तुमच्या पहिल्या भेटीतच पाया घालणे
१ पहिल्याच भेटीत पाया घातल्यामुळे आपल्याला प्रभावकारी पुन:र्भेटी करण्यास सहज होते. रिझनिंग पुस्तक तसे करण्यास आम्हाला मदत देते.
२ पुढील सादरता, रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठ १० वरील, “पवित्र शास्त्र/ देव” या पोटमथळ्याखालील दुसऱ्या प्रस्तावनेवर आधारीत आहे.
मैत्रिपूर्ण अभिवादन केल्यावर, तुम्ही म्हणा:
▪“आम्हाला असे दिसते की, आजच्या वाढत्या समस्यांचे योग्य उत्तर कोठे मिळू शकेल याची अधिकाधिक लोकांना अनिश्चितता वाटते. तुमच्याही बाबतीत ते खरे आहे का? [प्रतिसादास वाव द्या.] एक अशी वेळ होती, जेव्हा लोक मदतीसाठी पवित्र शास्त्राकडे वळत होते. पण आज पुष्कळांना त्याबद्दल शंका वाटते. तुम्हाला पवित्र शास्त्राबद्दल कसे वाटते?” जर घरमालकाने शास्त्राच्या खरेपणाबद्दल संशय व्यक्त केला तर त्यांना “तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता” ही हस्तपत्रिका काढावी व पृष्ठ २ वरील दुसरा व तिसरा परिच्छेद वाचावा. जर घरमालक कबूल होत असेल की पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे तर मग पृष्ठ २ वरील दुसऱ्या परिच्छेदातील वचने काढून वाचावीत व संक्षिप्तरुपाने घरमालकासोबत त्याची चर्चा करावी.
३ तुमच्या क्षेत्रातील बहुसंख्य लोक अविश्वास प्रदर्शित करत असतील, तर रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठ १० वरील पाचव्या प्रस्तावनेचा वापर करून त्यांची आस्था वाढवण्याचा प्रयत्न करू शकता.
तुम्ही म्हणू शकता:
▪“आजच्या जगातील चाललेल्या झगड्यांना दृष्टीत घेऊन, पुष्कळ नम्र लोकांना देवावर विश्वास ठेवण्यास कठीण जात आहे. किंवा जरी त्यांनी विश्वास केला तरी, आम्ही सामना करीत असलेल्या समस्यांना तो सोडवू शकत नाही अशी त्यांची समजूत आहे. तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादास वाव द्या.] ह्या हस्तपत्रिकेला मनुष्य, विज्ञान व पवित्र शास्त्राबद्दल काय म्हणावयाचे आहे त्याकडे जरा लक्ष द्या”. त्यानंतर तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता ह्या हस्तपत्रिकेच्या पृष्ठ ३ वरील ५वा परिच्छेद वाचा.
४ दुसऱ्या भेटीची प्रस्थापना करण्यास हस्तपत्रिकेतून काही प्रश्न उभारा: तुम्ही आपली प्राथमिक भेट अशा तऱ्हेने घ्या की त्याद्वारे पुढील फलदायी भेटींना वाव मिळू शकेल. तुम्हास असे वाटू देऊ नका की तुम्हाला सविस्तर माहिती सांगावी लागेल. किंवा तुम्ही तुटक माहिती सांगितली तर घरमालकाला वाटेल की तुम्हाला त्याच्यामध्ये खरोखरच आस्था दिसत नाही असे वाटू देऊ नका. दोन किंवा तीन परिच्छेद वाचल्यावर हस्तपत्रिकेतून असा प्रश्न उभारा की ज्याची चर्चा तुम्ही भावी भेटीत करु शकाल.
५ उदाहरणार्थ, पृष्ठ ४था व परिच्छेद तिसरा याकडे लक्ष वळवा व विचारा: “भवितव्यासाठी पवित्र शास्त्र जे सांगते त्यावर विश्वास ठेवण्यालायक ते माहिती पुरविते का?” हा प्रश्न तुमच्या पुढील पुन:र्भेटीसाठी एक पाया ठरेल व त्यावेळेस अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकाच्या ५व्या धड्याची चर्चा तुम्हाला करता येईल.
६ जर घरमालकाने आपल्या संदेशाविषयी आस्था दाखवली, पण प्रकाशन स्वीकारण्याच्या वेळी स्तब्ध राहिला, तर त्याला अनंतकाळ जगू शकाल हे पुस्तक न देणे उचित ठरेल. तरीपण, ह्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेतून महत्त्वपूर्ण व मनोरंजक विषय दाखवून घरमालकाची आस्था वाढवा. मग नंतरच्या भेटीत घरमालकाला मोठ्या आकाराचे पुस्तक ४० रुपयांना किंवा लहान आकाराचे पुस्तक २० रुपयांना पुन्हा एकदा सादर करा.
७ प्रत्येक घरमालक एक संभाव्य शिष्य म्हणून आपण दृष्टीकोण बाळगला तर आपण आपली समाप्ती अशा रीतीने करायचा निर्धार करु की ज्यामुळे आपल्या दुसऱ्या पुन:र्भेटीसाठी तो एक पाया ठरेल.