निकडीची जाणीव ठेवून सुवार्ता सादर करणे
१ ख्रिस्ती सेवेत पूर्ण अंतःकरणाने सहभाग घेण्याद्वारे आपण देवाच्या राज्य अभिवचनांबद्दलची आपली खोल कृतज्ञता व्यक्त करतो. निकडीची जाणीव ठेवून आपण या कार्यात भाग घेतला पाहिजे. का बरे? कारण कामकरी थोडे आहेत, या दुष्ट व्यवस्थीकरणाचा शेवट जवळ येत आहे व आपल्या क्षेत्रांतील लोकांचे जीव धोक्यात आहेत. (यहे. ३:१९; मत्त. ९:३७, ३८) या भारी जबाबदारीसाठी सेवेत आपल्या उत्तम परिश्रमाची आवश्यकता आहे. आपल्या क्षेत्र सेवा कार्याबाबत आपण निकडीची जाणीव कशी दाखवू शकतो? उत्तम प्रस्तुतींची पूर्वतयारी करण्याद्वारे, लोक आढळतील अशा प्रत्येक ठिकाणी परिश्रमपूर्वकतेने त्यांना शोधण्याद्वारे, आस्था दाखवणाऱ्यांची अचूक माहिती ठेवून ती आस्था प्रज्वलित ठेवण्यासाठी लागलीच त्यांच्याकडे पुन्हा जाण्याद्वारे व आपल्या कार्यात पुष्कळांचे जीव गोवल्यामुळे ते गंभीरतेने घेण्याद्वारे आपण निकडीची जाणीव दाखवू शकतो. फेब्रुवारी महिन्यात निकडीच्या जाणीवेने सुवार्ता सादर करण्यासाठी तयारी करताना पुढील सूचना उपयोगी ठरू शकतात. त्या महिन्यात, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल किंवा तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे ही पुस्तके प्रत्येकी किंवा दोन्ही एकत्र सादर केली जाऊ शकतात.
२ समाजात सामना कराव्या लागणाऱ्या समस्यांचा थोडक्यात उल्लेख करून तुम्ही अशा प्रकारे संभाषणाची सुरवात करू शकता:
◼ “पुष्कळांना देव असल्याचा विश्वास आहे पण, ‘आपल्याकरता तो कोणते भवितव्य राखून आहे?’ हा प्रश्न त्यांना पडतो. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर कसे द्याल? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मानवजातीसाठी देवाची इच्छा व ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो जी पावले उचलत आहे त्याबद्दल बायबल काय म्हणते ते तुम्हाला माहीत आहे का?” प्रकटीकरण २१:४ वाचा आणि अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या पृष्ठ ११ वरील चित्र दाखवून त्याच्याशी माहितीचा संबंध जोडा. पृष्ठे १२-१३ वरील चित्रे दाखवून भवितव्यासाठी त्यांचा काय अर्थ होतो ते सांगा. परिच्छेद १२ मधील यशया ११:६-९ वचन वाचा. पुस्तक सादर करा. संभाषण पुढे चालू ठेवण्यासाठी सोईस्कर वेळी पुन्हा येण्याची व्यवस्था करा.
३ प्रकटीकरण २१:४ वर तुम्ही केलेली मागील चर्चा खालील संक्षिप्त प्रस्तुतीने पुन्हा चालू करू शकता:
◼ “मागे मी भेट दिली तेव्हा मानवजातीसाठी नवीन पार्थिव समाज बनवण्याच्या देवाच्या अभिवचनाविषयी आपण बोललो होतो. [पुन्हा एकदा अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या पृष्ठ १२-१३ वरील चित्रांकडे लक्ष आकर्षित करा.] तुमच्या कुटुंबाला आनंदमय परिस्थितीत आनंद लुटताना पाहायला तुम्हाला आवडेल का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] पण प्रश्न येतो, की देवाची अभिवचने कितपत विश्वसनीय आहेत? तो स्वतःबद्दल काय म्हणतो त्याची कृपया नोंद घ्या.” तीत १:२ आणि पृष्ठ ५६ वरील २८ वा परिच्छेद वाचा. त्या परिच्छेदासाठी असलेला (अ) प्रश्न विचारून उत्तराकडे तसेच परिच्छेदाच्या शेवटल्या वाक्याकडे लक्ष आकर्षित करा. मोफत गृह बायबल अभ्यासाच्या सादरतेविषयी सांगा. नंतर त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याची व्यवस्था करा.
