वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९२ पृ. ३
  • पुढील प्रगतिसाठी निश्‍चयी हालचाल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुढील प्रगतिसाठी निश्‍चयी हालचाल
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज ओळखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • आध्यात्मिक प्रगती करीत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपाध्यपणात प्रगति करणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • चांगल्याची आस्था बाळगा!
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km ९/९२ पृ. ३

पुढील प्रगतिसाठी निश्‍चयी हालचाल

१ आतापर्यंत आपले १९९२ चे वार्षिक अहवाल पुस्तक वाचून संपले असेल. १९९१ मधील प्रचारकांचा २११ देशातील चाळीस लाख पंचवीस हजारापेक्षा जादा कळस—६.५ टक्के वाढ—याचे वाचन करून आमच्या अंतःकरणाला केवढे आनंदाचे वाटले असेल! खरेच, जगभर जी राज्याची वाढ होत आहे, ती यशया २:२-४ व मीखा ४:१-४ या भविष्यवादांची थरारक पूर्णता दाखवीत आहे.

२ अद्यापपावेतो १९९२च्या सेवा वर्षाचा अहवाल संपला नसला तरी एकदंर पुरावा, याही सेवावर्षात यहोवा अप्रतिम वाढ देत असल्याचे सूचित करीत आहे. आमच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वास येऊन मिळण्याचे आमंत्रण अजूनही दिले जात आहे. स्मारकविधी तसेच प्रांतिय अधिवेशनातील उपस्थिती, लाखो लोक राज्य संदेशाकडे ऐकण्याजोगा कान देत असल्याचे दाखवते. सर्व राष्ट्रातून हे लोक या प्रेरित निमंत्रणाला प्रतिसाद देत आहेतः “चला, आपण परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.”

३ प्रगति करण्याचा निश्‍चय ठेवाः यहोवाची संस्था पुढे जात आहे. यहोवाच्या खऱ्‍या भक्‍तिच्या डोंगराकडे आता पुष्कळ नवीन जन झुंडींनी येत असता, प्रत्येकाने पुढील आध्यात्मिक प्रगतिसाठी निश्‍चयी पावले उचलावीत आणि नव्या लोकांनीही तेच साध्य करावे म्हणून त्यांना मदत करण्याची गरज आहे. प्रगतिची ही गरज, यहोवाच्या पर्वतावर येण्याचे आमंत्रण स्वीकारणारे सुद्धा इतरांना “चला,” असे म्हणतात, त्यामध्ये स्पष्ट दिसून येते. अशीच गोष्ट, प्रेषित योहानाने प्रकटीकरण २२:१७ मध्ये कळविली आहे. तो म्हणतोः “आत्मा व वधू ही म्हणतात, ‘ये,’ ऐकणाराही म्हणो, ‘ये.’”

४ हे निमंत्रण कसे द्यावे ते येशूने दाखवले. लोकांनी त्याच्या शिक्षणाला प्रतिसाद दिला तेव्हा त्याने त्यांना सेवकार्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले व ते कसे करावे हे त्यांना दाखवले. (मत्तय ४:१९; १०:५-७, ११, १४) त्याच्या शिष्यांनी त्याच्यासोबत जाऊन शिकविण्याची प्रभावी पद्धत शिकून घेतली शिवाय तो करीत असलेल्या गोष्टी न्याहाळल्या. मग, त्यांनी आपली सेवा त्याच्या पद्धतीनुसार जुळवून घेतली. त्यांनी त्याची पद्धत इतक्या चांगल्या पद्धतीने शिकून घेतली की, त्यांच्या धैर्यवान साक्षीने विरोधकांचेही लक्ष आकर्षित केले गेले व त्यांनी ते येशूचे शिष्य आहेत अशी आपली मान्यता दाखवली. प्रे. कृत्ये ४:१३ कळवतेः “तेव्हा पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्‍चर्य केले; आणि हे येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले.”

