आस्था आणखी वाढविण्यासाठी मी काय म्हणू शकतो?
१ सुवार्तेचा प्रचार करण्यामधील आमचा प्रमुख हेतू निव्वळ प्रकाशनांचे वितरण करणे नसून शिष्य बनविणे हा आहे. या कारणास्तव, आस्था आहे हे आढळल्यावर, जे बी पेरण्यात आलेले आहे त्याची वाढ व संगोपन करण्याची आमची जबाबदारी आहे. यात सुदृढ वातावरण निर्माण करण्याचा देखील आमचा प्रयत्न असला पाहिजे की, ज्यामुळे यहोवा त्या विशिष्ठ माणसाला आध्यात्मिक रितीने वाढ करण्यासाठी मदत देऊ शकेल. (१ करिंथ ३:६) तर मग, वर नमूद असलेली आरंभीची सादरता सादर केल्यावर त्याचा मागोवा घेण्यासाठी तुम्ही काय म्हणू शकाल? तुम्हाला ज्या विविध परिस्थितींचा अनुभव येईल त्यात कशी हाताळणी करावी यासाठी पुढे काही प्रस्ताव मांडण्यात आले आहेत.
२ आढळलेल्या आस्थेची वाढ करणेः “आम्ही मागे थोडकेच बोललो होतो, त्यावेळी तुम्ही कामात होता, तरी तुम्ही वेळ काढून तुम्हाला भवितव्याबद्दल जी काळजी वाटत आहे ती बोलून दाखवली होती. तुम्हाला आठवत असेल की आपण तेव्हा पवित्र शास्त्रातून यिर्मया १०:२३ वाचले होते, आणि पाहिले होते की, मानव आनंदी भवितव्य आणण्यासाठी असमर्थ आहे. या शास्त्रवचनाबद्दल हे पुस्तक काय म्हणते ते लक्षात घ्या. (यंग पीपल आस्क पुस्तकातून ३०५ पृष्ठावरील ५व्या परिच्छेदाचे वाचन करा.) हे प्रकाशन युवक तसेच पालकांना उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच विषयांची चर्चा करीत आहे. तुम्हाला याबद्दल अधिक शिकून घ्यावेसे वाटेल असे मला खात्रीने वाटते.”
३ पवित्र शास्त्र अभ्यासाची सुरवात करण्यासाठी यंग पीपल आस्क पुस्तक वापरणेः “तुम्हाला परत भेटून आनंद वाटला. तुम्हाला मागे जे पुस्तक दिले होते, त्यामधून आणखी एका मुद्याविषयी सांगण्यासाठी मी आलो आहे. तो खूपच मनोरंजक आहे. पवित्र शास्त्र सांगते की, देवाची मर्जी व आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण आपल्या पालकांचा सन्मान केला पाहिजे. मग, पालकांचा सन्मान करण्याचा काय अर्थ होतो बरे?” यंग पीपल आस्क पुस्तकातील ११ वे पृष्ठ काढा. “व्हॉट ‘ऑनरिंग’ देम मिन्स” या उपशिर्षकाखालील परिच्छेद वाचा व मग पृष्ठ १७ वरील “क्वश्चन्स फॉर डिस्कशन” या विभागाकडे वळा आणि जो परिच्छेद वाचला होता त्याजशी संबंधित असणाऱ्या प्रश्नाची हाताळणी करा. समारोपाला, पुन्हा येण्याचे व ही चर्चा पुढे चालू ठेवण्याची योजना करा.
४ पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी दुसऱ्या प्रकाशनाचा उपयोग करणेः “आज तुम्ही घरी भेटलात हे आनंदाचे आहे. आपण मागे भेटलो तेव्हा पवित्र शास्त्रात प्रकटीकरण २१:३, ४ मधील अभिवचन वाचले होते. [पुन्हा वाचा.] पण येथे ज्या आनंदी परिस्थितींचे अभिवचन देण्यात आलेले आहे त्या सहजासहजी आपल्याला मिळणार नाहीत. यासाठी दोन गोष्टींची जरुरी आहे हे प्रकटीकरण १:३ मध्ये दिसते. (वाचा) यास्तव, पवित्र शास्त्र जे काही सांगत आहे त्याचे आम्ही वाचन करावे व ते पाळावे म्हणजे आचरणात आणावे. “पाहा मी सर्व नवे करतो!” हे माहितीपत्रक, मी आधी जे प्रकाशन तुम्हाला दिले होते त्याचे वाचन करण्यात अधिक मनोरंजकता देईल. यात देवाच्या गरजा अधिक साध्या रुपात स्पष्ट केल्या आहेत. पृष्ठ ३० वर १२ प्रश्नांची यादी आहे, जे बरेच लोक विचारत असतात. यापैकी कोणत्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर हवे आहे?” घरमालकाने प्रतिसाद दिल्यावर मग, त्या प्रश्नाचे उत्तर माहितीपत्रकात जेथे देण्यात आले आहे तेथे वळू शकता व पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करू शकता.
५ आरंभीच्या भेटीत आपण जो पाया घातला त्यावर पुनर्भेटीत आम्ही उभारणी केली पाहिजे. आमच्या सेवकपणाच्या या प्रकारात आपण काळजीपूर्वक लक्ष घातल्यास आम्हासाठी व आमचे ऐकणाऱ्यांना यहोवाकडील समृद्ध आशीर्वाद मिळतील.—१ तीम. ४:१६.