आपल्या समस्या या माहितीपत्रकातून अभ्यास सुरु करणे
राज्याच्या संदेशाबद्दल कोणा आस्थेवाईकाशी बोलणी करून आता एक किंवा दोन दिवस, कदाचित एक आठवडा होत आला आहे. त्याने पवित्र शास्त्र प्रकाशन स्वीकारलेले असो वा नसो, ती आस्था होता होईल तितक्या लवकर वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
२ आरंभीच्या भेटीला तुम्ही ज्या नोंदी काळजीपूर्वक केल्या त्यांची उजळणी करा. मग, साक्षीकार्यासाठी आपली बॅग तयार करताना जे प्रकाशन घरमालकाला दिले त्याची एक प्रत देखील सोबत घ्या म्हणजे पुनर्भेटीत तुम्हाला त्याचा संदर्भादाखल उपयोग करता येईल.
तुम्ही “आपल्या समस्या” हे माहितीपत्रक दिले असल्यास, कदाचित असे म्हणू शकताः
▪ “मला तुम्हाला परत बघून आनंद वाटला. मागे आपण बोललो होतो तेव्हा मी तुम्हाला हे माहितीपत्रक दाखवले होते आणि पवित्र शास्त्रातून एक वचन वाचून दाखवले होते व त्याद्वारे आमच्या सर्व समस्यांचा उपाय दाखवला होता. यात आजार व अपंगत्व यामुळे उद्भवणाऱ्या समस्याही आहेत. हे तुम्हाला मानायला कठीण वाटते का? [घरमालकाच्या प्रतिसादास वाव द्या.] मी जे माहितीपत्रक तुम्हाला दिले होते त्यातील १९व्या पृष्ठावरील २ऱ्या परिच्छेदात हा मुद्दा बघा.” तो परिच्छेद वाचा व मग त्याच्या पुढील परिच्छेदात दिलेल्या एक किंवा दोन शास्त्रवचनांचा विचार करा. आता पवित्र शास्त्र अभ्यासास सुरवात झाली आहे!
३ पुढल्या वेळेच्या भेटीची योजना आखण्यासाठी तुम्ही असे म्हणून समारोप करू शकताः
▪ “अर्थात, आपण आता जे काही चर्चिले ते पवित्र शास्त्रात आहे; पण पुष्कळांना वाटते की, पवित्र शास्त्र जे म्हणते त्यावर त्यांना खराच विश्वास ठेवता येईल का? पुढील वेळी मी भेट देईन तेव्हा या विषयावर थोडे बोलण्यासाठी वेळ देऊ.” तुम्ही आस्था वाढविण्यासाठी पुनर्भेट घ्याल तेव्हा “सूचना प्रदान करणारे पुस्तक” या पृष्ठ २४ वरील उपशिर्षकाखालील परिच्छेदापासून सुरु होणारा विषय चर्चेला घ्या.
४ कमी प्रकाशने वितरीत होतात त्या क्षेत्रावर: हीच सर्वसाधारण सादरता, लोकांनी आस्था दाखवली असेल पण काही प्रकाशन स्वीकारले नसेल अशावेळी उपयोगात आणता येते. मागील भेटीच्या वेळी संभाषणाच्या दरम्यान तुम्ही सादर केलेल्या माहितीपत्रकाचा उल्लेख करू शकता. घरमालकाने प्रकाशन स्वीकारण्याआधी तुम्हाला आपले पवित्र शास्त्र आणि माहितीपत्रकाची तुमची व्यक्तिगत प्रत याद्वारे त्याच्या पुन:पुन्हा भेटी घ्याव्या लागतील. तुम्ही मासिक सादर केले असल्यास पुन्हा भेटीला जाल त्यावेळी आपल्या समस्या माहितीपत्रकातील संबंधित माहितीच्या संदर्भाचा उल्लेख करा.
५ रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ १५४-६ वर दिलेल्या साहित्यावर चांगली तयारी करून चांगल्या पुनर्भेटी व आपल्या समस्या माहितीपत्रकाद्वारे पवित्र शास्त्र अभ्यासाला सुरवात करता येते. असा प्रश्न विचारला जाऊ शकतोः “पवित्र शास्त्रातील भविष्यवाद न चुकता पूर्ण होत आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपल्या काळी जो भविष्यवाद पूर्ण होत असल्याचे पाहायला मिळत आहे तो तसेच हा भविष्यवाद भविष्याबद्दल काय सुचवतो ते या माहितीपत्रकात चर्चिले आहे.” मग पृष्ठ १३ काढा आणि “चिन्ह” या उपशिर्षकाखालील माहितीची चर्चा करा.
६ तुम्ही घरमालकाला आपल्या समस्या हे माहितीपत्रक, किंवा दोन मासिके किंवा एखादे पुस्तक दिले असल्यास अथवा पवित्र शास्त्रावर नुसती मनोरंजक चर्चा केली असल्यास ती आस्था वाढविण्याची जबाबदारी तुम्हावर आहे. ऑगस्ट महिन्यात या जीवनप्रदायक कामासाठी थोडासा वेळ बाजूला काढून ठेवावा असे आम्ही तुम्हा सर्वांना उत्तेजन देत आहोत.—१ तीम. ४:१६.