शांतीच्या देव राज्याबद्दल आस्था वाढवा
१ आम्ही, फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक सादर करणार आहोत. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना देव राज्याबद्दल आणि ते जे काही साध्य करील त्याबद्दल गुणग्राहकता वाढवण्यास मदत करण्याचा आपला हेतू असला पाहिजे. येथे, दृष्टिकोनात्मक प्रश्न आपली मदत करू शकतात.
२ मैत्रिपूर्ण अभिवादनानंतर, आम्ही असे म्हणू शकतो:
▪“जगभरात, सरकारामध्ये आश्चर्यकारक बदल होत आहेत आणि शांतीच्या ध्येयाबद्दल अनेकदा उल्लेख केला जातो. खरी शांती कधी साध्य केली जाईल असे तुम्हाला वाटते का? [अभिप्रायासाठी वाव द्या.] पुष्कळ जण शांती आणण्याकरता मानवी राज्यकर्त्यांवर आशा लावून असले तरी, स्तोत्र ४६:९ [वाचा.] मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे देव कशाप्रकारे शांती आणण्याचे अभिवचन देतो त्याकडे लक्ष द्या. देवाची कृती पृथ्वीवर कोणते बदल घडवून आणील असे तुम्हाला वाटते? [घरमालकाचा प्रतिसाद ऐका आणि नंतर शांतीदायक नवीन जगातील जीवन ही पत्रिका दाखवा.] येथे चित्रित केलेल्या गोष्टीचे चित्र तुम्ही मनासमोर उभारू शकता का?” “देवाच्या नवीन जगातील जीवन,” या उपशिर्षकाखालील माहिती विचारात घ्या. परिस्थिती अनुमती देत असेल तर, रिझनिंग पुस्तकातील पाने २२७-३२ वरील “व्हॉट वील गॉडस् किंग्डम अकंप्लिश?” या प्रश्नाखालील अधिक माहिती विचारात घेतली जाऊ शकते. किंवा थेटपणे अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करून, आम्ही अध्याय १३ कडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करू शकतो. “देवाकडील सरकार अशाप्रकारचे बदल घडवून आणील असे तुम्हाला वाटते का?,” असे विचारून आपण चर्चेची समाप्ती करू शकतो. घरमालकाने आस्था दाखवली असल्यास, पुनर्भेटीसाठी योजना केल्या जाव्यात.
३ किंवा आम्ही असे म्हणू शकतो:
▪“आम्हा सर्वांना दररोज, तोंड द्याव्या लागणाऱ्या त्रासिक समस्यांबद्दल पुष्कळ चिंता व्यक्त केली जाते. अशा समस्यांपासून काही मुक्ततेची आशा आहे असे तुम्हाला वाटते का? [अभिप्रायासाठी वाव द्या.] काहींना वाटेल की देव आमच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. परंतु, तो प्रकटीकरण २१:३, ४ मध्ये कशाचे अभिवचन देतो याकडे लक्ष द्या.” ती वचने वाचा. या वेळी, अनंतकाल जगू शकाल पुस्तक किंवा वील धीस वर्ल्ड सर्वाईव्ह? ही पत्रिका सादर केली जाऊ शकते. पत्रिका सादर केल्यास, २ आणि ३ पानांवरील “द फ्युचर ऑफ धीस वर्ल्ड,” या शिर्षकाखालील साहित्यावर विचार केला जाऊ शकतो. शक्य असल्यास, त्याचवेळी किंवा “देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली?,” हा प्रश्न विचारल्यावर, अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करा. पुस्तकातील अध्याय ११ कडे निर्देश करा आणि पुढील भेटीत त्याची चर्चा करण्याची व्यवस्था करा.
४ घरमालक खूपच कामात असेल तर, निवडलेल्या लेखाच्या विशिष्ट मुद्यावर विवेचन मांडून, तुम्ही संक्षिप्तपणे एखाद्या चालू नियतकालिकेतील लेख दाखवण्याचे निवडाल.
कदाचित असे म्हणून तुम्ही नियतकालिक दाखवू शकता:
▪“हा लेख त्या विषयावर अधिक माहिती देतो. [आधीच निवडलेली एक किंवा दोन वाक्ये वाचा.] हा लेख अधिक विचार पुरवतो, जे तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी प्रोत्साहनदायक ठरतील. या विषयाबद्दल तुम्हाला आस्था आहे असे दिसते, तेव्हा हा अंक तसेच त्याच्या सोबतचे नियतकालिक ६.०० रुपयाच्या किंमतीत तुमच्याकडे ठेवून जाण्यास आम्हाला आवडेल.”
५ मानवजातीला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांच्या उपायासाठी कोठे पाहावे, ही बाब येते तेव्हा आज लोक त्याबाबतीत गोंधळात पडलेले आहेत. त्यांच्यासोबत भविष्यातील एखाद्या स्पष्ट आशेची सहभागिता करण्याची सुसंधी आम्हाजवळ आहे. (प्रे. कृत्ये १७:२७) तर मग, परिश्रमपूर्वकतेने, शांतीचा खरा स्त्रोत, देवाचे राज्य, याकडे आपण लोकांचे लक्ष निर्देशित करू या.