५ स्वर्गाला परत जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना ही आज्ञा केली की त्यांनी आपले ख्रिस्ती सेवकपण नवे शिष्य बनवून आणि त्यांना स्वतःला जसे शिकवण्यात आले तसेच यांनाही शिकवून वृद्धींगत करावे. मत्तय २८:१९, २० मध्ये येशूने ही आज्ञा दिलीः “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, . . . जे सर्व काही मी तुम्हांस आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिकवा.” हेच शैक्षणिक कार्य आमच्या दिवसापर्यंतही चालू राहणार हे त्याच्या मनात होते हे त्याने ही खात्री देऊन व्यक्‍त केलेः “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.”

६ येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य, नव्या शिष्यांना त्याने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी शिकवण्यात मागे पडले नाही. तथापि, यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील मंडळ्यात होत असलेली लक्षणीय वाढ, आम्ही मंडळीत नव्यानेच बाप्तिस्मा झालेल्या बांधवांच्या, तसेच अद्याप बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकांच्या तसेच जे आम्हासोबत पवित्र शास्त्र अभ्यास करीत आहे व जे आता मंडळीतील सभांना काही प्रमाणात नियमित उपस्थित राहू लागले आहेत अशांच्या खास गरजा विचारात घ्याव्या असे सूचित करते.

७ भारतात १९९२ कार्यवर्षाच्या आरंभाला साधारणपणे ९ प्रचारकांपैकी १ जण वर्षभर सेवाकार्यात क्रियाशील होता असे दिसते. तसेच ४ पैकी १ जण तीन किंवा त्यापेक्षा कमी वर्षे प्रचार करीत होता; आणि ३ पैकी १ पाचपेक्षा अधिक वर्षे सेवा करीत नव्हता असे दिसते. वस्तुतः पुष्कळ नव्या लोकांनी मंडळीशी सहवास ठेवू लागल्यापासून बरीच चांगली प्रगति केली असली तरी काही बाबतीत त्यांना आणखी मदत मिळाल्यास त्यांची ही आध्यात्मिक प्रगति अधिक गतिमान होईल यात शंका नाही.

८ इब्रीयांस पत्र ६:१ आम्हा सर्वांना “प्रौढतेप्रत प्रगमन कर”ण्याचे उत्तेजन देते. ख्रिस्ती प्रौढता ही निव्वळ कार्याचा अहवाल देण्याच्या खूपच पलिकडे जाते. त्यात व्यक्‍तिगत अभ्यासात प्रगति करण्याचा व नियमाने सभांना उपस्थित राहण्याचा तसेच क्षेत्रसेवेत आवेशी रुपात सहभागी होण्याचे समाविष्ट आहे. याचप्रमाणे एखाद्याला तारणासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या सत्याच्या ज्ञानाप्रत येण्याचे साहाय्य देण्याचेही समाविष्ट आहे. आपण ‘शास्त्रवचनातून विवाद करण्याच्या’ आमच्या कुशलतेस अधिक तल्लख करण्यास शिकले पाहिजे. (प्रे. कृत्ये १७:२) प्रौढता संपादित करण्यास वेळ लागतो, व ते आम्हाठायी असणाऱ्‍या इश्‍वरी भक्‍तिचे परिमाण आणि आम्ही क्षेत्रकार्यात मिळवलेला व्यावहारिक अनुभव यावर अधिकांशाने अवलंबून आहे. आमच्या स्वतःच्या ईश्‍वरी भक्‍तिच्या खोलीचे नियंत्रण आपणापाशी असले तरी इतर प्रौढ बंधूभगिनींना आम्ही, आम्हाला अधिक व्यावहारिक अनुभव मिळवून देण्यासाठी मुभा द्यावी हे अधिक सूज्ञतेचे ठरेल. आम्हाला त्यांच्या खासपणे क्षेत्रसेवेच्या अनुभवाद्वारे पुष्कळसे शिकून घेता येईल. आपण स्वतःच आपल्या परिक्षण व चुकांद्वारे शिकून घेण्याची जरुरी नाही.

