घरोघरी प्रभावीपणे कार्य करणे
१ आज सबंध पृथ्वीभरात “सुवार्ते”ची घोषणा होत आहे. (मत्तय २४:१४) हे मुख्यत्वेकरून घरोघरच्या उपाध्यपणाद्वारे साध्य होत आहे.—प्रे. कृत्ये २०:२०, २१.
२ आम्ही भेटत असलेल्या लोकांना सादर करीत असलेली सादरता अर्थपूर्ण वाटली पाहिजे. पुरुष, स्त्रिया व मुले यांच्या आवडीनिवडीची क्षेत्रे भिन्न आहेत. यासाठीच, आमच्या क्षेत्रावरील लोकांना अपीलकारक ठरणाऱ्या विविध शास्त्रवचनीय विषयांची तयारी करणे चांगले ठरेल.
३ प्रकाशनांचा चांगला उपयोग कराः लिव्ह फॉरएव्हर पुस्तकात विविध विषय आहेत व ते सर्वत्र लोकांना अपीलकारक ठरले पाहिजेत. शाब्दिक तसेच चित्रमय उदाहरणे हे खरोखरीच प्रभावी माध्यम आहे. हे पुस्तक अंतःकरणास अपील करते व ते लोकांना निर्णय घेण्यात, होय, आपला विश्वास, वागणूक, प्रवृत्ती तसेच जीवनाचा मार्ग बदलण्याची गरज दाखवण्यात मदत करते. या लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील अनुक्रमणिकेशी चांगले परिचित राहण्यामुळे आपल्याला लोकांशी विविध विषयावर अगदी प्रभावीरित्या संभाषण करता येईल. यामुळे घरमालकाची आस्था केवढी आहे ते समजण्यास आपल्याला मदत मिळते.
४ आपल्या सेवकपणात प्रभावी होण्यासाठी आपण अधिक व्यक्तिगत आस्था दाखवण्याची गरज आहे. (फिलिप्पै. २:४) लोक व त्यांच्या गरजा यांना समाविष्ट करणाऱ्या राज्य विषयावर संभाषण केंद्रित ठेवा. लोकांचे विचार काय आहेत ते जाणून घेण्यासाठी प्रसंगोचित प्रश्न विचारा. त्यांच्या उत्तरांकडे लक्ष द्या. त्यांच्या संभाषणावरुनच तुम्हाला कळू शकेल की, त्यांची आस्था कशामध्ये आहे. लोकांनी राज्य संदेशाचे मूल्य जाणावे व त्याबद्दल त्यांनी अधिक कसे शिकून घ्यावे हे दाखविण्याची आमची इच्छा राहिली पाहिजे. एका जोडप्याने पवित्र शास्त्राचा अभ्यास स्वीकारण्यामागील कारण स्पष्ट करताना म्हटले की, ज्या बंधूने त्यांची भेट घेतली होती त्याने त्यांच्याबाबत प्रामाणिक अशी व्यक्तिगत आस्था दाखवली होती.
५ वारंवार उरकलेल्या क्षेत्रावरः जेथे क्षेत्राचा उरक पुष्कळ वेळा होतो अशा ठिकाणी प्रभावीपणा वाढवणे हे खासपणे जरुरीचे आहे. अधिक प्रभावी सेवा आमचे क्षेत्र अधिक विस्तारीत करण्यात आम्हाला मदत देते. (वॉ.८८ ७/१५ पृ. १५-२०) आपण त्या घरी पूर्वी भेट घेतलेलीच नाही असा नाटकी आभास दाखवण्यापेक्षा आपण मागे घरमालकाने दाखवलेल्या वृत्तीबद्दल माहिती देऊन तिचा आपल्या लाभास्तव उपयोग करू शकतो. आपण मागील भेटीचा संदर्भ देऊन तेव्हा जे काही म्हणण्यात आले त्यावर संभाषणाची उभारणी करू शकतो. आमच्या क्षेत्रातील गरजांना अनुलक्षून आपण आमची राज्य सेवा याच्या मागील अंकात सुचविण्यात आलेल्या तसेच रिझनिंग पुस्तकात सुचवलेल्या सादरतांचा उपयोग करू शकतो.
६ राज्य आशीर्वादांपासून अधिक लोकांना लाभ मिळावा यासाठी यहोवा अगदी सहनशीलपणे ते दार उघडे ठेवून आहे. येशूने लोकांवर आपली प्रीती दाखवल्यामुळे त्याचे सेवकपण प्रभावी ठरले. (मार्क ६:३४) आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण होता होईल तितक्या परिमाणात करतो का? (१ पेत्र २:२१) यासाठी, आपण घरोघरच्या कार्यात अधिक पूर्णतेने तसेच प्रभावीपणे सहभागी होण्यात मागे पडू नये.—२ तीम. ४:५.