारकविधी साजरा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. जे सेवक म्हणून काम करणार असतील अशांना त्यांच्या कर्तव्याबद्दल समज दिली पाहिजे. त्यांनी उपस्थित राहणाऱ्‍या नव्या लोकांचे स्वागत करण्यासाठी पुढे होण्याची इच्छा दाखवली पाहिजे. जो माहिती स्पष्ट रुपात व शास्त्रवचनीय दृष्ट्या चांगली सादर करू शकेल अशा लायक वक्त्याची निवड करावी. स्मारकविधीची बोधचिन्हे फिरवण्यासाठी जबाबदार वडील किंवा उपाध्य सेवकांची नियुक्‍ती करा. बेखमीर भाकर व भेसळ नसलेला तांबडा द्राक्षारस यांची तरतुद करावी. अधिक स्मरणिकेसाठी द वॉचटावर फेब्रुवारी १५, १९८५ च्या अंकातील पृष्ठ १९ वरील माहिती पहा.

५ कसून पूर्वतयारी करण्याद्वारे आम्हाला या खास प्रसंगाबद्दलच्या अभूतपूर्वतेबद्दल पूर्ण कदर आहे तसेच येशूच्या आज्ञेप्रमाणेच आपल्याला ख्रिस्ताचा स्मारक विधी साजरा करण्याची इच्छा आहे असे आपण दाखवू शकू.—१ करिं. ११:२३-२६.

१. समारंभाची निश्‍चित वेळ व जागा प्रत्येकाला तसेच वक्त्याला ठाऊक आहे का? वक्त्याकडे प्रवासाचे साधन आहे का?

२. बोधचिन्हे पुरविण्याच्या निश्‍चित योजना आखलेल्या आहेत का?

३. मेजावर आच्छादण्यासाठी स्वच्छ कापड तसेच पुरेसे प्याले व तबके आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे का?

४. स्मारकविधीसाठी सभागृहाची स्वच्छता करण्यासाठी तसेच ते सभागृह नंतर दुसरी मंडळी वापरणार असल्यास त्यासाठी पहिल्या विधीनंतर हलकीशी स्वच्छता करण्याच्या कोणत्या योजना आखलेल्या आहेत?

५. सेवकांची व बोधचिन्हे फिरविणाऱ्‍यांची नियुक्‍ती झाली आहे का? यांच्यासोबत त्यांच्या कर्तव्याबद्दल माहिती सांगण्याकरता स्मारकविधीआधी सभेची योजना करण्यात आली आहे का? केव्हा? उपस्थितातील सर्वांपुढे पुरेश्‍या पद्धतीने बोधचिन्हे फिरविण्यात येतील अशी कोणती पद्धत अनुसरली जाणार?

६. वयस्कर तसेच अपंग बंधूभगिनींना मदत देण्याच्या योजना पूर्ण झाल्या आहेत का? ज्या अभिषिक्‍ताला राज्य सभागृहात उपस्थित राहता येणार नाही तर तो आपल्या घरीच असेल अशासाठी ती बोधचिन्हे सादर करण्यासंबंधाने काही व्यवस्था आखण्यात आली आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा