तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास सादर करता का?
१ पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची संधि थेटपणे प्रस्तुत करून पुष्कळांना तो सुरु करण्यात सुंदर यश मिळाले आहे. एका माणसाने पुष्कळ वेळा आपली प्रकाशने स्वीकारण्यात नकार दर्शविला होता, पण पवित्र शास्त्र अभ्यास त्याला प्रस्तुत करण्यात आला तेव्हा तो त्याने लागलेच स्वीकारला. त्याने म्हटलेः “मला पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची नेहमीच इच्छा होती.” त्याच्या घरी पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाला व सबंध कुटुंबाने जोरदार प्रगती केली.
२ सर्वांनी पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याची जाणीव राखली पाहिजे. कोणाला ख्रिस्ताचा शिष्य या नात्याने प्रगति करावयाची आहे तर त्याला शिकून घेतलेच पाहिजे. (मत्तय २८:१९, २०) शिकण्यासाठी त्यांनी त्यांच्यासोबत पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची गरज आहे. हे अभ्यास घरमालकाला पवित्र शास्त्र आणि देवाची अभिवचने याबद्दल कसे अधिक शिकून घेता येऊ शकेल त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याद्वारे सुरु करता येतात. एका बंधूला शांतीदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेद्वारे पाच अभ्यास सुरु करता आले. त्याला हे पवित्र शास्त्र अभ्यास नियमित रुपाने घेता न आल्यामुळे ते त्याने इतर प्रचारकांना वाटून दिले.
३ आपल्याला अभ्यास सुरु करण्यास सोपे वाटत असेल, तर आपण इतर प्रचारकांना आपणासोबत नेऊन त्यांनाही अभ्यास सुरु करण्यामध्ये मदत देऊ शकतो. किंवा आपण जे अभ्यास सुरु केले त्यापैकी काही मंडळीतील इतरांना सोपून देऊ शकतो. तुम्हाला पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याची इच्छा आहे तर आपल्या घरोघरच्या कार्यात तुम्ही ज्यांना भेटता अशांना तो का सादर करू नये? एकदा एका प्रचारकाने एका नवयुवतीची परत भेट घेतली, जिने तितकी आस्था दाखवली नाही. तरीपण प्रचारकाने तिला पवित्र शास्त्र अभ्यास प्रस्तुत केला आणि तिने तो स्वीकारला. तिने आता बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि तिची बहिण व मेहुणा हे देखील आता सभांना हजर राहात आहेत.—गल. ६:६.
४ आपण ज्या प्रत्येकासोबत अभ्यास सुरु करतो तो पुढे चालू राहीलच असे नाही. अभ्यास घेणारे सर्वच सत्यात येतील असे नाही. पण काही येतील. जितके अधिक अभ्यास आपण सुरु करू तितक्या अधिकपणे आपल्याला इतरांना यहोवाचे उपासक बनण्याची मदत देण्याची संधि राहील.