पुनर्भेटी घेण्याचे आव्हान
१ सुवार्तेचे सेवक या नात्याने आपल्याला शिष्य बनवण्याची आज्ञा आहे. (मत्तय २८:१९, २०) यात पुनर्भेटी घेण्याचाही समावेश आहे. आमच्या ख्रिस्ती सेवकपणाच्या या महत्त्वपूर्ण प्रकाराबद्दल तुमचा विधायक दृष्टिकोण आहे का? पुनर्भेट घेण्यात कुशल बनणे हे मोठे आव्हानात्मक असू शकेल.—नीती. २२:२९.
२ प्रत्येक समर्पित ख्रिश्चनाला शिष्य बनविण्याच्या कामात सहभागी होण्याची जबाबदारी कळली पाहिजे. राज्य आशेची सहभागी इतरांसोबत करता यावी याकरता आम्ही आपल्या व्यक्तिगत आरामाच्या काही गोष्टींना बाजूला सारले पाहिजे. प्रामाणिक लोकांना त्यांच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यात मदत देण्याची संधि आपल्याला पुनर्भेटीमुळे मिळते.
३ सर्व आस्थांचा मागोवा घ्याः जेथे कोठे राज्याची आस्था दाखवली जाते त्या सर्व ठिकाणी, मग तेथे आमची प्रकाशने घेतली गेली नसली तरी त्या सर्वांना पुनर्भेटी दिल्या गेल्या पाहिजेत. पुष्कळ लोक असे असतात की, जे आपल्यासोबत पवित्र शास्त्र विषयावर चर्चा करण्याची स्वेच्छा दाखवून आस्था दाखवीत असतात. लोकांना सूक्ष्म अशा शास्त्रवचनीय चर्चेत सहभागी करून त्यांच्यामध्ये राज्याची आस्था कशी वाढवता येते हे येशू व प्रेषितांनी दाखवले आहे.—मार्क १०:२१; प्रे. कृत्ये २:३७-४१.
४ पुनर्भेट घेण्यामागील आमचे ध्येय हे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचे असावे. हा पवित्र शास्त्र अभ्यास कसा चालविला जातो त्याचे प्रात्यक्षिक आपल्याला घरमालकाला दाखवता येईल. ज्याला शिकवता येईल अशी कोणीतरी प्रामाणिक अंतःकरणाची व्यक्ति मिळावी याबद्दल यहोवास केलेल्या प्रार्थनेचे तो उत्तर देईल याबद्दल तुम्हाला खात्री राखता येईल. त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्या सेवेत जे कळकळीचे प्रयत्न घेत आहात त्याबद्दल तो तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करील. यास्तव, यहोवाकडे मदतीची याचना करून एखादा पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचे ध्येय स्वतःसमोर का ठेवू नये?
५ हस्तपत्रिकांचा चांगला उपयोग कराः पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करण्यामध्ये हस्तपत्रिकांचा प्रभावी उपयोग करता येईल. मुखपृष्ठावरील चित्राची केवळ साधी चर्चा करण्यामुळे पुष्कळांना संभाषण सुरु करण्यात येश मिळू शकले. घरमालकासोबत एका वेळी एकच परिच्छेद वाचा. जेथे प्रश्न विचारला जातो तेथे थांबून घरमालकाला त्याचे अभिप्राय व्यक्त करण्याचे निमंत्रण द्या. शास्त्रवचने काढून वाचा व ती कशी लागू होतात ते दाखवा. यानंतर संभाषण अशा प्रकाशनाकडे वळवू शकता, ज्यामधून अभ्यास चालविला जाऊ शकतो.
६ रिझनिंग पुस्तकाचा उपयोग कराः रिझनिंग पुस्तकाचा उपयोग करून प्रभावी पुनर्भेटी घेता येतात. त्यात देण्यात आलेल्या प्रमुख विषयांची किंवा अनुक्रमणिकेची उजळणी करण्यामुळे तुम्हाला मागे घडलेल्या संभाषणाचा पुढे मागोवा घेण्यासाठी उपयुक्त माहिती निवडून घेता येईल. जेथे कोठे आक्षेप सामोरे येतील तेथे “स्क्रिपचर्स ऑफन् मिसअप्लाईड” हे सदर उपयुक्त ठरू शकते. पायनियर्स कळवतात की, रिझनिंग पुस्तकातील २०४ पृष्ठावर “यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्रावरील आपले स्पष्टीकरण कोणत्या आधारावर घेतात?” या शिर्षकाखाली असणाऱ्या माहितीचा वापर करून पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी पुष्कळ यशप्राप्ती मिळवता आली. आम्ही पवित्र शास्त्रालाच त्याचे स्वतःचे स्पष्टीकरण कसे करू देतो हे ते आस्थेवाईक व्यक्तींना दाखवतात. यामुळे खूप चांगले काम होते व कित्येक पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाले.
७ आपण येशू व त्याच्या प्रेषितांप्रमाणेच यहोवाच्या मेंढरांबद्दल प्रामाणिक आस्था दाखवली पाहिजे. (लूक ९:११) लोकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळेच आपण राज्य सत्याला सोबत घेऊन त्यांच्याकडे जाऊ. (२ करिंथ. २:१७) आपण इतरांच्या आध्यात्मिक कल्याणास्तव स्वतःला देण्यावर अधिक जोर देऊ तेव्हा पुनर्भेटी घेण्याचे आव्हान आम्हाला नक्कीच पेलता येईल.