पवित्र शास्त्रामध्ये आस्था प्रोत्साहित करण्यासाठी पुन्हा जाणे
१ काही वेळा क्षेत्रकार्यामध्ये आम्ही अशा लोकांना भेटतो जे सुवार्तेमध्ये आस्था दाखवतात परंतु ज्या घटकेला आम्ही त्यांच्यासोबत बोलत असतो तेव्हा ते फार व्यग्र असतात. राज्याच्या संदेशाची सहभागिता करण्यासाठी आम्ही दुसऱ्या वेळेला पुन्हा जाण्याचा प्रयत्न करतो का? किंवा घरमालकाबरोबर मनोरंजक संभाषण करतो, परंतु तो कोणतेच प्रकाशन स्वीकारत नाही. सत्याबद्दल बोलणी करण्यासाठी आम्ही पुन्हा त्याच्याकडे जातो का?
२ आमच्या क्षेत्रात पूर्णपणे साक्ष देणे आणि आम्हाला मिळालेल्या सर्व आस्थेवाईकांना भेटी देणे महत्त्वपूर्ण आहे. जे पुस्तक किंवा मासिके घेतात त्यांच्याचकडे केवळ आम्ही पुनर्भेटी करतो का? असे असल्यास, आम्ही काही आस्थेवाईक लोकांकडे दुर्लक्ष करीत आहोत. त्याने प्रकाशनांचा स्वीकार केला नाही म्हणून तो आध्यात्मिक उत्तेजनाच्या पात्रतेचा नाही असा न्याय आम्हाला निश्चितच करावसा वाटणार नाही. (रोमकरांस १४:४ पडताळा.) आमच्या भेटीनंतर कदाचित, घरमालक आम्ही जे काही बोललो त्याचा विचार करेल, किंवा त्यांना भेटण्यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाबद्दल गुणग्राहकता दाखवतील. आम्ही जेव्हा परत जाऊ तेव्हा तो अधिक अनुकूलरीतीने मत प्रदर्शित करेल.
३ व्यग्र असणाऱ्या व्यक्तिकडे पुन्हा गेल्यावर, तुम्ही म्हणू शकता:
▪“तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्यास मला आनंद होत आहे. मागच्या वेळी मी आलो होतो, तुमच्याकडे वेळ नसल्यामुळे आपण बोलू शकलो नाही. आपण व्यग्र आहात हे मी पाहू शकतो, मी संक्षिप्तपणे आपल्याशी बोलेन. कदाचित तुम्हाला तुमच्या व तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांच्या आरोग्याची काळजी असेल. देवाने सर्व आजारांचा अंत करण्याचे अभिवचन दिले आहे याबद्दल तुम्हाला माहीत होते का? हे आश्चर्यकारक असेल, हो ना? [प्रतिसादास वाव द्या.] ‘पहा! मी सर्व काही नवे करतो’ या माहितीपत्रकाच्या ४ परिच्छेदामधील मुद्दा पाहा.’” वेळ अनुमती देत असल्यास, परिच्छेद वाचा आणि पृ. ४ च्या तळाला दिलेल्या शास्त्रवचनांमधील एका वचनाची चर्चा करा जे नव्या जगातील परिस्थितीचे वर्णन करते. घरमालक ग्रहणक्षम असल्यास, तुम्ही एखादा पवित्र शास्त्र अभ्यास चालू करू शकता.
४ पत्रिकेचा स्वीकार ज्यांनी केला आहे त्यांना पुन्हा भेट देताना, अशाप्रकारे तुम्ही म्हणू शकता:
▪“मागच्या वेळी मी तुम्हाला भेटलो होतो, तेव्हा तुम्ही हू रियली रूल्स द वर्ल्ड ही पत्रिका घेतली होती. सैतान ह्या जगावर राज्य करत आहे हे मानण्यास तुम्हाला अवघड वाटते का? [प्रतिसादास वाव द्या.] पृ. ६ वरील पहिला परिच्छेद पाहा.” परिच्छेद वाचा, आणि मग विचारा: “सैतान आपल्याला ठकवू का इच्छितो?” घरमालकाने उत्तर दिल्यानंतर, पृ. ३ वरील चौथ्या परिच्छेदाची एकत्र चर्चा करा. तुम्ही पत्रिकेची पूर्णपणे चर्चा करू शकता, किंवा आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक तुम्हाला सादर करावयास व पृ. १८ वरील पोटमथळ्याच्या खालचा मजकूर पाहावयास आवडेल.
५ आमच्या प्रचार कार्यामध्ये थोडीच आस्था दाखवली असली तरी पुन्हा एकदा जाऊन भेट देणे व सकारात्मक असणे हे चांगले कारण ठरेल. इतरांची काळजी घेणे, सत्याबद्दल शिकण्यासाठी त्यांना मदत करण्यास प्रवृत्त होणे फार महत्त्वाचे आहे. इतरांनी त्यांच्या आध्यात्मिक गरजांविषयी जागृत व्हावे यासाठी त्यांना मदत देण्यासाठी यहोवाची संस्था प्रकाशने व सूचक प्रस्तावना पुरविते.—मत्त. ५:३.
६ थोडीच आस्था दाखवलेल्या व्यक्तीबरोबर तुमचे आनंददायक संभाषण झाले असेल तर, ती आस्था वाढविण्यासाठी पुन्हा जाण्याचे टाळू नका. त्याचा परिणाम कदाचित पवित्र शास्त्र अभ्यास चालवण्यात व कोणाला तरी जीवनाच्या मार्गावर नेण्यात होईल. या जीवन वाचवण्याच्या कामात सर्वांनी प्रामाणिकपणे भाग घेण्याचे उत्तेजन आम्ही देतो.—१ तीम. ४:१६.