सरळ व प्रभावकारी प्रस्तावना
१ येशूने देवाच्या राज्याची घोषणा सरळ व सोप्या पद्धतीने केली. त्याला माहीत होते की मेंढरासमान लोक सत्य ऐकल्यावर अनुकूलरितीने प्रतिक्रिया करतील. त्याला हेही माहित होते की लोकांची विचारसरणी, आस्था, व तर्क करण्याची क्षमता विभिन्न आहे. त्याचप्रमाणे, त्याने विविध सोप्या प्रस्तावना, प्रश्न व उदाहरणे त्याच्या ऐकणाऱ्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी व त्यांच्या हृदयाप्रत जाण्यासाठी त्यांचा उपयोग केला. आपणही त्याचे अनुकरण करु शकतो आणि सरळ व प्रभावकारी प्रस्तावनांचा चांगला उपयोग करु शकतो.
२ प्रभावीपणे रिझनिंग पुस्तकाचा वापर करा: रिझनिंग पुस्तकाच्या पृ. ११ वरील “व्यवसाय⁄घर” या शीर्षकाखालची पहिली प्रस्तावना उचित व सादर करण्यास सोपी आहे.
तुम्ही म्हणू शकाल:
▪ “आम्ही तुमच्या शेजाऱ्यांबरोबर हे बोलत आहोत की सर्वांना व्यवसाय व राहण्यासाठी घरे असतील याची खात्री देण्यासाठी काय केले जाऊ शकते? तुम्ही विश्वास करता का की मानव सरकार हे साध्य करील अशी अपेक्षा करणे योग्य आहे? . . . परंतु ह्या समस्या कशा सोडवाव्या हे जाणणारा कोणी तरी आहे, व तो आहे मानवजातीचा सृष्टीकर्ता.” यशया ६५:२१-२३ वाचा. यानंतर तुम्ही घरमालकाला विचारु शकता की त्याला हे ऐकून कसे वाटले.
३ पुष्कळांना पृ. १२ वरील “अन्याय⁄दु:ख” या शीर्षकाखालची प्रस्तावना आवडते.
तुम्ही विचारु शकता:
▪ “तुम्ही कधी विचार केला का की: मानव अनुभवीत असलेला अन्याय व दु:ख याबद्दल देव खरोखरच काळजी करतो?” घरमालकाला उत्तर देण्यास वाव द्या व नंतर उपदेशक ४:१ आणि स्तोत्र ७२:१२-१४ वाचा. यानंतर तुम्ही अनंतकाळ जगू शकाल ह्या पुस्तकाची वैशिष्ट्ये पृ. १५०-३ वरील चित्रे काढून दाखवू शकता व संक्षिप्त रुपात दाखवू शकता की कशी आजची जागतिक परिस्थिती पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीची पूर्णता आहे. पुढे पृ. १६१-२ उलगडून मानवाच्या आशीर्वादासंबंधाने देवाने काय भाकित केले हे दाखवा. घरमालकाला विचारा की कोणते दृश्य त्याला अधिक लागू होते.
४ घरमालकासोबतच्या संक्षिप्त चर्चेनंतर, तुम्ही निर्णय घेऊ शकता की अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकाऐवजी त्याचे लक्ष एखाद्या मासिकाच्या विषयाकडे, माहितीपत्रकाकडे किंवा हस्तपत्रिकेकडे आकर्षित करणे हे उचित ठरेल.
उदाहरणार्थ, ह्या लेखाच्या २ परिच्छेदाच्या प्रस्तावनेचा उपयोग केल्यानंतर, तुम्ही म्हणू शकता:
▪ “आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक, स्पष्टपणे दाखवते की ज्या समस्यांना दैनंदिन जीवनात आम्ही तोंड देतो त्यांना सोडवण्यासाठी देवाने कोणते अभिवचन दिले आहे व आम्ही त्यापासून कसा फायदा मिळवू शकतो.” मग माहितीपत्रकाचे पृ. १८ व १९ उलगडा, आणि यहोवाने केलेल्या भव्य अभिवचनांकडे लक्ष केंद्रित करा.
५ किंवा परिच्छेद ३ मधील प्रस्तावनेचा उपयोग केल्यानंतर, शांतीदायक नवीन जगातील जीवन ही हस्तपत्रिका सादर केली जाऊ शकते.
तुम्ही म्हणू शकता:
▪ “आज जगात अत्यंत कष्ट व त्रास आहेत. ही हस्तपत्रिका दाखवते की देव मानवजातीसाठी एक विस्म्यकारक बदल घडवून आणणार आहे असे अभिवचन दिले आहे व युद्धे, अन्नटंचाई, आणि आरोग्याच्या समस्या भूतकाळच्या गोष्टी होतील.” हस्तपत्रिकेच्या पृ. ३ वरील दुसरा परिच्छेद वाचा.
६ लोकांमधील आमची प्रामाणिक आस्था, हृदयस्पर्शी सरळ व प्रभावी प्रस्तावना, नक्कीच मेंढरासमान लोकांना आवडेल.—योहान १०:१६.