आध्यात्मिक ध्येयांचा मागोवा घेण्यासाठी उत्तेजन द्या
१ राज्याची ही सुवार्ता हिचा प्रचार करण्यात यापूर्वी कधीही एवढ्या युवकांनी भाग घेतला नव्हता! उपदेशक १२:१ मधील सूचना आज हजारो युवक आपणाला लावून घेत आहेतः “आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” सेवकपणात या युवकांना नियमित सहभाग घेण्यास कशामुळे उत्तेजन मिळते, आणि एवढ सर्वजण पायनियरींग कार्यात का समाविष्ट होत आहेत?
२ तीमथ्य या उल्लेखनीय युवकाचे उदाहरण अनेक जण आचरीत आहेत यात काही शंका नाही. त्याची आई व आजी यांनी त्याला बालवयापासून आध्यात्मिक शिक्षणाचा लाभ दिला व त्याला आध्यात्मिक ध्येयांचा मागोवा घेण्यासाठी उत्तेजन दिले. (२ तीमथ्य ३:१४, १५) अशाप्रकारे सेवेच्या वाढत्या हक्कांची संधि जेव्हा उपलब्ध झाली तेव्हा तो त्याला पात्र व तयार होता.—प्रे. कृत्ये १६:१-३.
३ आध्यात्मिक ध्येयांचा मागोवा घेण्यासाठी अधिक तरुणांना कसे उत्तेजन दिले जाऊ शकते? यासाठी कोणता पाया घालण्यास हवा? पालक आपल्या मुलांठायी सत्याबद्दल आवड कशी उभारु शकतात व अशांना दीर्घ पल्ल्यांची ध्येये ठेवण्यासाठी कशी मदत देऊ शकतात?
४ शास्त्रवचनीय पाया घालणे: आपल्या मुलांना आपण जे शिकवीत आहोत ते यहोवाकडून आहे याची पालकांनी खात्री करून घेतली पाहिजे; ज्यामुळे ते त्यांच्या मुलांना “तारणासाठी ज्ञानी” करावयास समर्थ करील. (२ तीम ३:१५) देवाचे वचन पवित्र शास्त्राबद्दल गाढ प्रीती निर्माण करण्याचे परिश्रम घ्या. यासाठी नियमित रुपाचा आणि त्यांच्या गरजांशी सुयुक्तिक असणारा अर्थभरीत पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याची आणि नियमित रुपाने सभांना उपस्थित राहण्याची गरज आहे. युवकांना आध्यात्मिक ध्येयांचा मागोवा घेण्याची चालना मिळायची आहे तर त्यांच्याठायी बळकट विश्वास आला पाहिजे व याकरता त्यांचाही स्वतःचा अभ्यासाचा कार्यक्रम असला पाहिजे व त्यांनीही यहोवासोबत आपले व्यक्तिगत नाते स्थापिले पाहिजे.—१ थेस्स. ५:२१; इब्री ११:१.
५ पालकांनी व मंडळीतील इतर प्रौढजनांनी स्वतःचे चांगले उदाहरण ख्रिस्ती युवकांपुढे मांडल्यास, तसेच “यहोवाविषयीचा . . . आनंद” प्रवर्तित केल्यास त्यांना अधिक तत्परतेने आध्यात्मिक आस्थेचा मागोवा घेता येईल. (नेहम्या ८:१०) आनंद प्रदर्शित केल्यामुळे, खऱ्या ख्रिस्तीयत्वाच्या गरजा डोईजड नाहीत हे आम्हा सर्वांना युवकांना दाखवून देता येईल.—१ योहान ५:३.
६ पायनियर्स, मिशनरी व फिरत्या देखरेख्यांनी युवकांसोबत क्षेत्र सेवा केल्यामुळे तसेच त्यांना प्रोत्साहनदायक मार्गदर्शन दिल्यामुळे पुष्कळांवर फार मोठा प्रभाव पाडला गेला. उदाहरणशील अशा पूर्ण वेळेच्या कार्यकर्त्यांना पालक आपल्या घरी जेवणासाठी किंवा इतर वेळी ख्रिस्ती सहवासाचा आनंद घेण्यासाठी बोलावू शकतात. येशू ख्रिस्तानेही युवकांना समतोल लक्ष देण्यामध्ये आपले सर्वोत्तम उदाहरण प्रदर्शित केले.—मार्क १०:१३-१६.
७ ध्येये ठेवणे: पालकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली मुलांना जीवनात आरंभापासूनच आध्यात्मिक ध्येये स्वतःसाठी ठेवता येतील. पायनियर सेवा, जेथे गरज आहे तेथे जाऊन सेवा करणे, बेथेल किंवा मिशनरी सेवा इत्यादि स्वरुपातील ध्येयांपैकी योग्य वाटणारी ध्येये युवकांनी ठरविल्यावर पालक व इतर प्रौढ जन त्यांना या ध्येयांची प्राप्ती करण्याकडे उत्तेजन देतील आणि त्यासाठी व्यावहारिक प्रस्ताव देखील देतील.
८ प्रत्येक मंडळी ही एका कुटुंबासमान आहे. याकरता आम्हापैकी प्रत्येकाने आम्हातील तरुणांना सत्यामध्ये चालण्याची मदत करण्याची व आध्यात्मिक प्रगति करीत राहण्याचे उत्तेजन देण्याची आस्था दर्शविली पाहिजे. हे आपल्याला त्यांच्यावरील प्रीती दाखवून आणि आध्यात्मिक ध्येयांची जोपासना करण्याचे उत्तेजन पुरवून करता येईल.