स्मारक विधीच्या तयारीसाठी
वक्तत्यासहित सर्वांना सणाची उचित वेळ, जागा माहीत आहे का? वक्त्याजवळ वाहतुकीचे साधन आहे का?
बोधचिन्हे मिळविण्यासाठी व योग्य वेळी त्यांना उचित ठिकाणी ठेवण्यासाठी निश्चित योजना केली आहे का?
वेळेआधी मेज तसेच मेजावरील स्वच्छ कापड आणि पुरेसे ग्लास तसेच ताटांची व्यवस्था केली आहे का?
राज्यसभागृह स्वच्छ करण्यासाठी कोणती योजना आधीच बनविली आहे?
सेवक तसेच वाटप करणारे यांना नियुक्त केले आहे का? स्मारक विधीत त्यांची कामगिरी पार पाडण्याआधी त्यांच्यासोबत सभेची योजना केली आहे का? केव्हा? सर्वांना योग्य वाटप करण्यासंबंधीची खात्री करण्यासाठी कोणत्या पद्धतीचे अनुकरण केले जाईल?
वृद्ध तसेच दुर्बळ बांधव आणि बहिणींच्या मदतीसाठी पूर्ण व्यवस्था केली आहे का? कोणी अभिषिक्त जन आजारी असल्यामुळे, मंडळीसोबत उपस्थित राहता येत नसेल तर त्यांना बोधचिन्हाचे वाटप करण्याची व्यवस्था केली आहे का?