सेवेचा उत्तम विशेषाधिकार
१ विद्यालयातील सहा वर्षांपेक्षा, द वॉचटावर आणि अवेक! वाचल्यामुळे खऱ्या मूल्याबद्दल पुष्कळ काही शिकू शकला असे एक वाचकाने म्हटले. ही मासिके थोडा काळ वाचल्यानंतर अशाप्रकारचे रसिक बोल प्रांजळ वाचकांकडून प्राप्त होणे ही असाधारण गोष्ट नव्हे. आमच्या मासिकांचे मूल्य जाणणाऱ्या लोकांना ही मासिके देण्याचा आमचा किती विशेषाधिकार आहे!
२ पुष्कळ लोकांची, सत्यामध्ये आस्था असली तरी, एखादा गृह पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यापर्यंत त्यांनी अजून प्रगती केली नाही. परंतु त्यांच्याकडे कोणीही द वॉचटावर आणि अवेक!चा प्रत्येक नवा अंक घेऊन गेल्यास त्यांच्या आस्थेची जरुर वाढ केली जाऊ शकते. होय, मासिक मार्गावर विश्वासूपणे मासिके दिल्याने अनेक लोक पवित्र शास्त्र अभ्यासासाठी हळूवारपणे तयार झाले.
३ जर आम्ही स्वत: ते मासिक वाचले व आमच्या यादीतील प्रत्येक व्यक्तीला कोणता विषय आवडतो याची तयारी आम्ही केली तर मासिक मार्गात आपलाही वैयक्तिक फायदा होतो.
४ पहिल्याच वेळी जर एखाद्या व्यक्तीने मासिके स्वीकार करताना आस्था दाखवली, तर प्रत्येक दोन आठवड्यात आमच्या मासिकात विशेष लेख येतात व त्यांना तुमच्या घरी पोंचविण्यासाठी आनंद होईल असे तुम्ही त्या व्यक्तिला सांगू शकता. नियमितपणे त्याच्याकडे जाण्यास विसरु नका, व घरमालकाबरोबर पवित्र शास्त्र विषयांची चर्चा करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घ्या. तुम्ही सेवेचा ह्या उत्तम विशेषाधिकाराचा जरुर आनंद घ्याल हे आम्हाला माहीत आहे.