४ कुटुंबाच्या वाढत्या समस्यांमुळे अनेक जण चिंतित असल्यामुळे पहिल्या भेटीत तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “जवळजवळ सर्वांनाच आधुनिक कुटुंबाला सामना कराव्या लागणाऱ्या समस्यांची काळजी वाटत आहे. [काही समस्या सांगा, जसे की शाळेत व कॉलेजमध्ये अंमली पदार्थांची समस्या, पत्नींना काम करावे लागते तेव्हा घर आणि मुलांची काळजी घेण्याची समस्या.] अनेक दशकांपासून मानवी सल्लागारांनी या विषयांवर सल्ले दिले आहेत व लोकांनी त्यांच्या सल्ल्याचे अनुकरण देखील केले आहे. तरीसुद्धा परिस्थिती अधिकच बिकट का होत चालली आहे? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल सल्ला देते ज्याला काही जण जुनापुराणा सल्ला म्हणतात पण तो वेळोवेळी व्यावहारिक ठरला आहे.” उदाहरण म्हणून कौटुंबिक जीवन पुस्तकाच्या पृष्ठ ३९ वरील नीतीसूत्रे १०:१९ वाचा. त्याच पानावरील आणि आधीच्या पानावरील शास्त्रवचने दाखवा आणि ते पुस्तक बायबलमधील असीम ज्ञानाचा व्यावहारिक प्रयोग कसा करते ते समजावून सांगा. पुन्हा येण्याची व्यवस्था करा आणि पुढे कौटुंबिक जीवन कसे सुधारता येते त्याची चर्चा करा.
५ एखाद्याच्या कौटुंबिक जीवनात आनंद कसा वाढवता येईल याचे स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्ही पुन्हा येणार असल्याचे सांगितल्यास, अशाप्रकारे सुरवात करू शकता:
◼ “कौटुंबिक जीवन कसे सुधारता येऊ शकते याची आपली चर्चा पुढे चालू ठेवता यावी म्हणून मी पुन्हा येण्याचा खास प्रयत्न केलाय. माझ्या मागील भेटीत आपण, याविषयावर बायबल उत्तम सल्ला देते त्याबद्दल पाहिले.” कौटुंबिक जीवन पुस्तकातील ‘अनुक्रमणिका’ असलेले पान उघडा आणि घरमालकाला जास्त आवडणारा विषय निवडू द्या. पानाच्या तळाशी असलेल्या प्रश्नांचा उपयोग करून या पुस्तकाचा अभ्यास करण्याद्वारे त्यातील माहितीचा तो पुरेपूर फायदा कसा मिळवू शकतो ते दाखवा. त्याच्यासोबत तुम्ही अभ्यास करू इच्छिता ते सांगा व लागलीच अभ्यास चालू करण्याचा प्रयत्न करा.
६ पर्यावरणाबद्दल अनेक लोकांना आवड असल्यामुळे संभाषण चालू करण्यासाठी तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “आम्हाला असे दिसून आले आहे, की जवळजवळ सर्वांनाच हवा, पाणी आणि अन्नाच्या प्रदूषणाची चिंता लागली आहे. काही देशांमध्ये तर पर्यावरणाची अवस्था जीवाला धोकादायक बनली आहे. देव पृथ्वीचा सृष्टीकर्ता असल्यामुळे, याबद्दल तो काय करील असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल म्हणते, की आपण या ग्रहाचा जसा उपयोग करू त्याप्रमाणे देव आपल्याकडून झाडा घेणार आहे. [प्रकटीकरण ११:१८ब वाचा.] सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त असलेल्या पृथ्वीवर जीवन जगण्याची कल्पना करा!” प्रकटीकरण २१:३, ४ मध्ये सूचित केल्याप्रमाणे परादीसविषयी देवाचे अभिवचन दाखवा. अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या पृष्ठ १५३ वरील शेवटले चित्र दाखवा आणि त्यातील व पृष्ठ १५६ ते १५८ पानांवरील चित्रांमधील विषमता दाखवा. पुस्तक सादर करून पुन्हा येण्याची व्यवस्था करा.
७ परादीस पृथ्वीबद्दल आस्था दाखवणाऱ्याकडे पुन्हा गेल्यावर तुम्ही म्हणू शकता:
◼ “माझ्या मागच्या भेटीत, प्रदूषित पृथ्वीची समस्या सोडवण्याकरता देवाला मानवी कारभारामध्ये हस्तक्षेप करावा लागेल या गोष्टीवर आपले सहमत झाले होते. पण प्रश्न असा येतो, की देव निर्माण करत असणाऱ्या नवीन धार्मिक जगात बचावून जाण्याकरता आपण काय केले पाहिजे?” योहान १७:३ वाचा. हे खास ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या मोफत गृह बायबल अभ्यास कोर्सचा फायदा घेण्यासाठी घरमालकास आमंत्रण द्या.
८ आधुनिक दिवसात कापणीचे कामकरी म्हणून व जीवनरक्षक प्रचार कार्यासाठी आपला उपयोग केला जात आहे हा किती मोठा सुहक्क आहे! ‘आपले श्रम व्यर्थ नाहीत,’ हे ध्यानात ठेवून आपण सर्व जण निकडीच्या जाणीवेने सुवार्तेचा प्रचार करण्यात व्यग्र राहू या.—१ करिंथ. १५:५८.