९ अनुभवांची उणीव असणाऱ्‍यांना मदत द्याः ख्रिस्ती मंडळीच्या स्थापनेपासूनच साहाय्य देण्याचा नमुना सुरु झाला. येशूने आपल्या शिष्यांना सूचना दिल्या. (मार्क ३:१४; लूक ९:१; १०:१) मग, यांनी इतरांना शिकवले. तीमथ्याला प्रेषित पौलाकडून खास प्रोत्साहन व मदत मिळाली. अपुल्लोस या शिष्याने अधिक अनुभवी अशा अक्विला व प्रिसिल्ला यांजकडून साहाय्य मिळाल्यामुळे प्रगति केली. (प्रे. कृत्ये १८:२४-२७; १ करिंथ. ४:१७) ख्रिस्ती मंडळीतील प्रौढ जन आज याच उदाहरणांचे अनुकरण करतात. ते कमअनुभवी लोकांना व खासपणे नवीन व युवकांना शिक्षण व प्रोत्साहन देतात. रोमकर १५:१, २ म्हणतेः “आपण जे सबळ आहोत त्या आपण दुर्बळांची दुर्बळता सोशिली पाहिजे.”

१० मुलांनी आध्यात्मिक प्रगति करावी म्हणून मदत पुरविण्याची विधायक अशी पावले उचलण्याची पालकांची जबाबदारी आहे. यात कौटुंबिक अभ्यास, मुलांना व्यक्‍तिशः अभ्यास कसा करावा ते शिकवणे, नियमित सभांची उपस्थिती व सहभाग आणि जे शिकलो त्याचा अवलंब करण्याचा अनुभव या सर्व गोष्टी येतात. (इफिस ६:४; १ तीम. ५:८) मंडळीच्या पुस्तक अभ्यास चालकांनी खासपणे त्यांच्या अभ्यासाच्या गटातील आणि क्षेत्र सेवेच्या गटातील सर्वांनी आध्यात्मिक मार्गाने प्रगति करावी यासाठी व्यवस्था आखण्यात पुढाकार घेतला पाहिजे. सेवा देखरेखे व इतर वडील आणि उपाध्य सेवक तसेच मंडळीतील इतर सदस्य देखील यात मदत करू शकतात.

११ जे जरुरीचे आहे ते पुरवाः कधी कधी ख्रिस्ती हालचालीतील केवळ काही प्रकारातील, जसे की, व्यक्‍तिगत अभ्यास याबद्दल साहाय्य देण्याची गरज असेल. व्यावहारिक असा अभ्यासाचा आराखडा बनवावा यासाठी त्याला मदत हवी असेल. दुसऱ्‍या कोणाला एखादे विवेचन किंवा नेमणूक तयार करावी म्हणून मदत लागत असेल. दुसऱ्‍यांना पवित्र शास्त्र विषयाबद्दल अधिक संशोधन करण्याचे कसे शिकावे यासाठी मदतीची गरज असेल.

१२ पुष्कळ नवीन लोकांना क्षेत्र कार्याबद्दलच्या साहाय्याची गरज आहे. कोणा प्रचारकाला घरोघरच्या कार्यात पुनर्भेटी घेण्यात किंवा पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करण्यात वा तो चालविण्यात अधिक प्रभावी होण्याची गरज असेल. यासाठी रिझनिंग पुस्तकातून किंवा आमची राज्य सेवा यात सुचविण्यात आलेल्या प्रस्तावना व सादरताना काही तालमी पुरेश्‍या असू शकतील. इतर वेळी, क्षेत्रकार्याचा व्यावहारिक आराखडा तयार करणे व तो कसा टिकवून ठेवावा याबद्दलच्या सूचनांची गरज असेल. मदतीची आवश्‍यकता असणाऱ्‍या बंधू व भगिनीसोबत मिळून कार्य करण्याच्या निश्‍चित योजना आखल्यामुळे त्याला वा तिला विशिष्ठ ध्येयाप्रत आपली प्रगति करता येईल.

१३ आपली आध्यात्मिक प्रगति सर्वांना दिसून यावी असे देवाचे वचन आपल्याला उत्तेजन देते. हीच सूचना पौलाने आपला सहकर्मी तीमथ्य याला लिहिली होती. (१ तीमथ्य ४:१५) या उत्तेजनाच्या अनुषंगाने पौलाने, आपली तयारी, खेळाच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकासारखी किंवा यशस्वीरित्या आध्यात्मिक युद्ध करणाऱ्‍यांसारखी राखावी असे म्हटले. (१ करिंथ. ९:२४-२७; २ करिंथ. १०:५, ६) देवाच्या इच्छेबद्दल आपण जे काही शिकतो ते त्वरेने लागू करण्याचे शिकून घेतले पाहिजे; म्हणजे खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचा जिवंत नमूना निरिक्षकांना आपल्यामध्ये पाहायला मिळू शकेल. तसेच इतरांनी येशू ख्रिस्ताचे समर्पित शिष्य बनावे यासाठी आम्ही आपल्या अध्यापनाच्या कलेत सुधारणा केली पाहिजे.

१४ प्रगतिमध्ये परिक्षेत टिकून राहण्याचेही समाविष्ट आहेः येशूने देखील त्रासापासून खूप महत्त्वपूर्ण गोष्टी शिकून घेतल्या. (इब्री ५:८) आपणही तेच करू शकतो. आपण याकोब १:२, ३मध्ये शिफारस करण्यात आलेली सरळ प्रवृत्ती धारण करतो तेव्हा आपली आध्यात्मिक प्रगति विस्तारीत होते. तेथे म्हटले आहेः “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.” अशाप्रकारे, आपल्याला जुनाट आजार, आर्थिक अडचणी, विभाजित घरात राहणे, क्षेत्रावरील विरोध किंवा इतर कोणाही प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागत असले तरी यहोवाकडून आपल्याला ही खात्री आहे की, आम्ही त्याच्या मदतीने यावर मात करू शकू आणि त्याच्या उपासनेत प्रगति करू शकू. (१ करिंथ. १०:१३; २ करिंथ. १२:९; १ पेत्र ५:८-११) सर्व परिस्थितीत स्थिर राहण्यामुळे, ‘देवाची पवित्र वचने बोलणे तसेच त्याची सेवा त्याने पुरविलेल्या शक्‍तीने करीत राहिल्यामुळे,’ प्रगति साध्य होते व याद्वारे ‘सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे गौरव होते.’—१ पेत्र ४:११.

१५ पुढची प्रगति साध्य करण्यासाठी मदत स्वीकाराः अधिक आध्यात्मिक प्रगति साध्य करण्यासाठी मदतीची गरज असलेले असे तुम्ही आहात तर मंडळीतील अधिक अनुभवी सदस्यांकडून मदत स्वीकारण्याची इच्छा धरा. तुम्हाला मदत करण्याची तयारी कोणी दाखवली नसेल तरी तुम्ही लाजाळू वृत्तीला मंडळीतील कोणा अनुभवी प्रचारकांकडून मदत प्राप्त करण्यामध्ये अडथळा होऊ देऊ नका. मदतीकरता विचारा. तुम्हाला तुमच्या पुस्तक अभ्यास चालकाला, सेवा देखरेख्यांना किंवा इतर कोणाही वडीलांना साहाय्याबद्दल विचारणा करता येईल.—पडताळा उत्पत्ती ३२:२६; मत्तय ७:७, ८.

१६ यहोवाच्या शुद्ध भक्‍तिच्या पर्वताकडे झुंडीने येत असलेला व सतत वाढत राहिलेल्या “मोठा लोकसमुदाय” यामध्ये आपला समावेश असावा हा खराच एक अद्‌भूत हक्क आहे. (प्रक. ७:९) या प्रवाहासोबत इतरांनाही सामील होण्याचे आमंत्रण करण्याचा आपला हक्क आहे. या कारणास्तव, हृदयपूर्वक रसिकता बाळगून आपण पुढील प्रगति साध्य करण्यासाठी निश्‍चयी हालचाल करू या. आपण स्वतःची आध्यात्मिक उभारणी करू या आणि इतरांना देखील यहोवाच्या सेवेत प्रगति करता यावी म्हणून त्यांना मदत देण्यासाठी जे करता येईल ते करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा