उपाध्यपणात प्रगति करणे
१ प्रगतिसंबंधाने एक जुना वाक्प्रचार म्हणतोः “तुम्ही जेथे आहात तेथून सुरवात करा, पण जेथे आहात तेथे थांबू नका.” हा वाक्प्रचार आपल्या उपाध्यपणात प्रगति करण्यासंबंधाने किती उचित आहे! तुम्ही आपल्या उपाध्यपणाला आरंभ केला तेव्हा राज्य संदेशाविषयी केवळ त्रोटक माहिती दिली असेल. पण आता जर बरीच वर्षे झाली आहे आणि तुम्ही पुढे गेला नाही, जेथे होता तेथेच आहात तर काय करता येणे शक्य आहे?
२ पहिली गोष्ट ही की, कुशलपणे शिकवण्यासाठी ज्या सूज्ञानाची गरज आहे त्याबद्दल यहोवाला विचारणा करणे. (नीती. १५:१४; याकोब १:५) दुसरी गोष्ट ही की, तुम्ही केलेल्या प्रार्थनेच्या अनुषंगाने काम करणे. सादरता कशी करावी याविषयी रिझनिंग पुस्तकात जी माहिती आहे ती जाणून घेण्यासाठी वेळ बाजूला काढा. अशा एका सादरतेस शोधा जी तुम्हाला परिणामकारकपणे वापरता येईल. तिचे सतत वाचन करा की, ती तुमच्या मनात स्पष्ट बसू शकेल. तिसरी गोष्ट ही की, आपल्या बांधवांसोबत क्षेत्र कार्य करा म्हणजे तुम्ही तयार केलेली सादरता लोकांना सांगता येईल.
तुम्हाला मदत देणारे साथीदार
३ तुम्ही म्हणालः ‘हे म्हणायला सोपे, पण करायला मात्र कठीण आहे.’ ते खरे आहे. पण यासाठीच तर तुम्हासोबत साथीदार आहेत. तुम्ही युवक आहात तर, आपल्या पालकांना किंवा फलदायी उपाध्याय असलेल्या कोणा अनुभवी प्रचारकाला मदत मागा. दारावर लोकांशी कसे बोलावे याविषयी त्यांचे प्रस्ताव विचारा. ते तुम्हाला कदाचित सराव करण्याच्या योजनेविषयी सांगतील जेथे तुम्हाला तुमची सादरता दाखवता येईल. ते त्यावेळी घरमालक बनतील आणि क्षेत्रावर येत असलेले साधारण आक्षेप आपल्या म्हणण्यात मांडतील. मग, सरावामुळे तुम्हाला लोकांशी कुशलतेने संभाषण करण्याचे शिकून घेता येईल.
४ आणखी काही साथीदार तुम्हाला मदत देऊ शकतील. ते पायनियर आहेत. यांना अनुभव व पायनियर सर्व्हीस स्कूल याद्वारे प्रचाराचे कौशल्य शिकायला मिळालेले आहे. तुमचे पुस्तक अभ्यास चालक तसेच सेवा देखरेखे देखील तुम्हासोबत घरोघरचे कार्य करतील आणि लोकांशी कसे बोलावे व चर्चा कशी करावी याबद्दल आणखी माहिती पुरवू शकतील.
आस्थेचा पाठलाग करणे
५ आमची प्रकाशने स्वीकारणाऱ्या लोकांना पुढील आध्यात्मिक साहाय्य देण्यात आम्ही आस्थेवाईक आहोत. याचा अर्थ हा की, त्यांची आस्था आणखी वाढवावी यासाठी आम्ही पुन्हा गेले पाहिजे. पण ही पुनर्भेट घेण्याआधी तुम्ही आरंभाच्या भेटीत घरमालकासोबत काय बोलला होता त्याची उजळणी करा, म्हणजे त्या विषयावर अधिक भाष्य करता येऊन त्यांची आस्था वाढवता येईल. हे लक्षात ठेवा की, आपण जरी लावीत व पाणी घालीत असलो तरी वाढविणारा हा यहोवा आहे. यास्तव, भेट घेण्याआधी त्याच्या मार्गदर्शनाची याचना करा. (१ करिंथ. ३:६; २ करिंथ. ९:१०) आम्ही इतरांना शिकवण्याची मदत देत असता आम्हाला देखील आपली व्यक्तीगत प्रगति साध्य करता येईल.
६ याच्या पुढील महत्त्वाचे पाऊल म्हणजे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करणे व तो चालविणे. तुम्ही आपल्या उपाध्यपणात येथपर्यंत पोहंचला नसाल तर यहोवाची प्रार्थना करा आणि एखाद्या मेंढरासमान माणसाला शोधून त्याला भरवता यावे यासाठी त्याची मदत मागा. एखादा प्रभावी शिक्षक कसा पवित्र शास्त्र अभ्यास चालवितो ते पाहून मग त्याच्या शैक्षणिक पद्धतींचे अनुकरण करणे तुम्हाला लाभदायक ठरू शकेल. याचप्रमाणे शिक्षण पद्धतीविषयी जी माहिती द वॉचटावर मासिकात ऑगस्ट १, १९८४ च्या अंकात पृष्ठ ८-१७ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे तिची उजळणी करणे देखील फलदायी ठरेल. अशाप्रकारे स्वतःची तयारी करण्यामुळे, तुमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले म्हणजे तुम्ही एखादा पवित्र शास्त्र अभ्यास चालवू शकाल.
ध्येये ठेवा व ती मिळवा
७ अधिक प्रभावीपणे शिक्षण देणे, पुनर्भेटी घेणे, आणि अभ्यास चालविणे ही ध्येये पूर्ण करायला वेळ लागतो. तुम्हाला आणखी एक ध्येय, साहाय्यक किंवा नियमित पायनियरींग करणे हे ठेवता येईल का? तुम्ही आपल्या उपाध्यपणात प्रगति कराल तसतसे इतरांसाठी उत्तेजनाचा स्रोत ठराल. जेथे आहात तेथेच न राहिल्यामुळे, पण पुढे प्रगति करीत गेल्यामुळे तुम्हाला यहोवाकडून अनेक आशीर्वादांचा लाभ मिळू शकेल.