वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९३ पृ. १
  • गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालू करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालू करणे
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास सादर करता का?
    आमची राज्य सेवा—१९९२
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
  • पाहिजेत—आणखीन बायबल अभ्यास
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ९/९३ पृ. १

गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालू करणे

१ खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी सर्वात फलदायी आणि समाधानी अनुभवांमधील एक, गृह पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे एखाद्याला सत्य शिकवणे हा आहे. तरीही, काहींना सेवेच्या ह्‍या संपन्‍न करणाऱ्‍या भागाचा आनंद वाटत नसेल, कारण त्यांना असे वाटते की ते एखादा पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्यास व घेण्यास असमर्थ आहेत. अनेक उल्लेखनीय प्रचारक आणि पायनियरांना एकदा असेच वाटत होते. तथापि, यहोवावर पूर्णपणे विश्‍वास ठेवल्याने आणि आमची राज्य सेवा यातील सूचनांना लागू केल्याने, ते पवित्र शास्त्र अभ्यासाची सुरवात व तो चालू कसा ठेवावा हे शिकले आणि त्यांनी सेवेतील त्यांचा आनंद वाढविला. तुम्हीही हेच ध्येय ठेवू शकता.

२ थेट पद्धतीचा आणि पत्रिकांचा उपयोग करावा: एखादा पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्याचा सोपा मार्ग आहे, थेट पद्धत. काही लोकांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना केवळ उबदार निमंत्रणाची गरज लागते. हे घरमालकाला नुसते असे विचारून करता येऊ शकते: “तुम्हाला एखादा वैयक्‍तिक गृह पवित्र शास्त्र अभ्यास घेऊन पवित्र शास्त्राचे व पृथ्वीसाठी देवाच्या उद्देशाबद्दलचे तुमचे ज्ञान वाढविण्यास आवडेल का?” किंवा एक पवित्र शास्त्र अभ्यास कशा रीतीने घेतला जातो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यास तुम्हाला आवडेल असे तुम्ही घरमालकाला सांगू शकता. अनेक जण ही सादरता नाकारतील तरीही, कोणीतरी त्याचा स्वीकार करील, असे लोक मिळाल्यावर तुम्हाला होणाऱ्‍या आनंदाची जरा कल्पना करा!

३ पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्याचा आणखी एक मार्ग आहे, पत्रिकांचा उपयोग करणे. आकाराने लहान असल्या तरी, त्या शक्‍तीशाली आणि खात्रीशीर संदेश सादर करतात. पत्रिकेतून एखादा पवित्र शास्त्र अभ्यास कसा चालू करता येऊ शकतो? त्याला आस्थेवाईक वाटेल असा तुमचा विश्‍वास असेल अशी एक पत्रिका देऊन चालू करू शकता. मग, पुढाकार घ्या, आणि तुमच्यासोबत पहिला परिच्छेद वाचण्यासाठी घरमालकाला निमंत्रण द्या. नमूद केलेली वचने पाहा, आणि त्यामधील माहितीला कशी लागू होतात याची चर्चा करा. पहिल्या भेटीत, तुम्ही एक किंवा दोनच परिच्छेदांची चर्चा करू शकता. पवित्र शास्त्रातून तो मनोरंजक गोष्टी शिकत आहे याची गुणग्राहकता घरमालक जसा बाळगेल, तसे तुम्ही तुमच्या चर्चेसाठी जो वेळ खर्च करत आहात तो वाढवू शकता.

४ केवळ पवित्र शास्त्राचा उपयोग करणे: काही वेळा एखादा व्यक्‍ती पवित्र शास्त्राची चर्चा करण्यास तयार असेल परंतु एक औपचारिक अभ्यास करण्यास किंवा आमच्या प्रकाशनांचा उपयोग करण्यासाठी मागे पुढे पाहत असेल. तरीही तुम्ही अनंतकाल जगू शकाल पुस्तकातून किंवा रिझनिंग पुस्तकातून मनोरंजक शास्त्रवचनीय चर्चेची तयारी करून पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करू व घेऊ शकता परंतु आस्थेवाईक व्यक्‍तीला भेट देताना केवळ पवित्र शास्त्राचाच उपयोग करावा. परिस्थितीनुरुप अशी चर्चा १५ किंवा २० मिनिटांसाठी, किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळ चालू शकते. नियमितरीत्या व पवित्र शास्त्र सत्य शिकवण्यासाठी प्रगतीशील पद्धतीने घेतल्याने, तुम्ही एक शास्त्र अभ्यास चालू केला, आणि अभ्यास म्हणून अहवाल दिला जाऊ शकतो. उचित वेळी, अनंतकाळ जगू शकाल हे पुस्तक सादर करा, आणि त्यामधून एक औपचारीक अभ्यास चालवा.

५ क्षेत्र सेवेमध्ये संधी शोधणे यासोबत, शेजाऱ्‍यांबरोबर, सहकार्यांबरोबर, किंवा कौटुंबिक सदस्यांबरोबर, पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ते प्रयत्न काही दिवसांपूर्वी केले होते का? तुम्ही पुन्हा अलिकडेच प्रयत्न केला का? जर एक पद्धत चालली नाही, तर दुसरी पद्धत वापरलीत का?

६ दिलेल्या सूचना जर तुम्ही पाळल्या, क्षेत्र सेवेमध्ये टिकून राहिलात, आणि त्याच्या आशीर्वादांसाठी यहोवावर विश्‍वास ठेवलात तर पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. सत्याच्या शक्‍तीला आणि यहोवा जी मदत देतो तिला कधीही कमी लेखू नका. गृह पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याद्वारे व चालविण्याद्वारे सेवेतील तुमचा आनंद वाढो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा